आरोग्य

आर्युवेदानुसार असा असावा तुमचा दिवसभराचा आहार

Leenal Gawade  |  Aug 4, 2022
आयुर्वेदानुसार कसा असावा आहार

 आयुर्वेदशास्त्रात तुमच्या आहार-विहारासंदर्भात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमचा आहार कसा असावा? या संदर्भात एक वेगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तुमच्या आहारात काय असायला हवे? हे देखील आयुर्वेदात सांगितलेले आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्या आहारात दिवसभरात काय असायल हवे. आयुर्वेदानुसार तुमचा दिवसभराचा आहार कसा असायला हवा. या संदर्भात एक योग्य माहिती घेणार आहोत. चला जाणून घेऊया काय सांगते आयुर्वेदशास्त्र तुमच्या दिवसभराच्या आहाराविषयी 

आयुर्वेद आणि आहार

तूपाचा करा समावेश

आयुर्वेदानुसार गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या 6 चवी असतात. यांचा आहारात अगदी प्रमाणशीर पद्धतीने समावेश करणे फारच गरजेचे असते.  या चवींचा आहारात समावेश करताना एखादी चव आपल्याला खूप जास्त आवडू शकते म्हणून त्याचा आहारात खूप समावेश करणे हे अगदी अशक्य आहे.  आयुर्वेदानुसार जर तुमच्या शौचास खराब वास येत नसेल तर तुम्ही योग्य आहार घेत आहात असे समजावे. जर तुमच्या शौचास दुर्गंधी येत असेल तर तुम्ही योग्य वेळी काळजी घेतलेली केव्हाही चांगले.

ऋतुमानानुसार असा असावा तुमचा आहार

असावा परिपूर्ण आहार

ऋतुमानाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. उष्मा, थंडी आणि दमट वातावरणामुळे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलत असतात. त्यामुळे जसे वातावरण बदलते त्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारात अनेक बदल करावे लागतात. पावसात अनेक आजारांनी डोके वर काढलेले असते. अशावेळी खाताना तुम्हाला खूप चांगल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा लागतो.  अगदी त्यानुसार तुम्हाला आहारात ऋतुमानानुसार बदल करावे लागतात. 

आयुर्वेदानुसार तुमच्या आहारात असायला हव्यात या गोष्टी

आयुर्वेद शास्त्रानुसार तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे हे फार जास्त गरजेचे असते. या यादीत नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो चला घेऊया जाणून 

  1.  गायीच्या दुधाचा समावेश हा आहारात व्हायला हवा. जर तुम्ही नाश्त्याच्या वेळी जर दूध घेतले तर तुमच्या शरीराला अनेक चांगले घटक मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे दूधाचा तुमच्या आहारात समावेश करायला हवा. 
  2. स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश करताना तुम्ही गायीच्या शुद्ध तुपाचा समावेश करायला हवा. डालडा हा आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळे तूप आणि वनस्पतीचा गोंधळ घालू नका. 
  3. भाज्यांचाही आहारात तितकाच समावेश करायला हवा. आठवड्यात दररोज पालेभाजी आणि कडधान्यही योग्य प्रमाणात असायला हवीत. 
  4. आयुर्वेदानुसार उपवास हा देखील आरोग्यासाठी चांगला असतो. उपवास करत असाल तर त्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली होण्यास मदत मिळते. शिवाय तुमचे पोटही स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

आता आयुर्वेदानुसार तुमच्या आहारात या गोष्टीचा समावेश कराल तर या काही गोष्टींचा समावेश करायला हवा. 

Read More From आरोग्य