आरोग्य

नुडल्सचे सेवन करा बंद, पडेल हा महत्वाचा फरक

Leenal Gawade  |  Jul 1, 2022
नुडल्सचे सेवन आताच करा बंद

नुडल्स हा अनेकांच्या आवडीचा असा जंक फुडचा प्रकार आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही नुडल्सचे सेवन करता येतात. वेगवेगळ्या प्रकारे नुडल्स बनवता येतात. अगदी नुकते दात येणाऱ्या बाळांनाही पटकन नुडल्स खाता येतात म्हणून आवडतात. नुडल्स आवडण्यामागे आणखी एक कारण असते ते म्हणजे नुडल्स चमचमीत लागतात. पण जी वस्तू चमचमीत लागते ती आरोग्यासाठी चांगली असेतच असे नाही. नुडल्सचे सेवन जर तुम्ही काही काळापासून करत असाल तर तुमच्या शरीरात झालेले काही बदल तुम्ही नोंदले आहेत का? एकदा आरशात स्वत:ला नीट बघा. तुमच्या शरीरात आणि आरोग्यात काही फरक पडला आहे का? ते एकदा पाहा. तुम्हाला नक्कीच तुमच्यामध्ये झालेले बदल जाणवतील. याचे सेवन पूर्णपणे बंद केले तर तुमच्या आरोग्यात हा मोठा फरक पडेल.  मैद्यापासून बनवलेले पदार्थ हे चवीला चांगले लागले तरी देखील ते आरोग्यास घातक असतात.

अधिक वाचा : आधी चायनीज आणि आता कोरियन पदार्थांनी लावलेय सगळ्यांना वेड

वजन होईल कमी

Noodles

वजन वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यापैकी एक आहे ते म्हणजे जंक फूड. नुडल्स हे अत्यंत आवडीचे असे जंकफूड आहे. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडिअम (Sodium) असते. जे तुमच्या शरीरातील मिठाचे प्रमाण वाढवते.शिवाय तुमचे वजन वाढवण्यासही कारणीभूत ठरते. तुमचे वजन वाढते हे जितके खरे तितके तुमचे शरीर वेगळेच फुगते. पोटाचा आकार वाढतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळेही वजन वाढते. ज्यावेळी तुम्ही नुडल्सचे सेवन पूर्णपणे बंद करता त्यावेळी तुमच्या वजनामध्ये फरक दिसून येतो. तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. अगदी आठवड्याभरात तुमचे वजन तुम्हाला 1-2 किलोंनी कमी झालेले दिसेल.

फेस फॅट होईल कमी

नुडल्सच्या अतिसेवनाचा परिणाम हा तुमच्या चेहऱ्यावर अधिक दिसून येतो. तुमच्या चेहऱ्यावरील फॅट अगदी पटकन वाढते. डबल चीन, गाल आणि तुमचा चेहरा सुजलेला दिसू लागतो. नुडल्समधील सोडिअम आणि मैदा यामुळे शरीरातील फॅट वाढते. जे तुमच्या त्वचेचे फॅट वाढवण्यास मदत करते. सुरुवातीला हे फॅट जास्त दिसत नाही. पण नतंर हे फॅट चेहऱ्यावर दिसू लागते. चेहरा, गाल,हनुवटी ही खूप भरलेली दिसू लागते. ज्यामुळे तुमचे वय अधिक आहे असे वाढते. वाढलेल्या फॅटमुळे चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा दिसण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही पूर्णपणे नुडल्सचे सेवन बंद करा. तुमच्या चेहऱ्यावरील फेसफॅट कमी होण्यास मदत मिळेल. 

पोटाचे आरोग्य सुधारेल

फेस फॅट होईल कमी

नुडल्स हे कितीही चांगल्या घटकांपासून बनवलेले असले तरी देखील त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडते. वेगळ्या धान्यांपासून तयार झालेले नुडल्स आपल्याला तेवढे आवडतील असे नाही. पण मैद्यापासून बनवलेले चमचमीत नुडल्स आवडतीलच. मैदा पोटात अधिक गेला तर त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडते. शौचाला साफ न होणे, पोट फुगणे, गॅस होणे असे त्रास होतात. जसे तुम्ही मैद्याने भरलेला हा पदार्थ खाणे बंद करता त्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य पूर्ववत होण्यास मदत मिळते. 

आता नुडल्सचे सेवन आताच करा बंद आणि तुमच्यात करा हे चांगले बदल

अधिक वाचा : प्रोटीन पावडरचे सेवन ठरु शकते आरोग्यास हानिकारक

Read More From आरोग्य