Acne

हॉर्मोनल एक्ने म्हणजे काय, कसा कराल उपाय

Trupti Paradkar  |  Mar 8, 2022
हॉर्मोनल एक्ने म्हणजे काय, कसा कराल उपाय

एक्ने अथवा पिंपल्स चेहऱ्यावर येण्याचा त्रास अनेकांना जाणवतो.  बऱ्याचदा त्वचेची योग्य निगा राखूनही एक्ने निर्माण होतात. अशा वेळी महिला वैतागून महागड्या स्कीन ट्रिटमेंट आणि क्रीमचा वापर करू लागतात. पण असं करूनही हवा तसा परिणाम मिळतोच असं नाही. यासाठी तुम्हाला एक्ने होण्यामागचं कारण आधी समजून घ्यायला हवं. कारण बऱ्याचदा तुमच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तुम्हाला हॉर्मोनल एक्नेचा त्रास होत असतो. यासाठी जाणून घ्या हॉर्मोनल एक्ने म्हणजे काय आणि कसा करावा यावर उपाय. यासोबतच जाणून घ्या चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी बेस्ट क्रीम (Best Cream For Acne Scar In Marathi)

हॉर्मोनल एक्ने का येतात

वीस ते तीस वयोगटातील महिलांना हॉर्मोनल एक्नेचा त्रास जाणवत असतो. कारण या वयात शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा हा परिणाम असतो. मासिक पाळीच्या काळात शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजीन या दोन महत्त्वाच्या हॉर्मोन्सच्या पातळीत चढउतार होतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक्ने निर्माण होऊ शकतात. यासोबतच शरीरात टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत अचानक वाढ होण्यामुळेही तुमच्या त्वचेवर पिंपल्स येतात. ज्या महिलांना पीसीओएस अथवा पीसीओडीचा त्रास आहे अशा महिलांना चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रासही सहन करावा लागतो. बऱ्याच जणींना चुकीचा आहार घेतल्यामुळेही शरीरावर असे परिणाम दिसू लागतात. महिलांना किशोरवयात, मासिक पाळीच्या दरम्यान आणि मेनोपॉजच्या काळात चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढते कारण हे हॉर्मोनल एक्ने असतात.

हॉर्मोनल एक्ने कसे ओळखावे

एक्नेचा त्रास तेलकट त्वचा, अस्वच्छता यामुळेही होतो. त्यामुळे हॉर्मोनल एक्ने कसे ओळखावे हे तुम्हाला माहीत असायला हवं

काय कराल उपचार

हॉर्मोनल एक्नेवर उपचार करण्यासाठी तुम्हाला योग्य वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. कारण तुमचे हॉर्मोनल संतुलन झाले की या समस्या हळू हळू कमी होतात. मात्र यासोबत तुम्ही काही घरगुती उपाय यासाठी करू शकता. 

आम्ही शेअर केलेले उपाय तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुमच्या एक्नेच्या निर्मितीवर काय परिणाम झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समधून जरूर कळवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Acne