अॅस्ट्रो वर्ल्ड

जाणून घ्या काय लक्ष्मी-नारायण योग, काय होतो फायदा

Leenal Gawade  |  Jul 15, 2022
लक्ष्मी- नारायण योग

 योगायोगवर तुम्हीही विश्वास ठेवत असाल तर आजचा विषय तुम्हाला आवडेल असा आहे. कारण अनेक योग हे आपल्या आयुष्यात आनंद तर काही योग आपल्या जीवनात काही कठीण प्रसंग घेऊन येत असतात. उदा. षडाष्टक योग हा लग्नादरम्यान पाहिला जातो. असा योग असेल तर सहसा लग्न केले जात नाही. त्यामागेही काही कारणे आहेत. असाच आहे तो म्हणजे ‘लक्ष्मी- नारायण योग’ असा योग काही राशींसाठी फारच शुभ असतो. नेमका कोणत्या राशीला याचा फायदा होणार आहे आणि हा योग काय आहे चला आपण घेऊया याची अधिक माहिती

लक्ष्मी-नारायण योग म्हणजे काय?

लक्ष्मी- नारायण योग

लक्ष्मी-नारायण योग म्हणजे शुक्र आणि बुध ग्रहाची युति. यामुळे जो संयोग जुळून येतो त्याला लक्ष्मी- नारायण योग असे म्हटले जाते. यंदा 13 जुलैपासून मिथुन राशीत शुक्र आणि बुध ग्रह विराजमान झाले आहेत. आता ज्या राशीत हे विराजमान होणार त्यांना लक्ष्मी अर्थात पैसा आणि नारायण म्हणजे स्थैर्य याचा योग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा काही राशी आहेत यांना या काळात याचा अनुभव येऊ शकतो असे सांगितले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीला होणार आहे याचा सगळ्यात जास्त फायदा. 

तुळ रास:

जर तुळ राशीच्या व्यक्ती काही आर्थिक संकटातून जात असतील अशांसाठी हा योग हा खूपच चांगला असणार आहे. कारण त्यांना आर्थिक संकटातून थोडी मुक्ती मिळणार आहे. जर तुम्ही कर्जात असाल तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हा पैसा तुम्हाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला कोणतीही दिशा मिळत नसेल तर अशांना योग्य दिशा मिळायला या काळात मदत होईल. ज्यांना पुढे काय करायचे हे कळत नसेल अशांसाठी काही व्यवहार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या काळात चांगली संधी मिळत असेल तर ती लगेच स्विकारा. त्यानुसार कामाला लागा. 

सिंह रास :

सिंह राशीच्या लोकांनाही लक्ष्मी- नारायण योगाचा फायदा होणार आहे. नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला यावेळात येण्याची दाट शक्यता आहे. धनलाभाचा फायदा तुम्हालाही होणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तिंना परदेशवारी होण्याची शक्यता आहे. या परदेशवारीतून भविष्यात त्यांना चांगला फायदा होईल. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहात आहात किंवा एखाद्या प्रपोझलची तुम्ही वाट पाहात आहात या गोष्टी तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास:

 कुंभ राशीच्या व्यक्ती जर व्यवसाय करणाऱ्या असतील तर अशांसाठी हा काळ फारच शुभ असा जाणार आहे. त्यांना व्यवसायात चांगली वाढ मिळण्याची शक्यता आहे.  जर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये काही गुंतवणूक केलेली असेल तर तुम्हाला त्यातून आर्थिक लाभाची शक्यता आहे.  नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही शुभलाभ होणार आहे. 

आता या राशीच्या लोकांना या लक्ष्मी-नारायण योगाचा चांगलाच फायदा होणार आहे. 

Read More From अॅस्ट्रो वर्ल्ड