आरोग्य

पाण्याचे फोड म्हणजे काय? अशी घ्या काळजी

Leenal Gawade  |  Apr 26, 2022
असा घालवा पाण्याचा फोड

 व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि व्यक्ती तितक्या व्याधी असे उगाचच म्हटले जात नाही. कारण दरपावलागणिक प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास असतात. त्वचेसदंर्भातील लाखोंनी वेगवेगळे त्रास काहींना असतील. आता पिंपल्स हा त्यातलाच एक बरं का? पण त्याहूनही अधिक अशा समस्या त्वचेला होत असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘पाण्याचे फोड’ या बद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?  नसेल तर आज आपण पाण्याचे फोड म्हणजे काय? याची माहिती घेणार आहोत. शिवाय असे फोड आल्यानंतर नेमकं काय करायचं ते देखील सांगणार आहोत चला तर करुया सुरुवात. 

पाण्याचे फोड म्हणजे काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या ठिकाणी भाजले तर पटकन येणारा फुगीर असा फोडीलाच पाण्याचे फोड असे म्हणतात.  भाजण्याखेरीज शरीरावर पाण्याचे फोड येतात का? असे विचाराल तर हो. घर्षण किंवा प्लास्टिकचे शरीराला होणारे घर्षण यामुळे देखील पाण्याचे फोड येतात. एखादी नवीन चप्पल घातल्यानंतर अचानक आपल्या पायावर असे फोड दिसू लागतात. हे फोड रंगहीन असल्यामुळे दिसत नाहीत. पण त्यांना जरा जरी धक्का बसला तरी देखील डोक्यात कळ जाते. इतकेच नाही तर त्यातून पांढऱ्या रंगाचे द्रव्य बाहेर पडते. खरंतर पाण्याचे फोड हे आपल्या रक्तातील रंगहीन द्रव्यापासूनच बनतात. त्यामुळे ते रक्तच असते पण रंगहीन. काही काळ हे फोड खूप दुखतात. पण त्यानंतर काहीच तासात त्याचे दुखणेही कमी होते. पण हा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असू शकतो. 

पाण्याचा फोड आल्यानंतर अशी घ्यावी काळजी

तुमच्या त्वचेवर असा पाण्याचा फोड आला की, लगेच पॅनिक होऊ नका. यावर तुम्हाला काही साधे सोपे असे उपाय करता येतात. 

  1.  पाण्याचा फोड आला असेल तर लगेचच तुमचा हात पाण्याखाली धरा. कारण जर तुम्हाला काही कारणामुळे जळजळ होत असेल तर ती जळजळ होणे पटकन थांबेल 
  2. घरी तूप हे सगळ्यांच्यात असतं. जर तुम्हाला पटकन उपाय हवा असेल तर तूप घ्या आणि ते त्या जागी लावा त्यामुळेही तुम्हाला थंडावा मिळ्ण्यास मदत मिळते. 
  3. पेट्रोलिअम जेली हा देखील त्यावर उत्तम असा पर्याय आहे. त्यामुळे त्यावर पेट्रोलिअम जेली लावली तरी चालू शकेल. 
  4. थंड पाण्याखाली हात धरला तरी देखील चालू शकते. त्यामुळेही थंडावा मिळण्यास मदत मिळते.  
  5. बाजारात हल्ली अशा त्वचेच्या त्रासासाठी ऑईन्मेंट मिळतात. त्यांचा उपयोग करुनही तुम्हाला आराम मिळवता येईल.
  6. जखम होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही थंड करणाऱ्या क्रिम देखील लावू शकता.त्यामुळेही तुम्हाला आराम मिळू शकता. 

आता पाण्याचा फोड आला असेल तर तुम्ही अशापद्धतीने काळजी घ्या. 

Read More From आरोग्य