Fitness

कधी करावा प्राणायाम, सुरुवात करण्याआधी जाणून घ्या महत्त्व

Trupti Paradkar  |  Aug 3, 2021
What is the best time to do pranayam

कोरोनामुळे सध्या सर्वांना आरोग्याचे महत्त्व नक्कीच पटले आहे. या काळात शरीराचे आरोग्य आणि मनाचे स्वास्थ्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने, मेडिटेशन आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण तुमच्या मानसिक स्थितीचा तुमच्या शारीरिक स्थितीवर नकळत परिणाम होत असतो. व्यायाम,योगासनामुळे शरीर तंदरुस्त होते आणि मेडिटेशन, प्राणायामामुळे मन शांत आणि निवांत होते. योग्य  आहार आणि नियमित व्यायामाचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. मनात सतत चिंता, काळजीचे विचार येत असतील तर प्राणायामाचा सराव केल्यास चांगला फायदा होतो. मात्र यासाठी उद्यापासून लगेच प्राणायामाला सुरुवात करणार असाल. तर थोडं थांबा, कारण त्याआधी तुम्हाला प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि वेळ माहीत असायला हवी. 

गरजेपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरावर होतात हे गंभीर परिणाम

कसा करावा प्राणायाम –

प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. प्राण म्हणजे जीव आणि आयाम म्हणजे नियंत्रण किंवा संतुलन… अर्थात आपल्या शरीरात जीव स्वरूपात सतत सुरू असलेल्या श्वासावर नियंत्रण मिळवणं. श्वासावर नियंत्रण मिळवायचे म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे यात लयबद्धता आणणे. कारण श्वास जितका संथ आणि लयबद्ध होतो तितके आपले श्वास म्हणजेच आयुष्य वाढत जाते. आजकाल धकाधकीच्या जीवनात सर्वच गोष्टी घाईघाईत करण्याची माणसाला सवय लागली आहे. ज्यामुळे धापा टाकणे, श्वास घेण्यास त्रास होणे, असे त्रास जाणवतात. योगाभ्यासामध्ये यासाठी खास प्राणायामाचा सराव करून घेतला जातो. श्वास घेण्याची पद्धत, श्वास रोखणे आणि पुन्हा सोडणे यावर नियंत्रण मिळवल्यामुळे आपोआप तुमच्या मनावर नियंत्रण प्राप्त होते. श्वास जितका लयबद्ध आणि संथ होतो तितके तुमचे मन निवांत होत जाते. ज्याचा परिणाम तुमच्या शारिरीक स्वास्थावर होतो. मात्र प्राणायामाचा सराव नेहमीम तज्ञ्ज व्यक्तीकडूनच शिकून घ्यावा. नाहीतर चांगल्या परिणामाऐवजी विपरित परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असते. 

चाळीशीनंतर झोप झाली असेल कमी तर वापरा सोप्या टिप्स

प्राणायाम करण्याची योग्य वेळ कोणती –

तज्ञ्जांच्या मते प्राणायाम हा नेहमी सकाळच्या वेळी करणे योग्य आहे. कारण सकाळी आपले पोट पूर्ण रिकामे असते. उपाशीपोटी प्राणायाम केल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. शिवाय सकाळी वातावरणामध्ये ताजी हवा असते. ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. मात्र याचा अर्थ जर तुमच्याजवळ सकाळी वेळ नसेल तर तुम्ही प्राणायाम करूच शकत नाही असा होत नाही. जर तुम्ही प्राणायामासाठी सकाळी वेळ काढू शकत नसाल तर तुम्ही संध्याकाळी देखील प्राणायाम करू शकता. मात्र त्याआधी तुम्ही कमीत कमी तीन ते चार तास उपाशी असायला हवं. प्राणायाम करताना स्वच्छ  आणि हवेशीर जागी  बसावे. आरामदायक कपडे घालावे. सुरुवातील फक्त श्वसनावर नियंत्रण ठेवणारा अथवा श्वासाकडे लक्ष ठेवण्याचा सराव, ओमकाराचा सराव करावा. त्यानंतर तज्ञ्जांच्या देखरेखी खाली प्राणायामातील पुढील टप्पे शिकत जावे. यासोबतच जर तुम्ही विनाकारण चिंता करत असाल तर करा हे सोपे उपाय

Read More From Fitness