आरोग्य

अचानक वाढलं असेल ब्लड प्रेशर तर, लगेच करा हे उपाय

Trupti Paradkar  |  Apr 6, 2022
what to do to immediately if increase blood pressure

उच्च रक्तदाब (High blood Pressure) चं प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. सध्या वाढलेलं कामाचा वेग, धावपळ, चिंता, काळजी, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, नात्यामधील दुरावा अशा अनेक गोष्टी रक्तदाब वाढण्यास कारणीभूत असू शकतात. या समस्येवर नियंत्रण न मिळवता आल्याने शेवटी बरेच लोक औषधांचा आधार घेतात. मात्र जर तुम्ही चुकून बीपीची गोळी विसरला अथवा चिंता काळजी वाढली तर अचानक रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की भीतीनेच अनेकांना इतर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी अशा वेळी न घाबरता काही घरगुती उपाय करायला हवेत. यासाठी रक्तदाब वाढल्यास काय करावे हे जरूर वाचा.

रक्तदाब वाढल्यास पटकन या गोष्टी करा

रक्तदाब वाढण्याची कारणे अनेक असू शकतात. मात्र तुम्ही काही गोष्टी त्वरीत केल्या तर तुमचा रक्तदाब नक्कीच कमी होतो.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपाय

रक्तदाब जर सतत वाढत असेल तर जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता.यासाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्यारक्तदाब वाढल्यास इतर अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. यासाठी वेळीच तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम केला आणि आहार संतुलित ठेवला तर तुमचा रक्तदाब वाढण्याची शक्यता कमी होते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ असायला हवेत. संत्री, लिंबू, मोसंबी, स्टॉबेरी अशा फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अॅंटि ऑक्सिडंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात ही फळं जरूर समाविष्ट करा. आहारातून मीठाचे प्रमाण कमी करूनही तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रित करू शकता. कारण मीठातील सोडियम तुमच्या रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य