तुम्ही कधी तुमची नखं नीट निरखून पाहिली आहेत का? नसतील पाहिली तर आताच बघा.कारण प्रत्येकाच्या नखांचा रंग हा सारखा नसतो. तुमच्या त्वचेच्या रंगाचा आणि नखांचा काही संबंध आहे तर अजिबात नाही.तुमच्या नखांच्या रंगाचा संबंध थेट तुमच्या आरोग्याशी आहेत. तुमच्या शरीरातील काही यंत्रणा बिघडल्या आहेत. हे तुम्हाला तुमच्या नखांच्या आरोग्यावरुन अगदी हमखास ओळखता येऊ शकते. तुमच्या नखांचा बदललेला रंग तुमच्या आरोग्याविषयी काय सांगतो ते जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला काही गोष्टींची काळजी अगदी आधीच व्यवस्थितपणे घेता येईल.
लिपस्टिक लावण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
फिकट रंग
जर तुमच्या नखांचा रंग तुम्हाला आधीच्या तुलनेत फिकट जाणवत असेल तर तुम्हाला काही गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक असते. अॅनेमिया, ह्रदयविकार, किडनीचे विकार आणि अपुरे पोषण हे यामागील कारण असते. जर तुमची नखं तुम्हाला अशा रंगाची दिसत असतील तर तातडीने तुम्ही याची काळजी घ्यायला हवी.
या संख्यांना का मानले जाते अशुभ, जाणून घ्या कारण
पांढरी नखं
नखांचा रंग हा पांढराशुभ्र कधीच नसतो. तर ती थोडी गुलाबीसर दिसतात. पण जर तुमच्या नखांचा रंग पूर्णपणे पांढरा झाला असेल तर किडनीचे विकार, कावीळ असे काही आजार होण्याची शक्यता अधिक असते.
पिवळी नखं
अनेकदा हा त्रास आपल्याला होतो. खूप जणांची नखं थोडी पिवळसर झालेली तुम्ही पाहिलीही असतील. पिवळी नख ही फंगल इन्फेक्शनची लक्षण आहेत. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुमची नख जाड होई लागातत किंवा तुटूही लागतात. जर तुमच्या पिवळ्या नखांचा त्रास अधिकच वाढत असेल तर महिलांना थायरॉईडचा त्रास होऊ शकतो. याशिवाय डाएबिटीझ किंवा सोरायसिस होण्याचीही शक्यता असते.
निळी नखं
नखांचा रंग निळा असू शकतो हे तुम्हाला पटत नसेल. पण तुम्हाला काही खास तक्रारी जाणवत असतील तर तुमच्या नखांना थोडीशी निळी झाक येते. याचा अर्थ तुमच्या शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा अपुरा आहे. ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा झाल्यामुळे तुम्हाला फुफ्फुसांचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय त्यामुळेच तुम्हाला ह्रदयविकार ही जडू शकतात.
खडबडीत नखं
अनेकांची नखं खडबडीत असतात किंवा त्यावर बारीकबारीक खड्डे असतात.अशी नखं ही सोरायसिसच्या पहिल्या टप्प्याची लक्षणे आहेत किंवा संधिवाताची. नखांचा रंग जाणे हे यामध्ये अगदी साहजिक असते.
तुटलेली नखं
वयपरत्वे काहींची नखं तुटतात. पण काहींना वयाच्या आधीच हा त्रास होऊ लागतो. नखं दुभंगणे, नख सतत तुटणे, तुटलेल्या नखांचा भाग पिवळा दिसणे असा त्रास हा एखाद्या फंगल रिअॅक्शनशी निगडीत असा त्रास आहे.
काळी नखं
नखांचा रंग अनेकदा काळा पडतो. तुम्ही अनेकांची नखं काळी होताना पाहिली असतील .जर नखं अशापद्धतीने काळी पडत असतील. तर तुम्हाला काही गंभीर आजार असण्याची शक्यता आहे. अशी नखं मेलनोमा आणि गंभीर त्वचारोागाशी निगडीत आहेत.
कुरतडलेली नखं
नखं कुरतडण्याची अनेकांना सवय असते. ही सवय कोणत्या आाजाराची लक्षण आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मानसिक आजाराशी ती निगडीत असतात. तुम्ही अस्वस्थ असाल किंवा तणावाखाली असाल तर हा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून घेणे चांगले असते.
जर तुमचीही नखं असा काही संकेत देत असतील तर तुम्ही त्याकडे अधिक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला आरोग्याशी निगडीत असलेला त्रास वेळीच कळू शकेल.