सकाळी उठल्यावर तुम्ही तुमचा चेहरा आरश्यात नक्कीच पहात असाल. निरोगी राहण्यासाठी तुमच्या चेहऱ्यासोबत तुमची जीभ देखील पाहण्याची सवय लावा. कारण जीभ हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. जीभेमुळे तुम्हाला विविध प्रकारच्या चवींचे ज्ञान होते. जीभ हे ज्ञानेद्रिंय आणि कर्मेद्रिंय सुद्धा आहे. कारण चवीसोबतच बोलण्यासाठीदेखील जीभ महत्त्वाची आहे. एवढंच नाही तर जीभेवरून तुम्हाला तुमचे आरोग्य कसे आहे हे देखील समजू शकते. कारण जीभ हा तुमच्या आरोग्यासाचा आरसा असते. एखाद्या आरोग्यसमस्येचे निदान जीभेचं परिक्षण करून देखील करता येतं. जीभेचा आकार, रंग यात बदल झाल्यास आरोग्य समस्याचे सकेंत मिळू शकतात. यासाठी दररोज सकाळी जीभ आरश्यात पाहण्यास मुळीच विसरू नका.
जीभेवर हलक्या लाल रंगाचा थर जमा होणं –
जर तुमची जीभ हलक्या गुलाबी रंगाची असेल तर काळजी करण्याचं काहिच कारण नाही. कारण गुलाबी रंगाची जीभ हे निरोगी आयुष्याचं लक्षण आहे. मात्र जर तुमच्या जीभेवर लाल रंगाचा थर जमा झाला असेल तर तुम्हाला माऊथ अल्सर झाल्याचं ते एक लक्षण असू शकतं. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होतं आणि शरीर डिहायड्रेट होण्यास सुरूवात होते. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे जीभ कोरडी होते. शिवाय शरीरातील व्हिटॅमिन 12 कमी झाल्यामुळे देखील जीभेवर उष्णतेचे फोड दिसू लागतात.
जीभेवर पिवळ्या रंगाचा थर जमा होणं –
जर तुमच्या जीभेवर पिवळ्या रंगाचा थर जमा झाला असेल तर या गोष्टीकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. कारण याचा अर्थ दात स्वच्छ करताना तुम्ही जीभेची योग्य काळजी घेत नाही आहात. जीभेवरील जीवजंतू स्वच्छ न केल्यास जीभ पिवळ्या रंगाची दिसू लागते. जर वेळीच लक्ष दिले नाही तर तुम्हाला तोंडाला दुर्गंध येणं अथवा ताप येण्याची शक्यता असते.
जीभेवर पांढऱ्या रंगाचा थर जमा होणं-
जर तुमची जीभ आतून पांढऱ्या रंगाची झाली असेल तर तुम्हाला जीभेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण अस्वच्छतेमुळे फंगल इनफेक्शन झाल्यास जीभ पांढऱ्या रंगाची दिसू लागते. असं असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी काही लक्षणे-
जीभेची चव जाणे-
कधी कधी अचानक तोंडाची चव कमी होते अथवा जेवणात रस वाटेनासा होतो. हे लक्षण मुळीच चांगले नाही. कधी कधी ताप अथवा एखाद्या औषधांच्या सततच्या सेवनामुळे असे होऊ शकते. कधी कधी वाढते वयोमान अथवा इनफेक्शनमुळेही जीभेवरील टेस्टबड्स कमी होतात. मात्र अशी कोणतीही कारणं नसताना जीभेची चव गेली असेल डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधोपचार करून पुन्हा पूर्ववत होणं शक्य आहे.
जीभेला सूज येणे-
इनफेक्शन जीभेला सूज अथवा जळजळ जाणवते. काही आजारसमस्यांच्या औषधांच्या सेवनामुळे तुमच्या जीभेला सूज येऊ शकते. जर तुम्ही एखादे औषध घेत असाल आणि त्यानंतर तुमच्या जीभेला सूज आली तर तुमच्या डॉक्टरांना याबाबत अवश्य सांगा.
जीभेतून वेदना जाणवणे-
काहीजणांना जीभेतून वेदना आमि जळजळ जाणवते. यामागचे कारण अशक्तपणा, जीवनसत्वाची कमतरता, जठर विकार, दातांवर केले जाणारे उपचार अशी अनेक कारणं असू शकतात. मात्र जीभेतून होणाऱ्या वेदनांमुळे तुम्हाला बोलताना, खाताना, अन्न गिळताना, दात घासताना त्रास होतो. मॅनोपॉज ,टॉन्सिल्स, हॉर्मोनल असंतुलन यामुळेदेखील तुम्हाला जीभेतून वेदना जाणवू शकतात.
अशा प्रकारचा त्रास होत असेल अथवा जीभेचा रंग बदलला असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्राथमिक उपचार करण्यासाठी तुम्ही मीठ टाकलेल्या गरम पाण्याच्या गुळण्या नक्कीच करू शकता.
निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’
दातदुखीसाठी घरगुती उपाय, मिनिटात मिळेल आराम
मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम