बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान आपल्या फिल्मी करिअरसोबतच अनेक समाजोपयोगी कामांमध्येही नेहमीच पुढे असतो. अशाच एका सामाजिक कामाच्या निमित्ताने आमिरने आपली जुनी को-स्टार माधुरी दीक्षितला विचारलं आणि तिनेही लगेच होकार दिला.
आमिर आणि माधुरीची सुपरहिट जोडी
आमिर खान आणि माधुरी दीक्षित या जोडीने एकेकाळी ‘दिल’सारखा सुपरहीट चित्रपट दिला होता. तसंच दिवाना मुझ सा नही हा चित्रपटही एकत्र केला होता. पण त्यानंतर मात्र काही ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली नाही. मग अचानक असं काय झालं की, आमिरने चक्क माधुरीचे आभार मानले.
वडील आमिर खानला आहे मुलगा जुनैद खानबाबत विश्वास
आमिरच्या एका शब्दावर माधुरीने दिला होकार
सध्या आमिरने आपल्या बायको किरण रावसोबत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी पानी फाउंडेशन ही संस्था सुरू केली आहे. त्याच्याशीच निगडीत एक मराठी कार्यक्रम हे जोडपं सध्या होस्ट करत आहे. या मराठी शो चं नाव आहे ‘तुफान आलंया‘. या शोमध्ये अनेक सेलेब्सना बोलावण्यात येतं.
हे सेलिब्रिटीज शोमध्ये येऊन आपल्या आयुष्यातील प्रेरणादायी गोष्टी सांगतात. नुकतंच या शोमध्ये बॉलीवूडच्या धकधक गर्लनेही हजेरी लावली. यावेळी माधुरीनेही आपल्या आयुष्यातील चांगले आणि वाईट अनुभव शेअर केले.
या शोमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आमिर खानने माधुरी दीक्षितचे सोशल मीडियावर आभार मानले. त्याने इन्सटावर केलेल्या पोस्टमध्ये माधुरीला म्हटलं की, माझ्या एका आग्रहावर तू शो ला येण्यासाठी लगेच होकार दिलास. तुझे खूप आभार.
माधुरीने नुकत्याच रिलीज झालेल्या कलंक या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती अनेक वर्षांनंतर अभिनेता संजय दत्तसोबत दिसली. तर आमिर खानही सध्या लाल सिंह चढ्ढा या चित्रपटात व्यस्त आहे. आमिरने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सूत्रानुसार, लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट हॉलीवूडच्या प्रसिद्ध फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन करत आहे.
जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी
मराठी कलाकारांचाही पानी फाऊंडेशनमध्ये समावेश
आमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामात अनेक मराठी कलाकारही सहभागी आहेत. ज्यामध्ये स्पृहा जोशी, ईशा केसकर आणि अनेक मराठी कलाकार आहेत.
या फाउंडेशनकडून यंदाही 1 मे ला श्रमदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या मराठी कलाकारांनी लोकांनाही समाजोपयोगी कामात सहभाग घेणाचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा –
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje