मनोरंजन

जेव्हा जया बच्चन यांच्यामुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू

Trupti Paradkar  |  Apr 28, 2020
जेव्हा जया बच्चन यांच्यामुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू

बॉलीवूडच्या सेलिब्रेटी सासू सुनेच्या जोडीत जया बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन ही जोडी नेहमीच चर्चेत असतं. कधी या दोघींमधील मतभेदाच्या तर चांगल्या बॉंडिंगच्या चर्चा रंगतात.  विश्व सुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने 2007 साली अचानक अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केलं आणि सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला. ऐश आणि अभिषेकच्या लग्नाला आता जवळजवळ बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. ते दोघं आता त्यांच्या सुखी संसारात चांगले रमलेदेखील आहेत. मात्र बच्चन कुटुंब एकत्र राहत असल्यामुळे जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. लॉकडाऊनमध्ये सध्या जया बच्चन दिल्लीमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे बच्चन कुटुंब सध्या जया बच्चन यांना खूप मिस करत आहे. जया बच्चन घरात नसल्या तरी सून ऐश्वर्याने सर्व घराची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे. मात्र सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामधे जया बच्चन लोकांसमोर असं काही बोलल्या होत्या की ते ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तराळलं होतं. जाणून घ्या जया बच्चन ऐश्वर्याला नेमकं काय बोलल्या होत्या जे ऐकून या विश्वसुंदरीला लोकांसमोर रडू आवरता आलं नाही. 

Instagram

असं नेमकं काय घडलं होतं

जया बच्चन यांच्यामुळे ऐश्वर्याला रडू कोसळलेला हा व्हिडिओ 2007 मधील आहे. एका पूरस्कार सोहळ्यात जया बच्चन यांनी प्रेश्रकांसोबत संवाद साधला होता. ज्यावेळी जया बच्चन स्टेजवर होत्या आणि ऐश्वर्या होणाऱ्या पतीसोबत म्हणजेच अभिषेक बच्चन सोबत बसलेली होती. जया बच्चन यांनी अचानक प्रेक्षकांसमोर ऐश्वर्या त्यांच्या घरची सून होणार असल्याची घोषणा केली. ऐश्वर्याचे बच्चन कुटुंबात स्वागत करताना जया यांनी ऐश्वर्याची खूप स्तुती केली होती. सासूच्या तोंडून झालेली स्तुती आणि स्वागत पाहून ऐश्वर्याला गहिवरून आलं. ज्यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

जया बच्चन यांनी या शब्दात केलं होतं आपल्या सुनेचं कौतुक

जया बच्चन ऐश्वर्याची स्तुती करताना म्हणाल्या होत्या की, “लवकरच मी एका सुंदर आणि सद्गुणी मुलीची सासू होणार आहे. एक अशी मुलगी जिचा जगभरात गौरव आणि सन्मान झालेला आहे. जी सतत हसतमुख असते. ऐश्वर्या मी तुझं आमच्या कुटुंबात स्वागत करते. मला तू खूप आवडतेस” होणाऱ्या सासूकडून एवढं कौतुक लग्नाआधीच ऐकल्यावर कोणत्या सुनेला आनंद होणार नाही. खरंतर सासू सुनेचं नातं म्हणजे विळीभोपळ्याचं नातं असं म्हटलं जातं. मात्र या दोघी सासूसुन असण्यासोबत चांगल्या अभिनेत्री, व्यक्तीदेखील आहेत हे यातून दिसून येतं. आजही या दोघी एकमेकींसोबत प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत.तिचं तिच्या सासूसोबत चांगलं बॉंडिंग आहे. ऐश्वर्या नेहमी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र दिसत असते. आईप्रमाणेच ती तिच्या सासू-सासऱ्यांचीही मनापासून काळजी घेते. यावरून ऐश्वर्या तिच्या संसारात किती रमली आहे हे नक्कीच दिसून येतं. 

Instagram

Read More From मनोरंजन