मुलगी वयात आली की, तिच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. काही बदल हे अगदी दिसून येणारे असतात. तर काही बदल दिसून आले नाही तरी देखील त्याचा त्रास जाणवू लागतो. मासिक पाळीनंतर अनेकांना पांढरे पाणी जाण्याचा त्रास होऊ लागतो. पँटीला सतत पांढरे लागत राहते. याला श्वेतपदर असे म्हणतात. श्वेतपदर म्हणजेच White Discharge In Marathi जाणे हे सर्वसामान्य असले तरी त्याचा त्रास अधिक वाढला की, आपोआपच आरोग्याच्या अन्य काही तक्रारी जाणवू लागतात. वजन वाढणे, वजन कमी होणे, थकवा येणे, योनीमार्गाला खाज येणं, त्वचा काळी पडणे असे काही त्रास होऊ लागतात. तुम्हालाही असा व्हाईट डिस्चार्ज किंवा पांढरे पाणी जाण्याचा त्रास होत असेल तर White Discharge In Marathi याची माहिती असायला हवी. याशिवाय Reason Of White Discharge In Marathi हे देखील माहीत असायला हवे. अंगावरुन पांढरे जाणे या त्रासाला ल्यूकोरिया असे देखील म्हणतात. याची योग्य माहिती मिळाली तर महिला आरोग्य राखण्यास मदत होते. चला जाणून घेऊया पांढरे पाणी जाणे घरगुती उपाय
Table of Contents
- अंगावरुन पांढरे जाण्याची कारणे – Reason Of White Discharge In Marathi
- पांढरे पाणी जाणे लक्षणे – White Discharge Ka Hoto In Marathi
- गरोदरपणात अंगावरून पांढरे पाणी जाणे – White Discharge During Pregnancy In Marathi
- अंगावरुन पांढरे जाणे घरगुती उपाय – White Discharge Home Remedies In Marathi
- पांढरे जाणे ट्रिटमेंट मराठी | White Discharge Treatment In Marathi
- FAQ’S
अंगावरुन पांढरे जाण्याची कारणे – Reason Of White Discharge In Marathi
अचानक लघवीला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पँटीला पांढरे चिकट असे काहीतरी लागलेले पाहिले आहे का? यालाच पांढरे पाणी जाणे किंवा श्वेतपदर असे म्हणतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी काही कारणे ही पुढील प्रमाणे
योनी मार्गाची स्वच्छता नसणे
महिला आरोग्यासाठी योनी मार्गाची स्वच्छता ही फारच जास्त महत्वाची असते. योनी माग्र स्वच्छ असेल तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. खूप जण योनी मार्गाची स्वच्छता अजिबात करत नाहीत. त्यांच्यासाठी ही स्वच्छता फार महत्वाची नसते. पण अशामुळेच योनी मार्गाला संसर्ग होऊन त्यातून श्वेतपदर निघण्याची शक्यता असते. हा श्वेतपदर कधीकधी पातळ असतो तर कधी कधी शेंबडासारखा जाड. पांढरे पाणी जाण्यामागे हे एक कारण असू शकते.
चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता
बॅक्टेरिया हे वाईट असतात असे नाहीत तर शरीराला काही चांगल्या बॅक्टेरियाची गरज असते. जर या चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता झाली तरी देखील योनी मार्गातून पांढरे जाण्याची शक्यता असते. जर हा त्रास तुम्हाला सतत होत असेल तर तुम्ही याची तपासणी करायला हवी. जर शरीरात चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता झाली तर त्या संदर्भात तुम्ही योग्य वेळी विचारणे हे कधीही गरजेचे असते.
पीएच लेव्हल बिघडणं
तुमच्या त्वचेचा रंग आणि योनी मार्गाचा रंग हा वेगळा असतो. पण काही जणांना हा भाग खूपच काळा पडू लागतो. अस्वच्छता आणि खूप घट्ट कपडे घालणे यामुळेही या भागाचा पीएच बॅलन्स बिघडू शकतो. एकूणच योनी मार्ग हा स्वच्छ राहात नाही. तुमचा पीएच बॅलन्स बिघडला असेल तर असा त्रास होणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. याकडे वेळीच लक्ष देणे कधीही चांगले.
रोगप्रतिकारशक्ती कमी असणे
निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे असते. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला कोणतेही त्रास होत नाही. पण प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशावेळी असा त्रास होणे हे अगदी स्वाभाविक असते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की, अंगातून पांढरे जाण्याचा त्रास होऊ शकतो. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी उत्तम आहार असणे आवश्यक आहे.
चुकीचे शारीरिक संबंध
शारीरिक संबंधासंदर्भात अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात. शारीरिक संबंधाच्या वेळी जर पांढरं जात असेल ते अगदी सामान्य आहे. काऱण याला प्लेझर असे म्हटले जाते. प्लेझर किंवा सेक्सचा आनंद असेल तर योनीमार्गातून पांढरा स्राव येतो. पण हा पांढरा स्त्राव त्रासदायक ठरत असेल म्हणजे पोटदुखी,योनी मार्गतून वेदना होत असेल तर हा पांढरा स्त्राव त्रासदायक ठरतो.
फंगल इन्फेक्शन
लघवीच्या जागी फंगल इंन्फेक्शन झाले तरी देखील अंगावरुन पांढरे जाण्याचा त्रास होऊ शकतो. सेक्स दरम्यानही असे फंगल इंफेक्शन होऊ शकते. शारीरिक संबंधाच्या वेळी जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. याशिवाय जर हायजिन पाळलं केलं नाही तरी देखील असे फंगल इन्फेक्शन होऊ शकते. अंगावरुन पांढरे जाण्याचे हे एक कारण असू शकते. पांढरे पाणी जाणे घरगुती उपाय हे जाणून घेणे गरजेचे असते.
पांढरे पाणी जाणे लक्षणे – White Discharge Ka Hoto In Marathi
- मासिक पाळीच्या काळात अंगावरुन पांढरे जाणे हे साहजिक आहे. कारण पाळी येण्याआधी पांढरे जाते. त्यावरुन तुम्हाला मासिक पाळी येणार हे कळते. पण जर असा स्त्राव सतत होत असेल तर तो स्त्राव चांगला नाही.
- सेक्सची भावना मनात आल्यानंतर योनी मार्ग हा चिकट होतो. अशावेळीही पांढरा स्त्राव होऊ लागतो.
- कधी कधी अचानक ओटीपोट दुखून येते त्यावेळीही अंगावरुन पांढरे जाणार असते. जर असे ओटीपोट मासिक पाळी व्यतिरिक्त दुखत असेल तर अंगावरुन पांढरे जात असेल.
- मासिक पाळीनंतर ओव्यूलेशनचा काळात देखील चिकट स्त्राव होण्याची शक्यता असते. मासिक पाळीनंतरच्या काळात पांढरे पाणी जाणे ठीक पण त्यानंतरही पांढरे पाणी जात असेल तर काळजी घ्यायला हवी.
- कामाचा ताण आला असेल तर अशावेळी हार्मोन्सचा बॅलेन्स डळमळू शकतो. त्यामुळेही अंगावरुन पांढरे जाणी जाऊ शकते.
अधिक वाचा : प्रोटीन पावडरचे सेवन ठरु शकते आरोग्यास हानिकारक
गरोदरपणात अंगावरून पांढरे पाणी जाणे – White Discharge During Pregnancy In Marathi
गरोदरपणातही अंगावरुन पांढरे पाणी जाण्याचा त्रास होऊ शकतो (pregnancy white discharge in marathi ) का होतो? यामागे कारणं आणि कोणता त्रास होतो ते जाणून घेऊया.
गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स होतो. अशावेळी अंगावरुन पांढरे जाणे हे सामान्य असते. गरोदरपणात अंगावरुन पांढरे पाणी जाणे हे चांगले मानले जाते. कारण त्यामुळे युरिनरी ट्रॅक इंफेक्शनची समस्या दूर राहते. प्रसुतीच्या काळात पांढरा स्त्राव होत असेल तर तो चांगला कारण त्यामुळे बाळ होण्यास मदत मिळते. पण हा स्त्राव लाल होत असेल तर ही धोक्याची सूचना असते. अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते.
अंगावरुन पांढरे जाणे घरगुती उपाय – White Discharge Home Remedies In Marathi
अंगावरुन सतत पांढरे जात असेल तर काही सोपे आणि साधे घरगुती उपाय (home remedies for white discharge in marathi) केले तरी देखील फरक पडू शकतो.
संतुलित आहार
हल्लीचे लाईफ हे खूप धकाधकीचे झाले आहे. आहार हा देखील व्यवस्थित घेतला जात नाही. त्यामुळे अंगावर ताण येणे, मासिक पाळीवर परिणाम होणे असा त्रास होतो. त्यामुळे अंगावरुन पांढरे जाणे वाटते. इतकेच नाही तर असंतुलित आहारामुळे प्रतिकारशक्तीही कमी होऊ लागते. त्यामुळेच जर तुमचा आहार बिघडला असेल तर चांगला आणि संतुलित आहार घ्यायला सुरुवात करा. आहारातून मैदा आणि पोटाला त्रास देणारे असे पदार्थ काढून टाका.
कुळथाचे पाणी
अंगावरुन पांढरे पाणी जाणे उपाय (White Discharge In Marathi) पाहताना तुम्ही अगदी आवर्जून कुळथाचे पाणी प्यायला हवे. कुळथाचे पाणी प्यायल्यामुळे श्वेतपदराचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. एक दिवस आड तुम्ही कुळथाचे दाणे घेऊन तुम्ही ते पाण्यात उकळावे. हे पाणी थंड करुन तुम्ही प्यावे. तुम्हाला श्वेतपदराचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
पुश्यानुग चूर्ण
बाजारात पुश्यानुग चूर्ण नावाचे चूर्ण मिळते. हे आयुर्वेदिक औषध असून त्याचे सेवन केल्यामुळे श्वेतपदराचा त्रास कमी होतो. तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात हे चूर्ण मिळू शकते. हे चूर्ण पाण्यातून घ्यावे. तुम्हाला इतरही काही त्रासातून मुक्तता मिळण्यास मदत मिळेल.
मेथी चूर्ण आणि गूळ
मेथी ही आरोग्यासाठी खूपच चांगली असते. श्वेतपदरासाठीही मेथी आणि गूळ चांगले असते. मेथी भाजून भरडून घ्यावी. त्यात एक चमचा गूळ पावडर घालून त्याचे सेवन करावे. काही दिवसासाठी याचे सेवन करावे आणि मग थांबवावे. मध्ये थांबून थांबून याचे सेवन केल्यामुळे त्याचा फरक पडतो.
गुलाब पावडर आणि दूध
दुधात गुलाब पावडर घालून ते पाणी प्यायले तर श्वेतपदराचा त्रास कमी होऊ लागतो. नियमितपणे तुम्ही गुलाब पावडर दुधात घालून प्या. तुम्हाला काहीच दिवसात झालेला फरक जाणवेल.
आवळा पावडर
आआवळा पावडर किंवा आवळ्याचे सेवन हे देखील श्वेतपदरासाठी चांगली असते. आवळा पावडर नुसती चमचाभर किंवा आवळ्याचा रस पाण्यातून घेतल्यानंतरही पांढरे पाणी जाण्याचा त्रास कमी होतो. पांढरे पाणी जाणे घरगुती उपाय मधील हा सगळ्यात सर्वात सोपा असा उपाय आहे.
अंजीर
अंजीर हे फळ देखील आरोग्यासाठी चांगले असते. अंजीरचे सेवन केल्यामुळे पांढरे पाणी जाणे त्रास कमी होते. दुधातून अंजीर खाल्ले तरी देखील चालू शकते.दुधात अगदी एक अंजीर घालून ते दूध प्यावे.
अधिक वाचा :इंटिमेट वाईप्सची काय आहे गरज, कसा करावा वापर |Importance Of Intimate Wipes And How To Use
पांढरे जाणे ट्रिटमेंट मराठी | White Discharge Treatment In Marathi
पांढरे पाणी जाणे घरगुती उपाय जाणून घेतल्यावर यासंदर्भात असलेल्या ट्रीटमेंटबाबत (white discharge upay in marathi) जाणून घेऊया. पांढरे पाणी जाणे हे सर्वसामान्य असले तरी देखील याचा त्रास जास्त वाढू लागला की, डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. औषधोपचारांने हा त्रास कमी होऊ शकतो. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन मगच औषधांचे सेवन करावे. POPxo मराठीकडून कोणत्याही औषधांची नावे सांगण्यात येत नाहीत. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच औषधोपचार होणे गरजेचे असते.
FAQ’S
प्रश्न : अंगावरुन पांढरे जाणे समस्या गंभीर आहे का?
उत्तर : अंगावरुन पांढरे जाणे हे सर्वसामान्य असले तरीदेखील ती एक गंभीर समस्या तेव्हाच होऊ शकते ज्यावेळी याचा रंग बदलतो. जो पर्यंत हा स्त्राव पांढरा असतो तो पर्यंत तुम्ही निरोगी असता. पण हा स्त्राव जर पिवळा, तांबूस किंवा हिरवट रंगाकडे झुकला. याला वास येऊ लागला की, ही एक गंभीर समस्या आहे हे समजून जावे. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेचे असते.
प्रश्न: अंगावरुन पांढरे जाण्याची लक्षणे कोणती?
उत्तर: अंगावरुन पांढरे जाताना कोणती लक्षणे खास जाणवत नाही. पण तुम्ही पँटी सतत ओली होत राहते. जर योनी मार्गाला खाज येत असेल, त्याठिकाणी लाली आले असेल, तो भाग खूपच जास्त काळवंडला असेल तर तुम्हाला पांढरे जाण्याचा त्रास होत असावा.
प्रश्न: डॉक्टरी इलाजाने अंगावरुन पांढरे जाणे कमी होते का?
उत्तर : अंगावरुन खूप जास्त पांढरे जात असेल तर अशावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने तुमच्या अंगावरुन पांढरे जाणे हे कमी होते. लाईफस्टाईल, आहार या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर झाल्यामुळे असे होत असते. त्यामुळे जर ही समस्या कमी होत नसेल तर डॉक्टरांकडे जाणे कधीही चांगले
अंगावरुन पांढरे पाणी जाणे घरगुती उपाय (White Discharge In Marathi) जाणून घेतल्यानंतर ज्यांना हा त्रास असेल त्यांच्यासोबत ही उपयुक्त अशी माहिती शेअर करा.
अधिक वाचा:PCOS शी लढणाऱ्या महिलांसाठी वरदान आहेत हे हेल्थ सप्लिमेंट्स