केदारनाथ चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केलेली सारा अली खान आता एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे. लवकरच तिचा अतरंगी रे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत रोमांन्स करताना दिसणार आहे. सारा अली खानचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्यामुळे साराचे फोटो, व्हिडिओज आणि वैयक्तिक जीवनातील अपडेट लगेच व्हायरल होतात. आपल्या मुलांचे यश पाहणं, त्यांच्यासोबत ते यश वाटून घेणं हे आईवडिलांचे स्वप्न असते. मात्र यशाच्या शिखरावर चढल्यावरही साराची आई अमृता सिंहला मुलीसोबत म्हणजे सारा अली खानसोबत काम करण्याची मुळीच इच्छा नाही. यामागचं खरं कारण ऐकलंत तर तुम्ही देखील व्हाल हैराण
कतरिना आणि विकीच्या लग्नात कोणाकोणाला आहे खास आमंत्रण
अमृता सिंहला का करायचं नाही सारासोबत काम
सारा अली खानची आई अमृता सिंह ही देखील एक दिग्गज अभिनेत्री आहे. एके काळी तिचे चित्रपट सुपरहिट ठरत होते. सारा अली खानने बॉलीवूडमध्ये येण्यामागे अमृता सिंहनेच तिला प्रेरणा दिलेली आहे. आजही ती सारामागे खंबीरपणे उभी आहे. नुकतंच साराने एका मुलाखतीत तिच्या आईबाबत एक हैराण करणारा खुलासा केला आहे. कारण सारा म्हणाली की एक दिग्गज अभिनेत्री असूनही माझ्या आईला माझ्यासोबत काम करायचं नाही. कारण….
Bigg Boss15: अखेर तेजस्वी आणि करणने व्यक्त केले प्रेम
कारण ऐकून तुम्ही व्हाला आश्चर्यचकीत
साराने याबाबत स्वतः खुलासा केला आहे. तिला एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता की तुला तुझ्या आईसोबत एकत्र चित्रपटात काम करायला आवडेल का ? त्यावर साराने उत्तर दिलं की, तिच्या आईला तिच्यासोबत काम करायचं नाही. याचं कारण साराला असं वाटतं की, “ती माझी आई आहे त्यामुळे ती माझ्यासोबत काम करताना अस्वस्थ होईल. तिच्या मते जर एखाद्या सीनमध्ये माझ्या चेहऱ्यावर केस आले तर ती शूटिंग सोडून आधी मुलीचे केस नीट करणं जास्त पसंत करेल. कारण तिला असं वाटतं की तिच्या मुलीने नेहमीच बेस्ट दिसलं पाहिजे. त्यामुळे अशा अवघड परिस्थितीत तिला टाकणं मलाही चुकीचं वाटतं म्हणूनच आम्ही एकत्र काम करत नाही. ” असं असलं तरी प्रेक्षकांना मात्र भविष्यात दोघी मायलेकींनी एकत्र काम करावं असं नक्कीच वाटतं. एका तेलाच्या जाहिरातीमध्ये त्या दोघींनी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या दोघी चित्रपटातही एकत्र काम करतील अशी आशा त्यांना नक्कीच वाटत आहे.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje