कधी रात्री प्रवास करताना अचानक तुमच्या गाडीच्या मागे कुत्रे लागण्याचा अनुभव तुम्हाला आला आहे का? कारण खूप वेळा रात्री उशीरा गाडी चालवत असताना अचाकन कुत्रे गाडीच्या मागे जोरात पळू लागतात किंवा भुंकू लागतात. अशावेळी गाडी थांबली तर काय होईल? कुत्रे आपले लचके तोडतील असे वाटते. पण असे म्हणतात की, कुत्रे असे भुंकण्यामागेही काही संकेत असतात. संकेत नसले तरी देखील काही कारणे असतात ज्यामुळे कदाचित कुत्र भुकंतात असे सांगितले जाते. चला जाणून घेऊया या विषयी अधिक
कुत्रे हे जितके इमानदार असतात तितकेच ते आक्रमक असतात. काहीतरी चुकले की हल्ला करणे हा त्यांचा गुणधर्म असतो. त्यामुळे त्यांचे वागणे हे सतत बदलत असते. पाळीव कुत्र्यालाही शिस्त लावण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याच्या खाण्याच्या सवयी, भुंकण्याचा सवयी या वेगवेगळ्या असतात. योग्य ट्रेनिंग दिले तर ते त्यापद्धतीने वागतात. पण रस्त्य्यावरचे कुत्रे किंवा इतर न पाळलेले रानटी कुत्रे अचानक काही गाड्यांमागे धावताना पाहिले असतील.
गाडीच्या मागे कुत्रे लागण्याची कारणे (Reason Behind Dog Chasing)
- एखाद्या मोकळ्या रस्त्यावरुन जाताना जर कडेला एखादा कुत्रा असेल त्याला गाडी जोरात जाताना आवाज आला की, त्याला कोणीतरी आपल्याला हुलकावणी देतंय असं वाटतं. त्यामुळे होतं असं की, त्या गाडीच्या मागे कुत्रा जोरदार लागतो. काही किलोमीटर धावल्यानंतर तो कुत्रा माग घेणे कमी करतो. अचानकपणे थांबतो. यामागे त्याचे घाबरणे हे कारण असते.
- कुत्र्यांना खेळायला खूप आवडते. कधी कधी मस्तीत एखाद्या गाडीच्या मागे धावायला लागतात. त्यामागे त्यांचा हेतू दुखापत करणे असा नसतो. पण अशावेळी तुम्ही कुत्र्यांच्या जवळ न जाणेच चांगले असते. गाडी थोडी हळू केली मग कुत्रे आपोआप शांत होतात. त्यामुळे त्यांच्या शांत होण्याची थोडी वाट पाहा.
- प्रत्येक कुत्र्याची एक सीमा ठरलेली असते. त्या सीमेपलिकडे ते एक पाऊलही ठेवू शकत नाही. कुत्रे हे अनेकदा तुम्हाला काही संकेत देत असतात असे सांगितले जाते. जर त्यांना कसली भीती वाटत असेल तर असे होणे अगदी साहजिक आहे.
- गंधावरुन कुत्रे एकमेकांना ओळखत असतात. जर एखादा अनोळखी वास जर आला तरी देखील कुत्रे लगेचच भुंकण्यास सुरुवात करतात. त्यामध्ये तुम्हाला त्रास देणे असा अर्थ नसतो. तुम्ही जर थोडं शांत राहिलात तर तुमचा पाठलाग करणे सोडून देतात.
- असे म्हणतात, पुढे काही धोका असेल तर अशावेळी संकेत देण्यासाठी कुत्रे भुंकतात. कुत्रे भुंकल्यामुळे तुम्ही घाबरुन गाडी थोड्या कमी गतीने चालवू लागतात. असे या संदर्भात सांगितले जाते.
- वाहनांवर लाईट्स असतात. हे लाईट्स अनेकदा खूप कुत्र्यांना त्रास देतात. अशावेळी लाईट्सचा माग काढण्यासाठी कुत्रे वाहनांच्या मागे जोराने धावतात.
- कुत्र्यांना गती आवडत नाही. चाक गोलाकार फिरताना त्यांना दिसली की, त्यांना पकडण्यासाठी ते धावतात. त्यामुळे होते असे की, आपल्याला ते आपला पाठलाग करते असे वाटत राहते.
तर या काही कारणांसाठी कुत्रे हे गाडीच्या मागे धावतात. त्यामध्ये घाबरुन जाण्याचे काही कारण नाही.