आरोग्य

या कारणांसाठी रात्री कधीही खाऊ नये दही

Leenal Gawade  |  May 13, 2022
रात्री चुकूनही खाऊ नका दही

 उन्हाळ्यात थंड काहीतरी खावेसे वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे. त्यातल्या त्यात पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक जण दही खाण्याचा सल्ला देतात. पण दही खाण्याची योग्य वेळ माहीत हवी. दह्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि एन्झाईम्स पोटाच्या आरोग्यासाठी फारच फायद्याच्या असतात. दही रात्री का खाऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्यामागेही काही कारणं आहेत. जाणून घेऊया दही रात्री न खाण्यासाठीची काही कारणं. ही कारण तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकता. चला जाणून घेऊया ही काही कारणं

रात्री का खाऊ नये दही?

आपल्या आयुर्वेद शास्त्रात दह्याचे रात्री सेवन करु नका असे लिहून ठेवले आहे. दह्यामध्ये असे काही घटक असतात. जे आपल्या शरीराच्या काही क्रिया उलट करण्याचे काम करते. दही खाल्लायामुळे रात्री शांत झालेल्या सगळ्या अवयवांना पुन्हा जागवण्याचे काम करतात. म्हणूनच रात्री दही खाऊ नये असे लिहून ठेवलेले आहे. दह्यात असलेले अँटी ऑक्सिडंट चांगले असले तरी ते रात्री खाल्ल्यामुळे त्याचे विपरित परिणाम शरीरावर होऊ लागतात. म्हणूनच रात्री दही खाऊ नये. रात्री दह्याचे सेवन केले तर त्याचा आरोग्यावर नेमका कसा परिणा होतो ते आपण जाणून घेऊया

रात्री दही खाल्ल्यामुळे होतात हे त्रास

रात्री कधीही खाऊ नका दही

 रात्री दही खाल्ल्यामुळे आरोग्याच्या काही समस्या अगदी हमखास जाणवू लागतात. ते कोणत्या ते आपण जाणून घेऊया.

  1. पिंपल्स :  दह्याचे सेवन दररोज रात्री केल्यामुळे शरीरातील सीबमचे प्रमाण वाढते. सीबमचे प्रमाण वाढल्यामुळे आपोआप त्वचेवर पिंपल्स यायला लागते. जर तुम्हाला पिंपल्स नको असतील तर तुम्ही दह्याचे सेवन रात्री करता कामा नये. त्वचेच्या समस्या नको असतील तर दही, ताक, रायता असे सगळे टाळलेले बरे 
  2. सर्दीची शक्यता: दही हे थंड असते. वर सांगितल्याप्रमाणे रात्री दही खाल्यामुळे शरीराला वेगळाच थंडावा मिळतो. या थंडाव्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखी होण्याची शक्यता असते. म्हणूनच रात्री तुम्ही अजिबात दही खाता कामा नये. 
  3. मोटापा: ज्यांना वजन किंवा शरीरातील फॅट वाढू द्यायचे नसतील अशांनी तर दही अजिबात खाता कामा नये. दह्यामध्ये अनेक फॅटी घटक असतात. ज्यामुळे बद्धकोष्टता वाढता वाढण्याचीही शक्यता असते. तुमचे पोटही त्यामुळे साफ होत नाही. पोटाचा त्रास नको असेल तर तुम्ही रात्री दही खाऊ नका. 
  4. उल्टीची शक्यता: रात्री दह्याचे सेवन केल्यामुळे  खाल्लेले अजिबात पचत नाही. अन्न पचले नाही तर तुम्हाला ॲसिडिटी होण्याचीही शक्यता असते. 
  5. आंबट ढेकरांचा त्रास : खूप जणांना आधीच पचनाचा त्रास असतो. त्यात जर दही आंबट असेल तर त्याचा त्रास अधिक होऊ लागतो. खूप जणांना सतत करपट ढेकर येऊ लागतात. 


आता रात्री दही खाताना या गोष्टींचा नक्की विचार करा. 

Read More From आरोग्य