मनोरंजन

या कारणामुळे बिनसला होता सैफ-अमृताचा संसार

Leenal Gawade  |  Jul 8, 2022
या कारणामुळे बिनसला होता सैफ-अमृताचा संसार

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत. ज्यांना एकत्र काम करताना प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करुन सुखाचा संसार केला. पण काही अशी जोडपी आहेत ज्यांनी प्रेम केले, संसार थाटला पण त्यांचा संसार काही जास्त काळ टिकू शकला नाही. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan )आणि अभिनेत्री अमृता सिंह ( Amruta Singh) यांची जोडी ही देखील जास्त काळ टिकली नाही. सैफ अली खान आणि अमृता यांच्यामध्ये दुरावा येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. सैफ अली खानचे एक्सटर्नल अफेअर यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. पण कोणासोबत होते सैफचे हे अफेअर ज्यामुळे अमृताने त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. दोन मुलं असताना सैफसोबत न राहता तिने दोन मुलांना वाढवले. यामागची कहाणी काय ते जाणून घेऊया.

…आणि प्रेमात पडले दोघे

 अमृता सिंह एक यशस्वी अभिनेत्री होती. ज्यावेळी तिची ओळख सैफ अली खानशी झाली. सैफ अली खान त्याचा पहिला डेब्यू चित्रपट अमृता सिंहसोबत करणार होता. या चित्रपटानंतर या चित्रपटाच्या निर्मात्याने अमृता- सैफला एक फोटोशूट करण्यासाठी सांगितले. अर्थात अमृताचा यासाठी होकार मिळणे फारच जास्त गरजेचे होते. तिने याला होकार दिल्यानंतर त्यांचे फोटोशूट झाले. या फोटोशूट दरम्यान सैफ अली खानने ज्यावेळी अमृताच्या खांद्यावर हात ठेवला त्यावेळी त्यांच्यामध्ये अशी मैत्री झाली की, त्यांना कळून चुकले की हे काहीतरी वेगळे आहे. त्यानंतर अनेकदा सैफ हा  अमृतासोबत वेळ घालवण्यासाठी संधी शोधू लागला. सैफ अमृताला डिनर डेटवर नेऊ इच्छित होता. पण तिने डिनरला न जाता त्यालाच घरीच बोलावले. त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी पुढे जात गेली. त्यांच्या भेटी वाढत गेल्या.

 अखेर सैफने तिला प्रपोझ केले आणि अमृताने क्षणाधार्थ हो देखील म्हटले. त्यानंतर मोठी लढाई होती ती म्हणजे त्यांच्या धर्माची आणि वयाची. मुस्लिम मुलाशी लग्न करायचे म्हटल्यावर अमृताच्या घरातून विरोध होता. तर त्यांच्यामध्ये असलेले 12 वर्षांचे अंतर हे सैफ कुटुंबियांना नको होते. त्यावेळी त्यांनी सगळ्यांचा विरोध स्विकारुन अमृताने मुस्लिम धर्म स्विकारुन हे लग्न केले.

टिकला नाही संसार

सैफ- अमृताचे फोटोशूट

अमृता- सैफच्या लग्नातील पहिली काही वर्ष ही खूप चांगली होती. पण कालांतराने त्यांच्या नात्यात कटुता येऊ लागली होती. ही कटुता येण्यामागे सैफ अली खानचे चर्चित असे अफेअर होते. इटालियन मॉडेल आणि डान्सर रोजा कॅटलानोसोबत तिचे अफेअर असल्याचे सांगितले जात होते. या गोष्टी अमृताच्या कानावर होत्या त्यामुळेच त्यांच्या नात्यात कटुता आली होती. याशिवायही काही अन्य कारणे सांगितली जात होती. पण सैफचे अफेअर हे यामागील मुख्य कारण होते. 

सैफने नाकारली नाही जबाबदारी

सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं असून ती अमृताकडेच वाढली. पण सैफने या दोघांची जबाबदारी स्विकारली. त्याने मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी बरीच मेहनत केली आणि त्याने सगळे खर्च भागवले. आजही सारा- इब्राहिम हे सैफच्या जवळ असताना दिसतात. या मागचे कारणच त्याने स्विकारलेली जबाबदारी आहे. त्याने त्यावेळी त्याच्या मुलांच्या संगोपनासाठी कित्येक कोटी रुपये दिले आहेत.

करिना कपूरसोबत केले लग्न

सैफ अली खान त्यानंतर बरेच दिवस सिंगल होता. पण टशन या चित्रपटानंतर तो करिनाच्या प्रेमात पडला. त्या दोघांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केले आणि त्यानंतर या दोघांनी लग्न केले. या दोघांनाही दोन मुलं असून या दोघांच्या वयातही बरेच अंतर आहे. 

सैफ आणि अमृता सिंह प्रमाणे तुम्हाला नेमकी कोणाची लव्हस्टोरी वाचायला आवडेल आम्हाला नक्की कळवा!

Read More From मनोरंजन