Festival

जन्माष्टमीची अनोखी परंपरा, भक्त दोन दिवस न झोपता करतात उपवास

Aaditi Datar  |  Aug 29, 2021
Janmashtami-festival-wishes

देशभरात सध्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तयाऱ्यांमध्ये लोकं मग्न आहेत. सगळीकडेच चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आहे. हा सण श्री हरी विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरा केला जातो. दरवर्षी या सणाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात दोन दिवस नुसता जल्लोष आणि आनंद असतो. यासोबतच एक वेगळी आणि पूर्वापार चालत असलेली परंपराही काही लोक आवर्जून फॉलो करताना दिसतात. ती म्हणजे जन्माष्टमीच्या निमित्ताने दो दिवस न झोपता उपवास करून श्रीकृष्णाचं ध्यान करतात. जन्माष्टमीची माहिती तुम्हाला असेल पण याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्याआधी यंदा या अनोख्या परंपरेबाबतही जाणून घ्या.

काय आहे ही अनोखी परंपरा

श्रीकृष्णाचा जन्मोत्सव दरवर्षी दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी साधू-संन्यासा, शैव संप्रदाय दरवर्षी जन्माष्टमी साजरी करतात. तर दुसऱ्या दिवशी वैष्णव संप्रदाय आणि ब्रिजवासी या दिवशी सण साजरा करतात. सोबतच जन्माष्टमीच्या निमित्ताने दो रात्री न झोपता लोक श्रीकृष्णाच ध्यान करतात. 

खरंतर जन्माष्टमी भारतात दोन दिवस साजरी केली जाण्यामागे दोन प्रकारच्या परंपरा आणि मान्यता आहेत. जास्तकरून लोकं जन्माष्टमी स्मार्त साजरी करतात. आणि त्याच्या आधारावर व्रतांच्या नियमांचं पालन करणारे स्मार्त म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे, विष्णूचे उपासक किंवा विष्णू अवताराला मानणारे वैष्णव म्हणून ओळखले जातात. यावरून समजतं की, साधु-संत स्मार्त श्रेणीमध्ये येतात तर गृहस्थ हे वैष्णव श्रेणीत येतात.

स्मार्त एक दिवस आधी साजरी करतात जन्माष्टमी

स्मार्त नेहमी वैष्णवांच्या एक दिवस आधी जन्माष्टमी साजरी करतात. यामागील कारण समजून घेणं इतकंस कठीण नाही. स्मार्त कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी खास योग पाहतात आणि त्याच आधारे उपवासाचा दिवस ठरवतात. हा योग भाद्रपद मासाच्या कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथी, चंद्रोदय व्यापिनी अष्टमी आणि रात्रीमध्ये रोहिणी नक्षत्राचा संयोग पाहून जन्माष्टमी साजरी करतात. या मान्यतेनुसार अनेक लोक उदया तिथीसाठी आग्रह धरत नाहीत. त्यामुळे स्मार्त अष्टमी किंवा इतर संयोंगाच्या आधारावर सप्तमीला जन्माष्टमी साजरी करतात. 

त्याचप्रमाणे वैष्णवसुद्धा हा उत्सव साजरा करण्यासाठी काही योग दिसतात. जसं भाद्रपद मासाच्या कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथी सूर्योदयाच्या वेळी अष्टमी तिथी असेल आणि अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्राचा योग जुळत असेल. या नियमांना मानणारे उदया तिथीवर जोर देतात. त्यामुळे जन्माष्टमी अष्टमी तिथी साजरी करतात. योगांमुळे हा उत्सव नवमीलाही साजरा केला जाऊ शकतो. 

सर्वात आधी हे पाहूया की, मराठी कॅलेंडरच्या तिथी इंग्रजी कॅलेंडरपेक्षा वेगळ्या असतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 वाजल्यानंतर तारीख बदलते. तर हिंदी तिथीमध्ये या आधारे बदल होत नाही. उदया तिथीच्या मान्यतेनुसार सूर्योदयाच्या वेळी जी तिथी येत असेल तिच तिथी पूर्ण दिवस म्हणजेच पुढच्या सूर्योदयापर्यंत मानली जाते. जर सूर्योदय अष्टमी तिथीला स्पर्श करत असेल पण काही क्षणानंतर नवमी तिथी येत असेल तरीही पूर्ण दिवस अष्टमी तिथीच मानली जाते. यासोबतच जर पुढचा सूर्योदय दशमीला स्पर्श करत असल्यास ती नवमी तिथी लोप पावते.

दोन दिवस भक्तगण साजरी करतात जन्माष्टमी

याच कारणांमुळे दरवर्षी भारतात जन्माष्टमी दोन दिवस धूमधडाक्यात साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. याच कारणामुळे भक्त दोन रात्री जागून भगवंताची भजनं गातात आणि गोकुळाचे देखावेही सजवतात. यादरम्यान छोट्या मुलांना भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात खास तयार केले जाते आणि पाळण्यात घातले जाते. भक्त त्याला देवाचं दर्शन मानून नमन करून आशिर्वाद घेतात.

Read More From Festival