Jewellery

पायांत चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नव्हे, त्यामागे आहे वैज्ञानिक कारण

Vaidehi Raje  |  Mar 28, 2022
silver anklets

भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रकारचे धर्म आणि त्या धर्मांशी संबंधित चालीरीती पाहायला मिळतात. सगळ्या प्रदेशांमध्ये जसे भाषा व चालीरीतींमध्ये बदल आढळतात तसेच पोशाख आणि दागदागिने यांच्यातही भरपूर व्हरायटी बघायला मिळते. पण काही दागिन्यांमध्ये मात्र साम्य आढळते. कधी कधी ते दागिने घालण्यामागची श्रद्धा आणि कारणही सारखेच असते. कारण शेवटी हे दागिने परंपरेशीच जोडलेले असतात आणि भारतीय परंपरा या बऱ्याच वेळेला आरोग्याशी संबंधित असतात. आपल्या पूर्वजांनी या परंपरा खूप विचार करून ठरवल्या आहेत हे आपल्याला त्यामागचे खरे कारण कळले की लक्षात येते. 

दागिन्यांचे स्थान व प्रकारही ठरलेले 

स्त्रियांनी परिधान केलेले सगळेच दागिने हे फक्त सोन्याचे किंवा चांदीचे नसावेत अशी आपली परंपरा आहे.म्हणजेच कमरेच्या वर जे दागिने घातले जातात ते सोन्याचे असावेत आणि कमरेपासून पायापर्यंतचे सर्व दागिने चांदीचे असावेत अशी आपली परंपरा आहे. म्हणजेच कानातले, झुमके, हार, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी दागिने आपण सोन्याचे असावेत असा प्रयत्न करतो. पण पायात घालण्यात येणारे दागिने जसे जोडवी, तोरड्या, वाळा हे दागिने मात्र चांदीचेच असावेत अशी आपली परंपरा आहे. आणि यामागे वैज्ञानिक व पारंपरिक कारणे देखील आहेत. 

पायांत चांदीचे पैंजण घालण्यामागचा उद्देश 

पैंजण

पायात घातलेल्या दागिन्यांमध्ये जर कोणता दागिना सर्वात जास्त लोकप्रिय दागिना म्हणजे पैंजण किंवा तोरड्या आहेत.. एक ते दोन साखळ्या आणि काही घुंगरूंनी बनवलेल्या पैंजणांना आपण  इंग्रजी भाषेत ‘अँकलेट’ म्हणतो. आज फॅशन स्टेटमेंट म्हणून लोकप्रिय असलेले पैंजण आपल्याकडे मात्र खूप पवित्र मानले जातात. काही प्रदेशांत तर सौभाग्य अलंकार म्हणून मंगळसूत्राबरोबरच पैंजण आवर्जून घातले जातात. पैंजणांना भारतीय परंपरांमध्ये विशेष स्थान आहे. 

काही ठिकाणी मुलीच्या जन्मानंतर बारश्याच्या वेळी विधिपूर्वक तिला पैंजण घालण्याची परंपरा आहे. हे पैंजण चांदीचेच असतात. मुलीला किंवा स्त्रीला पैंजण घालण्याचा सर्वात मोठा धार्मिक उद्देश म्हणजे तिचे जगाच्या वाईट नजरेपासून संरक्षण करणे होय. तसेच असे मानले जाते की मुलीने परिधान केलेली चांदीचे पैंजण तिचे सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जांपासून रक्षण करते. 

पैंजण घालण्याचे फायदे 

चांदीच्या पैंजणांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, परंतु त्याच वेळी त्यातून निर्माण होणारा नाजूक आवाज वातावरणात सकारात्मक ऊर्जा व लहरी प्रवाहित करतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची विनाशकारी ऊर्जा मुलीपासून दूर राहते असे म्हणतात. पण पैंजण चांदीचेच असण्याची गरज काय? हिंदू धर्माच्या परंपरांमध्ये सोन्याला सर्वाधिक महत्त्व आहे. सोन्याला हिऱ्यांपेक्षा अधिक मौल्यवान मानले जाते आणि विविध प्रकारच्या धार्मिक विधींमध्ये सोने अधिक महत्त्वाचे मानले जाते. पण असे मानले जाते की चांदीमध्ये ‘इच्छाशक्ती’ निर्माण करण्याची शक्ती आहे. या इच्छाशक्तीच्या जोरावर चांदीचे पैंजण स्त्रीभोवती कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाहू देत नाही.

पैंजण

 पैंजण घालण्यामागे वैज्ञानिक कारण 

जर तुम्हाला वारंवार पाय दुखणे, पायात बधीरपणा येणे, मुंग्या येणे किंवा पायात अशक्तपणा जाणवत असेल, तर चांदीचे पैंजण घालणे हा तुमच्यासाठी एक उत्तम उपाय असू शकतो. पाय दुखणे,कंबर दुखणे, सायटिकाचे दुखणे सगळ्या पायांच्या दुखण्यांसाठी पैंजण घालणे अधिक उपयुक्त आहे. अँकलेट्स घातल्याने शरीराला चांगला ऊर्जा प्रवाह मिळतो. ऊर्जा कधीही वाया जात नाही, परंतु फक्त ती दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते. चांदीच्या पॉझिटिव्ह चार्जमुळे शरीरातून ऊर्जा प्रवाह पुन्हा सगळीकडे पसरतो. म्हणून, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज असलेले चांदीचे पैंजण घालता, तेव्हा तुमच्या शरीराचा पॉझिटिव्ह चार्ज राखला जातो. 

चांदीचे पैंजण केवळ तुमच्या पायातच शोभत नाहीत, तर तुमच्या शरीरावर जादूही करते आणि त्यासोबत अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. चांदीचे पैंजण परिधान केल्याने तुमच्या लिम्फ ग्लॅन्डस सक्रिय होतात व तुमची प्रतिकारशक्ती वाढते. आपल्या शरीरातून नैसर्गिकरित्या भरपूर विद्युत प्रवाहाचा संचार होतो.  परंतु या विद्युत प्रवाहांना स्थिर करणे आवश्यक आहे, आणि चांदीचे पैंजण निगेटिव्ह चार्ज सोडून पॉझिटिव्ह चार्ज ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

फोटो क्रेडिट-  istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Jewellery