त्वचेची काळजी

सतत एकाच ठिकाणी का येतात पिंपल्स, जाणून घ्या कारण

Trupti Paradkar  |  Dec 2, 2021
why you get pimples on the same spot on your face in Marathi

पिंपल्स येणं ही एक सामान्य समस्या आहे. किशोरवयीन मुलं-मुली आणि महिलांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त दिसून येतं. पिंपल्स येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कधी कधी मासिक पाळी येण्याआधी शरीरात झालेले बदल, हॉर्मोनल असतुंलन, तेलकट त्वचा, चुकीचा आहार, ताण तणाव अशी अनेक कारणं यामागे असू शकतात. पण तुम्हाला मागील काही दिवसांपासून फक्त एकाच ठिकाणी वारंवार पिंपल्स येतात का ? असं असेल तर मात्र तुम्हाला त्याच्या मागचं कारण जाणून योग्य ते उपचार करणं नक्कीच गरजेचं आहे. कारण असं नाही केलं तर ही समस्या वाढून तुमच्या सौंदर्यामध्ये बाधा येऊ शकते.

चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी बेस्ट क्रीम (Best Cream For Acne Scar In Marathi)

का येतात वारंवार एकाच ठिकाणी पिंपल्स

चेहऱ्यावर पिंपल्स दिसले की सर्वात आधी तुम्हाला तुमच्या सौंदर्याची चिंता वाटू लागते. त्यामुळे पिंपल्सवर नेहमीच ब्युटी ट्रिटमेंट करणे अथवा घरगुती सौंदर्योपचार करण्यावर भर दिला जातो. मात्र सतत एकाच ठिकाणी पिंपल्स येण्यामागचं कारणच जर तुम्हाला माहीत नसेल तर वर वर केलेले हे सर्व उपाय व्यर्थ ठरतात. त्यामुळे आधी त्यामागचे कारण जाणून घ्या आणि मगच त्यावर योग्य ते उपचार करा. त्यामुळे लक्षात ठेवा अॅक्नेवर उपचार करण्यााधी त्यामागचे कारण शोधा.

why you get pimples on the same spot on your face in Marathi

मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम्स, वापरून समस्या करा दूर (Best Creams For Pimples In Marathi)

एकाच ठिकाणी पिंपल्स येण्यामागचे खरे कारण 

प्रत्येक माणसाचे आरोग्य हे थोड्या फार फरकाने वेगळे असते. तुमची जीवनशैली, अणुवंशिकता, स्वभाव, दैनंदिन व्यवहार, आहार अशा अनेक गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला सतत चेहऱ्यावर एकाच ठिकाणी पिंपल्स येत असतील तर त्यावर या कारणांनुसारच उपचार करा. बऱ्याचदा ताणतणाव, चुकीचा आहार, अपुरी झोप, अपचनाच्या समस्या, अस्वच्छता, पाण्याची कमतरता, हॉर्मोनल असंतुलन, अती मेकअप ही कारणेच असतात. तेव्हा जीवनशैलीत योग्य ते बदल करा ज्यामुळे तुमची पिंपल्स येण्याची समस्या आपोआप कमी होईल. योग्य आणि संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे आणि स्वच्छता बाळगणे यासाठी गरजेचे आहे. जर ताणतणावामुळे तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर ताणतणाव नियंत्रणात ठेवण्याचं कौशल्य शिकून घ्या. कारण आजकाल ताणतणाव हा प्रत्येकालाच असतो त्यामुळे त्याचा परिणाम स्वतःच्या आरोग्यावर होऊ न देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर तुम्ही अती प्रमाणात मेकअप करत असाल तर निरोगी त्वचेसाठी मेकअपचे प्रमाण कमी करा आणि चांगल्या गुणवत्तेचे मेकअपचे साहित्य वापरा. 

तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi)

Read More From त्वचेची काळजी