DIY लाईफ हॅक्स

अंडी उकडण्यापूर्वी का धुवू नयेत, जाणून घ्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

Trupti Paradkar  |  May 4, 2022
Why You Should Never Wash Fresh Eggs Before Cooking

कोरोनाच्या काळात आपल्याला साफसफाईची जास्तच गरज वाटू लागली आहे. बाजारातून आणलेली कोणतीही गोष्ट स्वच्छ धुवून निर्जंतूक करून वापरणं हेच सोयीचं आहे. मागील दोन वर्षांपासून भाजी, फळं निर्जंतूक करण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. काही लोक तर अंडीपण धुवून मग फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहीत आहे का अंडी शिजवण्यापूर्वी धुणं मुळीच योग्य नाही. वास्तविक पोल्ट्रीमधून बाजारात विकण्यास येण्यापूर्वीच अंडी स्वच्छ आणि निर्जंतूक केलेली असतात. जर तुम्ही ती पुन्हा घरी स्वच्छ केली तर त्यामुळे अंड्यावरील नैसर्गिक संरक्षक कवच नष्ट होतं. यासाठी जाणून घ्या अंडी कशी स्वच्छ करावी. तसंच अंडी खाण्याचे फायदे | Benefits of Eating Eggs In Marathi

अंडी का धुवू नयेत

युनायडेट स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या मते अंडी पोल्ट्री फार्ममध्ये विकण्यापूर्वी धुण्यात येतात. धुतल्यानंतर अंड्यांना एडिबल मिनरल ऑईलने कोटिंग केलं जातं. ज्यामुळे अंड्यावर कोणत्याही जीवजंतूंचा प्रभाव पडत नाही. पण जर तुम्ही शिजवण्यापूर्वी अंडी नळाखाली स्वच्छ केली तर मात्र त्यामुळे अंडी दुषित होऊ शकतात. याचं कारण अंड्याचं कवच नाजूक आणि झिरझिरीत असतं. पाण्याखाली धुतल्यामुळे त्यावरील जीवजंतू अंड्यात जाण्याची शक्यता वाढते. अशी धुतलेली आणि दुषित अंडी खाण्यामुळे तुमच्या पोटात जीवजंतू जातात आणि इनफेक्शन वाढण्याची शक्यता असते. अशी अंडी खाण्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. पोटाच्या समस्या, अपचन झाल्यामुळे इतर आरोग्य समस्या वाढू शकतात. यासाठी अंडी शिजवण्यापूर्वी धुवू नका. 

अंडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती

जर तुम्ही घरातील कोंबड्यांनी दिलेली फ्रेश अंडी वापरणार असाल तर तुम्ही ती कोमट पाण्यात स्वच्छ करण्यास हरकत नाही. मात्र तुम्ही बाजारातून अंडी विकत घेत असाल तर अंडी धुणं टाळलेलं बरं. कारण अशी अंडी धुतल्यामुळे इनफेक्शन वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी अंडी उकडून खाणं जास्त सोयीचं ठरेल. कारण त्यामुळे अंडी निर्जंतूक होतील. मात्र जर तुम्हाला अंड्याची भाजी अथवा ऑमलेट करायचं असेल तर सरळ अंड एखाद्या स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्या आणि त्याचा वापर करा. हाच एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. त्यामुळे यापुढे बाजारातून आणलेली अंडी नळाखाली मुळीच धुवू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स