आरोग्य

थंडीतील सर्दी आणि बरेच काही

Leenal Gawade  |  Dec 13, 2021
थंडीतील सर्दी आणि बरेच काही

 वातावरणात बदल झाला की, आरोग्याच्या काही तक्रारी हमखास जाणवू लागतात. त्यातील पहिला त्रास म्हणजे सर्दी होणे. थंडीत सर्दी होण्याचा त्रास हा खूप जणांना असतो. ही सर्दी झाली की आपल्याला अगदी असह्य होते. तुम्हालाही थंडीत सर्दीचा त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. इतकेच नाही तर तुम्ही काही सोपे उपाय देखील करायला हवेत म्हणजे तुम्हाला त्याचा मुळीच त्रास होणार नाही.

थंडीतील सर्दी म्हणजे काय?

वातावरणात थंडावा असेल तर अशावेळात सर्दीचा त्रास खूप जणांना होऊ लागतो. थंडावा असताना जर तुम्ही थंड पदार्थांचे सेवन केले तर त्याचे रुपांतर सर्दीमध्ये होऊ लागते. थंडीत सर्दी झाली की, नाक चोंदणे, नाकात जाड शेंबूड होऊ लागतो. नाक शिंकरल्याशिवाय अजिबात समाधान मिळत नाही. थंडीत सर्दी झाली की, त्याचा परिणाम घशावरही होतो. सध्या सगळीकडे कोव्हिडचे सावट असताना अशा काळात सर्दी झाली की अनेकांना भीती वाटते. कोणत्याही वातावरणात सर्दी झाली की, ती बरी होण्यासाठी साधारण सात दिवस तरी जातात. त्यामुळे काळजी करण्याचे तसे काहीच कारण नसते.  

थंडीमुळे सुकलं असेल नाक तर करा हे उपाय

वाफ घ्या 

सर्दी अगदीच असह्य झाली असेल किंवा नाक चोंदले असेल तर अशावेळी श्वास घेणे आणि झोपणे अगदीच कठीण होऊन जाते. अशावेळी तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्ही वाफ घ्या. गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे छातीत साठलेला शेंबूड विरघळ्यास मदत मिळते. त्यामुळे नाकही उघडते. थोड्या काळासाठी का असेना तुम्हाला नक्कीच त्यामुळे आराम मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे दिवसातून किमान दोन वेळा तरी गरम पाण्याची वाफ घ्या. ही वाफ घेताना तोंडातून हवा आत घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.
(टीप: पाण्यात विक्स किंवा कोणताही बाम टाकू नका. कारण त्यामुळे सर्दी सुकते)

गरम गरम जेवा

गरम गरम जेवा

थंडीच्या दिवसात गरम गरम जेवणे हे फार महत्वाचे आहे. गरम जेवल्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळते. थंडीत आधीच खाण्याची इच्छा मेलेली असते. सारखं नाक ओढून आणि पुसून त्रास झालेला असतो. त्यामुळे तुम्ही मस्त गरम गरम जेवा त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल. गरम सूप आणि गरम पाणी प्यायल्यामुळे तुमच्या घशाला चांगला शेक मिळतो. त्यामुळे गरम जेवणे हे फायद्याचे असते. 


नाक स्वच्छ ठेवा 

नाकं वाहतं असू दे किंवा नाक चोंदलेले असू दे तुम्हाला नाकं स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. नाक शिंकरुन तुम्ही नाक स्वच्छ ठेवा. त्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. नाकात शेंबूड तसाच राहिला तर तो अधिक त्रासदायक असतो. नाक स्वच्छ केले तर त्यातून थोडा आराम मिळतो. 

आता तुम्हाला सर्दी झाली तर लगेच घाबरुन जाऊ नका. हे काही उपाय नक्की ट्राय करा

ओमिक्रॉनपासून कसे सुरक्षित रहाल?

Read More From आरोग्य