Fitness

महिलांसाठी न्युट्रीशन आहे महत्वाचे, जागतिक पोषण दिन

Leenal Gawade  |  May 27, 2021
महिलांसाठी न्युट्रीशन आहे महत्वाचे, जागतिक पोषण दिन

आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हा महिलांचा जणू छंदच आहे. घर सांभाळताना आपण किती खातो? किंवा आपल्याला किती त्रास होतो याचा विचार त्या कधीच करत नाही. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ लागतो हे त्यांना काही समजत नाही. 28 मे हा जागतिक पोषण दिन ( World Nutrition Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधत डायबेटोलॉजिस्ट डॉ. रितेश राज (Neuberg Anand Reference Laboratory) यांनी महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषण किती महत्वाचे याची योग्य माहिती दिली आहे. पोषण हे प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाचे असते. जर तुमचे पोषण योग्य असेल तर तुम्ही डाएबिटीझ, ह्रदयरोग, कॅन्सर अश आजारांपासून दूर राहता. त्याचा त्रास तुम्हाला होत नाही. पण शरीराचे कार्य न्युट्रीशनच्या अभावाने बदलले तर मात्र शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतात. शरीरात पोषण कमी झाले की, शरीर जे संकेत देतात त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. चला तर जाणून घेऊया महिलांसाठी न्युट्रीशन का महत्वाचे आहे आणि कोणता घटक कमी झाला की, त्याचा काय त्रास होऊ शकतो ते.

अति प्रमाणात खाऊ नका रागी, होईल हे नुकसान

कॅल्शिअम :  महिलांना ठराविक वयानंतर कॅल्शिअमची कमतरता जाणवू लागते. बाळंतपणानंतर हा त्रास अधिक होतो. दात पडणे, सांधे दुखी, अंग दुखी असे काही त्रास होऊ लागतात.  इतकेच नाही तर महिलांमध्ये कधी कधी कॅल्शिअम मोठ्या प्रमाणातही वाढते अशा कॅल्शिअमची शरीरातील पातळी योग्य नसणे हे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरते. 

अॅसिड स्ट्रेस:आपले शरीर हे अॅसिड आणि अल्केलाईनची निर्मिती करते. पण अल्केलाईनची मात्रा शरीरात कमी होऊन अॅसिडची मात्रा वाढली की, ती शरीरासाठी फारच त्रासदायक ठरते. शरीरातील अॅसिड जास्त वाढले की, ती तुमची पचनसंस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरते, 

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस: शरीरात असलेले अँटी- ऑक्सिडंट घटक हे शरीरातून काही घटकांना दूर ठेवण्याचे काम करतात. पण ज्यावेळी अँटी- ऑक्सिडंटची मात्रा कमी होते. त्यावेळी शरीराचे कार्य योग्य पद्धतीने मुळीच चालत नाही. अँटी- आॉक्सिडंट घटकांमध्ये शरीर दुरुस्त करण्याची क्षमता असते. जी कमी झाली तर वृद्धत्व लवकर येते. त्वचा अधिक प्रौढ वाढू लागते.याशिवाय इतर काही त्रास होऊ लागतात

घरात राहून कसं व्हाल कोरोनातून पूर्ण बरं,असे करा उपचार

 

आहार हवा योग्य

महिला आरोग्य बिघडण्यामागे त्यांची दिरंगाई ही कारणीभूत ठरते. कारण महिला या आरोग्याकडे फारच दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांनी आहार या योग्य ठेवायला हवा. महिलांच्या आहारात नेमंक काय असायला हवा ते जाणून घेऊया. 

दिवसभर ‘या’ छोट्या छोट्या सवयींमुळे कमी होऊ शकते प्रतिकार शक्ती

Read More From Fitness