दबंग सलमान खानचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यामुळे सलमान खूश असणार यात काही वाद नाही. पण सलमानच्या आनंदात आणखी भर पडली आहे ती त्याला मिळालेल्या नव्या गिफ्टमुळे. चक्क WWE कडून सलमान खानला खास बेल्ट देण्यात आला आहे. या बेल्टचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता सलमानच्या चाहत्यांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. आता सलमानचा हा बेल्ट खास का आहे ते सुद्धा जाणून घ्या
तैमूरच्या #Birthdaybash फोटो व्हायरल…असा केला वाढदिवस साजरा
म्हणून सलमानला देण्यात आला बेल्ट
<a href ="
मिळालेल्या माहितीनुसार दबंग 3 च्या रिलीजनंतर हा बेल्ट सलमानला देण्यात आला आहे. हा बेल्ट घातलेले अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने त्याच्या खांद्यावर बेल्ट घेतला आहे. हा बेल्ट त्यांना का देण्यात आला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण कारणापेक्षाही सलमानच्या फॅन्सना आनंद झाला आहे.
का खास आहे हा बेल्ट ?
जर तुम्ही WWE पाहत असाल तर या बेल्टचे महत्व काय ते तुम्हाला हमखास माहीत असेल. यात सहभागी होणाऱ्या रेस्लर्सला अशाप्रकारचा बेल्ट दिला जातो. हा बेल्ट विजयाची निशाणी असते. म्हणूनच तुम्हाला अनेकदा रेस्लर असा बेल्ट खांद्यावर घेऊन येताना दिसतात. आता रेस्लिंगशी कोणताही संबंध नसताना आपल्या चुलबूल पांडेला हा बेल्ट देण्यात आला तो खास आहे कारण यावर सलमानचे नाव कोरण्यात आले आहे. संपूर्ण सोन्याचा असलेला हा बेल्ट त्याला गिफ्ट करण्यात आला आहे. WWE च्या अधिकृत वेबसाईटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
चुलबुल पांडेचा आनंद द्विगुणित
सलमान खानच्या चित्रपटाची त्याचे फॅन्स वाट पाहात असतात. दबंग 3 हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आधीच त्याच्या फॅन्सनी थिएटर बाहेर गर्दी केली आहे. त्यात आता ही आनंदाची बातमी कळल्यानंतर सलमानच्या फॅन्सचा आनंद द्विगुणित झाला आहे. फॅन्सनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
ओपनिंगच्या कमाईचा आकडा चुकला
दबंग 3 चा ट्रेलर पाहिल्यानतर हा चित्रपट चांगलीच कमाई करेल अशी अपेक्षा होती.पण पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा थोडक्यात चुकला कारण 30 कोटी कमाईचा अंदाज असताना सलमानच्या चित्रपटाने 24 कोटीची कमाई केली. सध्या देशात चाललेल्या CAA च्या गोंधळामुळे अनेकांनी या चित्रपटाला हजेरी लावली नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण हा आकडाही काही कमी नाही.
‘तुझ्यात जीव रंगला’मधला ‘सनी दा’ ची हटके लव्हस्टोरी
काश्मीरच्या फॅन्सने केले थिएटर बुक
सलमानच्या फॅन्सचा विचार करता त्याचे जगभरात चाहते आहेत. पण देशातील त्याचे चाहते काही औरच आहे. सलमानचा काश्मीरमधील एका चाहत्याने तर त्याच्या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक करत आपले प्रेम व्यक्त केले.
आता या चुलबुल पांडेला एकाचवेळी दोन गुड न्यूज मिळाल्या आहेत आणि त्याचा आम्हालाही आनंद आहे.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje