मनोरंजन क्षेत्र आणि यातील प्रेम आणि घटस्फोट हे कोणालाच नवे नाही. मात्र काही घटस्फोट अथवा काही अभिनेत्री आणि अभिनेत्यांमधील वाद इतक्या विकोपाला जातात की, त्यांचं संपूर्ण आयुष्य चव्हाट्यावर येतं आणि असंच काहीसं घडत आहे अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) आणि अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) या दोघांच्या बाबतीत. काही महिन्यांपूर्वीच निशा रावलने आपला पती करण मेहराने आपल्याला मारलं असं सांगून त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तिला तिच्या मित्रमैत्रिणींनीही साथ दिली. करणला त्यानंतर निशाने आपल्या मुलाला कधीही भेटायला दिले नाही. तर या कारणासाठी करणाला तुरूंगाची हवाही खावी लागली होती. मात्र आता करणने पुन्हा एकदा या सगळ्यातून बाहेर पडत निशावर गंभीर आरोप केले आहेत.
निशाचा बाहेरख्यालीपणा सर्वांनाचा माहीत होता…
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) फेम करण गेल्या काही महिन्यांपासून या सगळ्या गोष्टींशी लढत आहे. निशाने वेगळं झाल्यापासून त्यांचा मुलगा कविश (Kavish) यालाही भेटायला दिलेले नाही. तर निशावर करणने गंभीर आरोप केले आहेत, ‘मी सर्व काही विसरून निशाला घरात पुन्हा एकदा जागा दिली. पुन्हा एकदा नव्याने नात्याला सुरूवात करूया असंही सांगितलं. पण मी गेल्यानंतर माझ्याच घरात 11 महिने एक दुसरा व्यक्ती राहात होता. आपली पत्नी आणि मुलं सोडून ही व्यक्ती घरात राहात होती हे सर्वांनाच माहीत होते, त्यामुळे आता माझी लढाई मीच लढणार आहे.’ तर पुढे करणने आपल्याला झालेला त्रास सांगताना म्हटले की, ‘निशाने केवळ माझ्या मुलालाच दूर केलं नाही तर माझ्या 20 वर्षांच्या करिअरवरदेखील पाणी फिरवले आहे. तसंच माझ्या व्यवसायाला तिच्यामुळे धक्का पोहचला आहे. माझ्यावर तिने चिखलफेक केली, पण आता मी सहन करणार नाही. मी सगळं काही परत मिळवेन. गेल्या एक वर्षापासून मला फक्त आणि फक्त सदमा सहन करावा लागला आहे. अत्यंत त्रास मी सहन केलाय पण आता मी काहीही सहन करणार नाही’ असं करणने एका मुलाखतीमध्ये आपली भावना व्यक्त केली आहे.
निशाच्या मित्रमैत्रिणींवर मानहानीचा दावा
करणने निशाच्या 3 मित्रमैत्रिणींवरही मानहानीचा दावा ठोकला असल्याचे सांगितले आहे. कारण निशाने केलेल्या चुकीच्या कामात या तिघांनीही तिची साथ दिली आहे असं त्याचे म्हणणे आहे. आपल्या आयुष्याची वाताहात करण्यामध्ये या तिघांचीही तितकीच मोठी जबाबदारी आहे असंही करणने म्हटलं आहे. तर आपल्याला झालेला त्रास भरून निघणार नाही. मात्र मी कुठेही खोटा नाही आणि हे सर्व सिद्ध करेन असंही याआधीदेखील करणने म्हटलं होतं. निशाने करणचे विवाहबाह्य संबंध असून आपल्याला मारहाण केल्याचे सांगितलं होतं. मात्र त्यानंतर करणने कोणतीही चिखलफेक तिच्यावर केली नव्हती. मात्र आता करणने आपल्याला होत असलेल्या त्रासाला वाचा फोडण्याचे ठरवले असून आपले नाही तर निशाचेच विवाहबाह्य प्रेमसंबंध होते असा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान या आरोपानंतर निशा आता पुन्हा काय प्रत्युत्तर देणार अथवा या दोघांच्या भांडणात त्यांच्या मुलाचा ताबा कोणाला मिळणार याबाबत मात्र अजूनही कोणतीही बाब समोर आलेली नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade