मनोरंजन

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओंकार अर्थात शाल्व किंजवडेकरची वाढतेय क्रेझ

Dipali Naphade  |  Jan 26, 2021
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओंकार अर्थात शाल्व किंजवडेकरची वाढतेय क्रेझ

काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने फारच लवकर प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे. मालिकेचा विषय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील कलाकारांमुळे ही मालिका पाहावीशी वाटत आहे. या मालिकेत महत्त्वाची भूमिका असणारा ओंकार अर्थात शाल्व किंजवडेकर या कलाकाराची क्रेझ सध्या घराघरात वाढताना दिसून येत आहे. गोड चेहऱ्याचा आणि आपल्या सहज अभिनयाने शाल्व सध्या सगळ्यांनाच आपलंसं करून घेत आहे. पण शाल्वची ही पहिलीच मालिका आहे का असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असणार आणि शाल्वबद्दल अधिक माहितीदेखील हवी असणार. तर शाल्वने आपल्या करिअरची सुरूवात नक्की कशी केली आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती खास तुमच्यासाठी.

आस्ताद काळे लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणीचे धमाल फोटो

हंटर या हिंदी चित्रपटापासून केली सुरूवात

शाल्व हा मूळचा पुण्यातील असून त्याचं संपूर्ण शिक्षण हे पुण्यातच झालं आहे. मनोरंजन क्षेत्रातच नाव कमवायचं हे पक्के केल्याने त्याच दिशेने शाल्वने पावलं उचलायला सुरूवात केली. अनेक व्यावसायिक नाक, वेबसिरीज,  जाहिराती यामधून शाल्वने काम केले आहे. पण त्याला खरी ओळख दिली ती नव्या मराठी मालिकेने. आतापर्यंत लहानमोठ्या भूमिका साकारणारा शाल्व अचानक सर्वांच्या घरातील एक महत्त्वाचा भाग होऊन गेला आहे. एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देणं चालू ठेवलं होतं. त्यातूनच त्याला हंटर या चित्रपटात काम मिळाले. त्यानंतर माधुरी दीक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातही त्याने भूमिका करून आपली दखल घ्यायला भाग पाडले. याशिवाय राजेश्वरी सचदेव आणि के. के. मेनन यांच्या ‘एक सांगायचंय’ या चित्रपटातही ध्रुव नावाची व्यक्तिरेखा साकारली. ‘गोंद्या आला रे’ या वेबसिरीजमध्ये शाल्वने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.  तर सेक्स ड्रग्ज थिएटरमध्येही त्याने काम करत आपली दखल घ्यायला भाग पाडले. अनेक जाहिरातींमधून शाल्व झळकला आहे.  तर नाटकांमध्ये कामं केल्याने अभिनयाचा पाया त्याचा भक्कम आहे.  तर हिंदी आणि मराठी या दोन्ही क्षेत्रात काम केल्याने त्याने स्वतःला एकाच भाषेत बांधून घेतलेले नाही. 

पवित्रा रिश्तामधील या अभिनेत्यानेही उरकले लग्न, फोटो झाले व्हायरल

वेबिसोडमध्येही केले आहे काम

चित्रपटातील कामासह शाल्वने नाटकांमध्येही कामं केली आहे.  ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ हे त्याचे गाजलेले नाटक.  तर आई बाबा, दिवाळी आणि मी या भाडीपाच्या वेबिसोडमध्येही शाल्व दिसला आहे. मात्र या मालिकेतील ओंकार या व्यक्तिरेखेनेच शाल्वला खरी ओळख मिळवून दिली आहे असं म्हणावं लागेल. आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या भूमिका या दखल घ्यायला लावणाऱ्या असल्या तरीही ओंकार या व्यक्तिरेखेने त्याला खरी ओळख मिळवून दिली आहे. अंतरंग या शॉर्टफिल्ममध्येही त्याने काम केले आहे. एकंदरीतच ओंकारने कलाकार म्हणून सर्व स्ट्रीममध्ये काम करून झालं आहे. तसंच तो स्वतः एक उत्तम चित्रकारही आहे. अतिशय कमी वेळामध्ये शाल्वने घराघरात तसंच विशेषतः तरूणींवर आपला वेगळा ठसा नक्कीच उमटवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

चाहत्यांना धक्का, लवकरच बंद होणार ‘दी कपिल शर्मा शो’

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन