आरोग्य

तुमच्या बॉडी टाईपनुसार कोणती योगासने आहेत तुमच्यासाठी बेस्ट

Leenal Gawade  |  Jun 5, 2022
बॉडीटाईपनुसार असा करा योगा

 योगासने ही उत्तम आरोग्यासाठी आणि फिट फिगरसाठी चांगली असतात हे आपण सगळेच जाणतो. योगासनांचे वेगवेगळे प्रकार पाहता कोणती योगासने तुमच्यासाठी योग्य आहेत हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या बॉडी टाईपनुसार योगासने केलीत तर त्याचे अधिक फायदे तुम्हाला मिळतात. तुमच्या बॉडीटाईपनुसार कोणती योगासने तुमच्यासाठी उत्तम आहेत चला घेऊया या सोप्या पण फायदेशीर अशा योगासनांची माहिती

शरीर आणि शरीराचे दोष

प्रत्येकाचे शरीर वेगळे आणि त्याचे दोष वेगळे असतात. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरप्रवृत्तीनुसार त्याचे प्रकार केले जाते. साधारणपणे वात, पित्त, कफ अशा तीन प्रवृत्ती साधारणपणे मानल्या जातात. ज्याचे शरीर वाताचे आहेत. त्यांना हातपाय दुखण्याचा त्रास असू शकतो. अशांना संधीवात असते. त्यांचे गुडघे, पाय, बात, दुखणे असे त्रास असतात. पित्त असणाऱ्यांना अन्न पचण्यास त्रास होतो. पोटदुखी, अन्न न पचणे असे काही त्रास होत असतात. कफ असणाऱ्यांना सर्दी, खोकला असे काही त्रास असण्याची शक्यता असते. आता आयुर्वेदानुसार हे झाले शरीराचे काही दोष आता या दोषापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा आराम मिळण्यासाठी काही योगासने नक्कीच मदत करु शकतात.

कफ

ज्यांचे शरीर कफ प्रवृत्तीचे असते.अशी लोक अंगाने फार जाड असतात. ही लोकं जाड असली तरी देखील त्यांच्यामध्ये चांगला स्टॅमिना असतो. अशा व्यक्तींना शरीरात उर्जा निर्माण कराणारा योगा योग्य असतो. अशांनी हॉट पॉवर योगा केला तर तो योगा त्यांच्यासाठी लाभदायकी असतो.  

कफ प्रवृत्ती असणाऱ्यांना अनेक आसनं करता येतात. या आसनांमध्ये  नौकासन, अर्ध चंद्र मुखासन, शलभासन, अधोमुखासन  अशी आसन तुम्हाला करता येतात. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. शिवाय छातीत साचणाऱ्या कफापासून आराम मिळतो. खास योगा कोट्स पाठवून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता

वात

वात प्रवृत्तीच्या लोकांचे मेटाबॉलिझम खूप चांगले असते. त्यांचे जेवण चांगले पचते पण ते अंगाला लागत नाही. अशामुळे या प्रवृत्तीचे लोक शरीराने खूपच बारीक असतात. असांसाठी खूप व्यायाम हा देखील त्रासदायक ठरु शकतो. अशी शरीर प्रवृत्ती असलेल्या लोकांची त्वचा आणि केस हे फार कोरडे असतात. अशा लोकांच्या चेहऱ्यावर अजिबात चमक नसते.  जर तुम्हाला हे त्रास असतील. तुमचे शरीर या प्रकारातील असेल तर तुम्ही काही योगासने करायला हवीत. त्यामुळे नक्की आराम मिळेल. 

सगळ्यात आधी तुम्ही स्ट्रेचिंग करा. पाय दुमडून हात सरळ ठेवून पुढच्या बाजूला झुका. याला चाईल्ड पोझ असे देखील म्हणतात. यामुळे तुमचे शरीर चांगले स्ट्रेच होते. याशिवाय तुम्ही ताडासन,वृक्षासन आणि वीरभद्रासन अशी आसनं तुम्हाला नक्कीच करता येतील. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 

पित्त

 ज्यांचे शरीर पित्त प्रकारातील असते. अशा शरीरामध्ये मोठ्याप्रमाणात उष्णता असते. त्यामुळे जळजळ असे काही त्रास होत असतात. ज्यांच्या शरीरात जास्त उर्जा असेल अशांनी शरीराला अधिक उर्जा मिळेल असा व्यायाम टाळलेला बरा असतो.  पित्त शरीर असलेल्यांना केसगळती, वयाआधी केसांचे पांढरे होणे असे त्रास होत असतात. 

असा त्रास अशणाऱ्यांनी काही खास योगासने करायला हवीत. उष्ट्रासन, भुजंगासन,सर्वांगासन, वज्रासन, वृक्षासन ही आसने दकरु शकता. यामुळे तुमचे पित्त कमी होण्यास मदत मिळेल. 

आता तुमच्या बॉडी टाईपनुसार तुम्ही तुमच्यासाठी अशी बेस्ट योगासने नक्की निवडा. 

Read More From आरोग्य