Fitness

थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य जपण्यासाठी करा हे व्यायाम

Vaidehi RajeVaidehi Raje  |  Jun 28, 2022
Yoga for Thyroid health

तज्ज्ञांनी केलेल्या केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील प्रत्येक तिसरा व्यक्ती थायरॉईड विकाराने ग्रस्त आहे, ज्याचा थेट संबंध अनियमित आहारविहार,ताण तणाव आणि नैराश्याशी आहे. थायरॉईड विकारामुळे वजन वाढू शकते आणि हार्मोनल असंतुलन आणि हृदयविकार होऊ शकतो. नियमित व्यायाम केल्याने शरीरात झालेले हॉर्मोनल असंतुलन बॅलन्स व्हायला मदत होते. योगाभ्यास करणे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणूनच थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य जपण्यासाठी पुढील व्यायाम करा. 

शरीरातील थायरॉइडचे असंतुलन योगाभ्यासाच्या मदतीने नियंत्रित केले जाऊ शकते. स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग आणि कॉम्प्रेसिंग या प्रकारची योगासने थायरॉईड ग्रंथी सक्रिय करतात तसेच थायरॉक्सिन सोडतात ज्यामुळे मेटाबॉलिजम निरोगी होण्यास मदत होते. ही योगासने आठवड्यातून तीनदा किमान 30 ते 40 मिनिटे केल्याने तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील.

सिद्ध वॉक किंवा इन्फिनिटी वॉक करा 

Yoga For Thyroid

सिद्ध वॉकने व्यायामाला सुरुवात करा. या प्रकारच्या वॉकला इन्फिनिटी वॉक, योगा वॉक किंवा माइंड वॉक असेही म्हणतात. या व्यायामाने तुमच्या मनाला, शरीराला खूप फायदा होतो. यामध्ये तुम्हाला 8 च्या पॅटर्नमध्ये चालावे लागते. 8 हे अनंताचे (Infinity) सूचक आहे, सुरुवातीला प्रथम दक्षिणेकडून उत्तर दिशेने जा आणि नंतर पुढील फेरीत दिशा बदला (दोन्ही दिशांना 21 मिनिटे चाला).  हे तणाव निवारक म्हणून काम करते. यामुळे शरीराची स्थिती सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते. हा वॉक मनाला आराम देण्यासोबतच छाती आणि फुफ्फुसासाठीही फायदेशीर आहे.

उष्ट्रासन करा 

उष्ट्रासन करताना उंटाच्या शरीराचे अनुकरण करावे लागते. या आसनाला इंग्रजीमध्ये Ustrasana किंवा Camel Pose असे म्हटले जाते. आसन सुरू करण्यासाठी योगा मॅटवर गुडघ्यांवर बसून आपले हात नितंबांवर ठेवा. तुमचे गुडघे आणि खांदे एकाच रेषेत ठेवा आणि पायांचे तळवे छताच्या दिशेने असले पाहिजेत. आता श्वास आतमध्ये घेत पाठीच्या कण्यातील सर्वात खालचे हाड पुढच्या बाजूला येईल अशा प्रकारे पाठीवर दबाव टाका.  हे करताना पोटावर आणि नाभीवर ताण येईल.पाठ मागे नेताना हातांनी दोन्ही तळपाय पकडून ठेवायचा प्रयत्न करा. मानेचा भाग मोकळा सोडा. मानेवर ताण येणार नाही याची काळजी घ्या. या आसनामध्ये 30-60 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत आसनाच्या पूर्वस्थितीत या आणि हात हळूवारपणे पुढे आणा व सरळ बसा.

Yoga For Thyroid

 हे आसन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते आणि हार्मोन्सचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. हे आसन केल्याने छाती आणि पोटाच्या खालच्या भागावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हे आसन कंबर आणि खांदे मजबूत करते, तसेच पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी करण्यास मदत करते. नियमितपणे सराव केल्यास मणक्याची लवचिकता वाढते व शरीराची मुद्रा सुधारण्यासही मदत होते.

शीर्षासनाचे होतात फायदे 

Yoga For Thyroid

शीर्षासन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघ्यांवर वज्रासनात बसा आणि आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांत इंटरलॉक करून मॅटवर ठेवा. हाताची बोटं इंटरलॉक केल्यानंतर तळव्यांना वाटीचा आकार द्या आणि सावकाशपणे आपलं डोकं झुकवून तळव्यांवर ठेवा. यानंतर सावकाश दोन्ही पाय वर उचला आणि एकदम सरळ ठेवा. पाय वर उचलण्य़ासाठी तुम्ही भिंत आणि दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. या दरम्यान खालपासून ते वरपर्यंतचं शरीर एकदम सरळ असलं पाहिजे. शरीराचा तोल नीट सांभाळा. ह्या स्थितीत आल्यानंतर पंधरा  ते वीस सेकंद दीर्घश्वसन करा आणि आहे त्या स्थितीत तसंच राहा. नंतर सावकाशपणे श्वास सोडत पाय जमिनीवर अलगद आणा. या आसनामुळे मन शांत होते आणि तणाव दूर होतो व हात, पाय आणि पाठीचा कणा मजबूत होतो. पण ज्यांना उच्च रक्तदाब, हायपोटेन्शन, चक्कर येणे, हृदय धडधडणे किंवा थ्रोम्बोसिस आहे त्यांनी हे आसन करू नये. 

तसेच सर्वांगासन व हलासन देखील थायरॉईड ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी करावीत. हे सगळे व्यायाम तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच करावीत. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Fitness