राग हा सगळ्यांनाच येतो. पण काही जणांना अगदी क्षुल्लक कारणामुळे राग येतो.काही जणांचा राग हा पटकन जातो.. काही जणांचा राग काही केल्या कमी होत नाही. तर काही जणांना ठराविक गोष्टींचाच राग असतो. त्यांच्या मनाविरुद्ध काही झाले तर ते इतक्या लगेच रागावतात की, त्यांचा राग आवरणे अनेकांना कठीण जाते. राग हा प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. पण राशीशास्त्रानुसार तुमच्या राशीवर तुमचा राग अवलंबून असतो. 12 राशींपैकी अशा काही राशी आहेत ज्यांचा राग हा कायम नाकावर असतो. अशा राशी कोणत्या ते देखील जाणून घेऊया.
मकर (22 डिसेंबर- 19 जानेवारी)
मकर राशीचे लोक हे बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह असतात. पण त्यांचा रागीट स्वभाव त्यांचे नुकसान करतो. या राशीची लोक अधिक चिडचिडी असतात. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या कोणत्याच गोष्टीत रस नसतो. ही माणसे तेच करतात जे त्यांना करायचे असते. त्यामुळेच हे करत असताना त्यांना सारखा राग येत राहते. इतकेच नाही तर या व्यक्तिंना राग आल्यानंतर ते त्यांच्यावरील नियंत्रण इतके घालवतात की, त्यांच्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात हे देखील त्यांना कळत नाही. यांच्या बोलण्यामध्ये इतकी ताकद असते की ते कोणालाही टोमणे देऊन त्यांना रडायला भाग पाडू शकतात. यांचा राग हा फारच वाईट असतो. त्यामुळे अशावेळी त्यांच्यापासून लांब राहणेच योग्य असते.
मीन (19 फेब्रुवारी-20 मार्च)
मीन राशीच्या व्यक्ती तुम्हाला शांत असतील असे वाटत असेल तर अगदीच चुकीचे आहे. या राशीच्या व्यक्तींच्या नाकावर कायमच राग असतो. कारण नसताना रागवण्याची त्यांची सवय असते. या राशीची माणसे अगदीच सणकी असतात. कधीकधी ते एखादी मोठी गोष्ट दुर्लक्षित करतात तर कधी कधी क्षुल्लक कारणावरुनही ते समोरच्याला रागवत राहतात. यांच्या याच स्वभावामुळे ते आयुष्यभर लोक आजूबाजूला असूनही एकटे असतात,.या राशीच्या लोकांशी लोक मैत्री तर करतात पण प्रेम करत नाहीत. या राशीच्या लोकांचा रागही खूप भयानक असतो पण तो अगदी काहीच काळासाठी असतो. काही वेळाने या लोकांचा राग जातो आणि ते अगदी नॉर्मल होतात. बारीक सारीक गोष्टींसाठी चिडचिड करणे, क्षुल्लक गोष्टींचे वाईट वाटणे.हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे अशा लोकांना नेम
मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
मेष राशीच्या व्यक्ती अगदी बारीक सारीक कारणावरुन रागावतात. या राशीचे राशीचिन्हच मेंढा आहे. त्यामुळे या व्यक्ती ठोसा मारल्याशिवाय राहत नाही. या व्यक्तिंना जेव्हा राग येतो तेव्हा ते कोणाचेच ऐकत नाहीत आणि परिणामांची चिंता तर मुळीच करत नाही. या राशीच्या लोकांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे सांगता येत नाही. त्यांच्या मूडवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. या राशीच्या व्यक्तिंना कोणीही आरामात टार्गेट करु शकते या व्यक्ती त्यामुळेच अनेकदा नाहक काही गोष्टींमध्ये फसतात. या राशीच्या लोकांना राग आणून देणे इतके सोपे असते की, काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. तसं पाहायला गेलं तर या राशीच्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आपला राग नियंत्रित ठेवतात. पण त्यांची इमेज खराब करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्या माणसाची वाट लावण्यासाठी ही व्यक्ती जराही मागे पुढे पाहात नाही.
वृषभ (20 एप्रिल- 20 मे)
वृषभ राशीच्या व्यक्ती या फारच जिद्दी स्वभावाच्या असतात. या व्यक्ती इतक्या हुशार असतात की, त्यांना सहज कोणीच फसवू शकत नाही. या राशीच्या व्यक्तिंना जर काही गोष्टी खटकल्या तर ते सांगताना त्यांचा राग ते हमखास व्यक्त करतात. म्हणूनच या राशींच्या लोकांची लग्न झाल्यानंतर त्यांचे त्यांच्या पार्टनरसोबत फार पटत नाही. यांना राग आल्यानंतर त्यांचे तोंड फार चालते. प्रत्येक वेळी ही माणसे मोठ्याने बोलतात आणि आपला मु्द्दा मांडतात पण त्यामुळे ते आजारीही पडतात. या राशीच्या व्यक्ती जर तुमच्या संपर्कात असतील तर इतके लक्षात असू द्या की, यांच्याशी काही विषयांमध्ये हुज्जत घालू नका. त्यांच्यासमोर गप्प राहाण्यातच शहाणपण आहे. कारण यांचा राग हा क्षणिक असतो.पण तरीही या राशीच्या व्यक्तींचा रागाबाबतीत काहीच भरोसा करता येत नाही.
मिथुन (21मे – 21 जून)
मिथुन राशीच्या लोकांचा राग म्हणजे ज्वालामुखीच… यांना राग आल्यानंतर ते एकाचवेळी सगळे काही भडाभड बोलून मोकळे होतात. तसा तर या लोकांचा स्वभाव शांत असतो. पण ज्यावेळी त्यांना राग येतो त्यावेळी त्यांच्यासमोर कोणीच टिकू शकत नाही. आरडाओरड करुन ते आपला राग व्यक्त करतात.या राशीची लोक कधीही आपला राग मान्य करायला तयार नसतात. स्वत:ची चूक माहीत असूनही ते कधीच मान्य करत नाहीत. तर ते कायम दुसऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांचा कमीपणा दाखवणे त्यांना आवडते. तुम्ही यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते समजत नाहीत. हे रागात हातही उचलू शकतात. म्हणूनच या लोकांसोबत भांडणं करण्यात काहीच अर्थ नसतो.
सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)
आता ज्या राशीचे चिन्हच सिंह आहे त्याच्याकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा करणार. या राशीच्या लोकांना खूप राग येतो.ते त्यांचा राग अजिबात नियंत्रित ठेऊ शकत नाही. रागात ते स्वत:वरील नियंत्रण घालवतात ही गोष्ट खरी असली तरी त्यांना उगाचच राग येत नाही. त्यांच्या रागाला काहीतरी कारण असते. उगाचच कोणतेही कारण नसल्याशिवाय त्यांना राग येत नाही. फाल्तू गोष्टींमध्ये ते आपली एनर्जी वाया घालवत नाही. जर यांना भांडणात कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात टस की मस होत नाही. तसं पाहायला गेले तरी राग त्यांची ताकद असली तरी तोच राग त्यांचा वीक पाँईटही आहे.
या राशीचे तुम्ही किंवा तुमचे मित्र-मैत्रीण आहेत का? त्यांचा स्वभाव आम्ही सांगितल्याप्रमाणे आहे की, नाही ते आम्हाला नक्की कळवा
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje