ADVERTISEMENT
home / Nail Care
नेलपेंटसचे हे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत – Nail Paint Shades In Marathi

नेलपेंटसचे हे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत – Nail Paint Shades In Marathi

 नेलपेंट लावायला अनेकांना आवडते. म्हणून आवडेल तो शेड प्रत्येकवेळी महिला, मुली खरेदी करतात. ही शेड हवी ती हवी, हा रंग सध्या चालतो म्हणून आपण एक -एक शेड आपल्या मेकअप किटमध्ये गोळा करायला सुरुवात करतो आणि हा हा म्हणता प्रत्येक मुलीकडे १५ ते २० नेलपेंट असतात. पण इतक्या नेलपेंटस घेऊनही ती या ड्रेसवर जात नाही. मला चांगली दिसत नाही अशी तक्रारही आपणच करत राहतो. पण इतक्या सगळ्या शेड्स घेऊन त्या वापरल्या गेल्या नाहीत तर मग आल्या तशा थेट जातात कचऱ्याच्या डब्यात कारण तो पर्यंत त्या  सुकून गेलेल्या असतात.म्हणून खास तुमच्यासाठी आम्ही अशा काही नेलपेंट शेड्स काढल्या आहेत ज्या तुमच्याकडे हव्याच आणि असतील तर त्या नीट जपून ठेवायला हव्या.

न्यूड (Nude)

टर्कीश ब्लू (Turquoise Blue)

पेस्टल शेड्स (Pastel shades)

ADVERTISEMENT

गोल्डन ग्लिटर (Golden Glitter)

पारदर्शक (Transparent)

स्वच्छ, सुंदर आणि चमकदार नखे दाखवण्यासाठी नेलपेंटचा हा शेड तुमच्याकडे असायला हवा. नखांना दोन ते तीन कोट लावल्यानंतर तुमची नखे यातून उठून दिसतात. शिवाय कोणत्या रंगावर कोणती नेलपेंट असा प्रश्न देखील यामध्ये येत नाही. ट्रान्सफरंटमध्येही दोन शेड्स असतात. एक थोडी पिवळ्या रंगाकडे झुकणारी असते तर एक क्रिस्टल क्लिअर असते. तुम्ही क्रिस्टल क्लिअर निवडलीत  तर उत्तम. फ्रेंच मेनिक्युअर आवडणाऱ्यांकडे तर हे असायलाच हवे. कारण फ्रेंच मेनिक्युअर पूर्ण करण्याचे काम ही नेलपेंट करत असते. त्यामुळे तुम्ही पहिला कोणता रंग जर तुमच्या नेलपेंट किटमध्ये ठेवणार असाल तर तो हा असेल.

काळवंडलेले अंडरआर्म्स असे करा स्वच्छ

transperent nails

ADVERTISEMENT

न्यूड (Nude)

न्यूड रंगाची सध्या चलती आहे. कारण हा असा रंग आहे जो तुमच्या सगळ्या कपड्यांवर चालू शकतो. अगदी इंडियनपासून ते वेस्टर्न आऊटफिट सगळ्यावर. तुमच्या त्वचेचा रंग कोणताही असला तरी हा शेड् कोणालाही चांगला दिसतो.त्यामुळे तुमचा त्वचेचा रंग कोणता याचा विचार याबाबतीत करु नका. या रंगाची आणखी एक खासियत सांगायची झाली तर हा रंग तुमच्या नखांना चांगला तर दिसतो. तुमची नखे खराब झाली असतील तरीही या रंगामुळे सगळं काही माफ असे होऊन जाते. या शेड्समध्ये ब्रँडनुसार थोडाफार फरक पडत असेल.

Also Read About अंगभूत toenail कारणे

nude

 हॉट रेड (Hot Red)

नेलपेंटसमध्ये तुमच्याकडे हॉट रेड नेलपेंट शेड नसेल तर तुमच्या इतर नेलपेंटसना काहीच अर्थ नाही. कारण हाच तो रंग आहे जो तुमच्या सगळ्या ट्रेडिशनल वेअरला पुरेपूर न्याय देत असतो.  लग्न, वाढदिवस, बारसा, असे कोणतेही समारंभ असो ही नेलपेंट शेड उठून दिसणारच. या रंगाच्या बाबतीतही तसेच आहे. तुमच्या स्किनटोनवरुन तुम्ही हा रंग लावू शकत नाही असे कोणी म्हणत असेल ते फार चुकीचे आहे. या रंगाबाबत काळजी घेण्याची गोष्ट अशी की, नेलपेंटची लावताना तुम्हाला थोडे सजग असावे लागते कारण हा रंग नीटच लागला गेला पाहिजे. कोट लावताना ही नेलपेंट एकसारखी लावली गेली नाही तर नखांवर पॅचेस आल्यासारखे वाटतात आणि मग या नेलपेंटची मजा निघून जाते.

ADVERTISEMENT

red nailpaint

बेबी पिंक (Baby Pink)

सर्वसाधारणपणे सगळ्याच मुलींना हा रंग आवडतो. नेलपेंटची ही शेड अशी आहे जी तुम्हाला अगदी डिसेंट लूक देते. म्हणजे ऑफिस किंवा तत्सम छोटेखानी कार्यक्रमात हा रंग चांगलाच दिसतो. या  रंगामध्ये हल्ली मिळणारा जेल पॉलीश हा प्रकार चांगला दिसतो. जेल पॉलीश लवकर सुकतेही आणि थोडीशी मॅट असल्यामुळे नखांना त्याचा एक वेगळा लुक मिळतो.

हा शेड ट्राय करुन पाहाbaby pink

टर्कीश ब्लू (Turquoise Blue)

नेलपेंटस म्हणजे लाल, गुलाबी असे छान छान रंगच असायला हवे अशी फॅशन असण्याचा काळ आता गेला. आता कॉलेज गोईंग तरुणी नखांवर वेगवेगळे रंग लावतात. त्यात चांगला आणि रॉयल दिसणारा रंग आहे टर्कीश ब्लू. हा रंग तुम्ही कधीच लावून पाहिला नसेल तर नक्की लावून पाहा कारण हा रंग वेगळा दिसतो. हा रंग फक्त मॅचिंग ड्रेस किंवा कपड्यांवर चांगला दिसतो असे नाही. हा रंग तुम्हाला एकदम फ्युजन लुक देतो. तुम्ही वेस्टर्न आऊटफिट घालणारे असाल तर तुम्ही हा रंग नक्कीच लावून पाहायला हवा. यामध्येही व्हरायटी आहे.

ADVERTISEMENT

tourquise blue

काळा (Black)

हल्ली सर्रास मुली काळा रंग लावताना दिसतात आणि खरंच हा रंग चांगला दिसतो. तुम्ही कोणतेही कपडे घातलेले असतील तरी काळा रंग तुमच्या नखांना, तुमच्या लुकला पुरेपूर न्याय देतो. त्यामुळे तुमच्या कलेकश्नमध्ये या रंगाची नेलपेंट असूच द्या.

घरगुती उपायांनी घालवता येईल टॅन

black nailpaint

ADVERTISEMENT

पेस्टल शेड्स (Pastel shades)

सध्या पेस्टल रंगाचीही क्रेझ आहे. मॅट प्रकारातील नेलपेंटस फिकट रंगामध्ये येतात.पण त्यामुळे तुमची नखे अधिक उठावदार दिसतात. पेस्टल रंगात निळा,गुलाबी या रंगामधील शेड्स असतात. या नेलपेंटसचा थोडा जाड थर लावला जात असल्यामुळे या नेलपेंटस अधिक टिकतात आणि चांगल्या दिसतात. शिवाय तुम्हाला नेल आर्ट आवडत असेल तर या नेलपेंटचा बेस चांगला पर्याय आहे.

पेस्टल शेड्स नेलपेंटस घेण्यासाठी इथे क्लिक करा

pestal

पिवळा (Yellow)

पिवळा रंग म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. कारण हा रंग नेलपेंटमध्ये कसा काय चांगला दिसेल नाही का? पण या रंगाची क्रेझ सध्या तरुणींमध्ये आहे. तुम्हाला वाटतो तसा धम्मक पिवळा रंग नेलपेंट शेड्समध्ये घेऊ नका तर  थोडा मस्टर्ड रंगाकडे झुकणारा पिवळा रंग घेण्यास काहीच हरकत नाही. शिवाय पिवळा रंग सुद्धा तुम्ही ट्राय करुन पाहू शकता.

ADVERTISEMENT

पिवळ्या नेलपेंटचे हे शेड्स करा ट्राय

yellow nails

गोल्डन ग्लिटर (Golden Glitter)

एकदा तरी आपल्याला पार्टीला जायचे असते. अशावेळी जर तुमचा ड्रेस साधा असेल तर तुमचा मेकअपच तुम्हाला ग्लॅमर लुक देत असतो. त्यामुळे गोल्डन ग्लिटर प्रकारातील नेलपेंट तुमच्याकडे असूच द्या. ग्लिटर नेलपेंटबाबत सांग्याचे झाले तर त्यामध्ये बारीक बारीक गोल्डन पार्टीकल असतात. म्हणजे या गोल्डन पार्टीकलचा आकार बदलत असतो आणि याचा बेस ही ट्रान्सफरंट नेलपेंट असते. त्यामुळे शिमरीप्रकारातील गोल्डन ग्लिटर नेलपेंट असूच द्या.

गोल्डन ग्लिटर नेलपेंट इथून घेऊ शकताgolden glitter

ADVERTISEMENT

गोल्डन आणि सिल्व्हर (Golden and Silver)

तुमच्याकडे कोणतेही रंग नसतील. पण गोल्डन आणि सिल्हवर हे रं जरी असतील तरी तुम्ही एखाद्या समारंभात जाऊ शकता. हा असा रंग आहे जो तुमच्या वेस्टर्न आणि ट्रेडिशनल आऊटफिटवर चांगला दिसतो. पण यासाठी तुमची नखे थोडी लांब हवी. म्हणजे हा रंग चांगला अधिक उठून दिसतो.

golden

तर हे १० नेलपेंट शेड्स तुमच्याकडे असायला हवेत पण तुमच्याकडे असलेल्या नेलपेंटसची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. नेलपेंटच्या बाबतीत अनेकदा एक गोष्ट होते की नेलपेंटस नेहमी सुकतात अशी अनेकांची तक्रार असते. त्यासाठी 

१. नेलपेंट कधीही फॅन खाली बसून लावू नका. त्यामुळे ती पटकन सुकून जाते. त्यामुळे नेलपेंट लावताना किमान हवा नसलेल्या ठिकाणी बसू नका.

ADVERTISEMENT

२. नेलपेंट खूप दिवस लावली गेली नाही तर ती घट्ट होते.अशावेळी ती लावण्याआधी नेलपेंट बॉटल गरम पाण्यात अगदी २ मिनिटासाठी ठेवा पातळ होईल. असे करत असताना पाणी खूपही कडकडीत नको. शिवाय नेलपेंटची बॉटल घट्ट बंद हवी.

३. नेलपेंट रिमुव्हर आणि थीनर यात फरक आहे अनेक जण नेलपेंट पातळ करण्यासाठी लिक्विड रिमुव्हर नेलपेंटच्या बॉटलमध्ये ओततात तसे करु नका बाजारात मिळणारे नेलपेंट थीनरच वापरा. त्यामुळे तुम्हाला अधिक काळ नेलपेंट वापरता येईल.

घरच्या घरी असे करता येईल हेअर स्पा

 (फोटो सौजन्य-Instagram)

ADVERTISEMENT

You May Also Like: Nail Art Ideas In Marathi

09 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT