पावसाळा मस्त सुरू झाल आहे. उष्णतेपासून सुटका तर मिळते पण या दिवसात ज्यांना मेकअपची आवड आहे त्यांंच्यासाठी थोडं कठीण असतं. पावसाळ्याच्या दिवसात चेहऱ्यावर दमटपणा सतत राहतो. त्यामुळे मेकअप टिकवून ठेवणं आणि पावसाच्या पाण्यातही लिपस्टिक टिकून राहणं तसं कठीण आहे. मग अशा वेळी पावसाळ्यात ग्लॅमरस लुकसाठी नक्की कोणत्या शेड्स वापरायच्या हेदेखील माहीत असायला हवं. सध्या कोरोनामुळे मास्क लावावा लागत असला तरीही लिपस्टिक तर प्रत्येक महिलेला प्रिय असते आणि कितीही मास्क लावला तरीही लिपस्टिकची शेड माहीत असणं कधीच वाईट नाही. या नाही तर अगदी पुढच्या पावसाळ्यातसुद्धा तुम्ही या लिपस्टिकच्या शेड्स वापरू शकता नक्की. तर अशा कोणत्या लिपस्टिक आहेत ते आपण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात मेकअप करण्यासाठी चेहऱ्यावर अतिशय कमी क्रिमचा वापर करणं आवश्यक आहे. त्यामुळे या वातावरणात तुम्ही सुंदर आणि ग्लॅमरस लुकसाठी लिपस्टिकचा वापर करू शकता.
फुशिया पिंक
पावसाळ्याच्या वातावरणात सुंदर लुकसाठी तुम्ही फुशिया पिंक शेडची लिपस्टिक लावा. न्यूड लिपस्टिकमध्ये फुशिया पिंक सर्वात सुंदर लिपस्टिक आहे. क्रिती सनॉनने लावलेली ही शेड तुम्हाला नक्कीच उठून दिसेल. तसंच पावसाळ्यात ही लिपस्टिक टिकूनही राहते. तुमचा स्किनटोन कोणताही असो सर्वच स्किनटोनवर ही लिपस्टिक शेड उठून दिसते. तसंच पावसाच्या पाण्याने ही लिपस्टिक निघून जात नाही.
कोरल शेड
ऑफिस लुकसाठी कोरल शेड सर्वात चांगली शेड आहे. दीपिका पादुकोणप्रमाणे तुम्ही ही शेड लाऊ शकता. कोरोना व्हायरसमुळे सध्या आपण घरातून काम करत आहोत. पण घरातूनही आपल्याला सध्या गुगल मीट अथवा झूम मीटिंग अटेंड कराव्या लागत आहेत. अशावेळी आपण या कोरल शेडचा वापर करू शकतो. सध्या कोरल शेड ट्रेंडमध्ये आहे. ही ट्रेंडी कोरल शेड तुम्ही तुमच्य्या मेकअप किटमध्ये ठेवायलाच हवी.
लिपस्टिकचा रंग निवडताना करा या गोष्टींचा विचार
चेरी लिपस्टिक
प्रियांका चोप्रा बी – टाऊनची नावाजलेली अभिनेत्री आहे. बऱ्याचदा सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा आपल्या सौंदर्यासंबंधित टिप्स शेअर करत असते. प्रियांका चोप्राने 5 मिनिट्समध्ये तयार व्हायचं असेल तर आपल्या डोळ्यांवर थोडीशी शिमरी आयशॅडो लावा सांगितले असून मस्कारा लावा आणि त्यानंतर ओठांना चेरी लिपस्टिक लाऊन आपला लुक पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. प्रियांकाच्या स्किनटोनला ही लिपस्टिक सुंदर दिसतेच आहे. पण इतर कोणत्याही स्किनटोनला ही लिपस्टिक पावसाळ्यात शोभून दिसेल.
लिक्विड लिपस्टिक लावताना होतोय त्रास, तर जाणून घ्या योग्य पद्धत
लाईट ब्राऊन
लाईट ब्राऊन रंगाची लिपस्टिक सध्या महिलांची पहिली पसंत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लाईट ब्राऊन शेडमुळे चहेऱ्यावर नैसर्गिक लुक उठून दिसतो. या लिप कलरसह तुम्ही न्यूड आयशॅडो लावा. सोनाक्षी सिन्हाच्या या लुकप्रमाणे लाईट ब्राऊन लिपस्टिकसह तुम्ही स्मोकी आईज मेकअपदेखील करू शकता. पण पावसाळ्यात तुम्ही केवळ या लिपस्टिक शेडने स्वतःचा लुक अप्रतिम करू शकता. इतर मेकअपचीदेखील तुम्हाला गरज भासणार नाही.
तुमच्या कलेक्शनमध्ये असल्याच पाहिजेत या ‘5’ लिपस्टिक शेड्स
रेड हॉट लिपस्टिक
रेड हॉट लिपस्टिक हे तर प्रत्येक महिलेच्या मेकअप किटमधील पहिली लिपस्टिक असते. क्लासी लुकसाठी तुम्ही रेड लिपस्टिक लावली की काम झालं. चेहऱ्यावर लाईट मेकअप आणि रेड लिपस्टिक तुमचा लुक पूर्णतः बदलून टाकते. करिश्मा कपूरला बरेचदा आपण रेड हॉट लिपस्टिकमध्ये पाहिलं आहे. तिचा हा लुक तुम्हीसुद्धा पावसाळ्याच्या या दिवसात करू शकता. सहसा रेड लिपस्टिक पटकन निघून जात नाही आणि दिसायलादेखील क्लासी दिसते.