ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
डिझाईनर ब्लाऊज उठावदार दिसण्यासाठी अशी नेसा साडी

डिझाईनर ब्लाऊज उठावदार दिसण्यासाठी अशी नेसा साडी

फॅशन इंडस्ट्री असो अथवा नॉर्मल आयुष्य असो कायम टिकणारी फॅशन म्हणजे साडी. साडीमध्येही हल्ली इतके ट्रेंडी आणि स्टायलिश लुक आले आहेत की तुम्हाला साडीसह वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन्सचीही भुरळ पडते. ब्लाऊजच्या युनिक आयडियाज आणि त्यासह साडी कशी नेसायची अथवा डिझाईनर ब्लाऊज इतके वेगवेगळे आणि मस्त असतात की, ते उठावदार दिसण्यासाठी साडी कशी नेसायला हवी हे आम्ही या लेखातून आज तुम्हाला सांगणार आहोत. कारण इतका सुंदर ब्लाऊज जर पदराखाली लपला तर फॅशन डिझाईनरची सगळी मेहनत फुकट जाते. त्यामुळे साडीसह जो डिझाईनर ब्लाऊज तुम्ही घालणार आहात तोदेखील तितकाच उठवदार दिसायला हवा यासाठी काही सोप्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यासाठी तुम्ही तुमच्या साडीची नेसण्याची पद्धत बदलू शकता. 

सैलसर पदराची स्टाईल (loose pallu style)

सैलसर पदराची स्टाईल (loose pallu style)

Instagram

डिझाईनर ब्लाऊज घातला असेल तर तुम्ही सैलसर पदराची स्टाईल करू शकता. ही स्टाईल करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे – 

ADVERTISEMENT
  • लूज अर्थात सैलसर पदर साडीचा काढायचा असेल तर त्यासाठी शिफॉन, जॉर्जेट, शिफॉन सिल्क अशा फॅब्रिकच्या साड्या अथवा हलक्या वजनाच्या साड्यांचा उपयोग करा 
  • या साडीचा पदर कमरेपासून सैल सोडा आणि खांद्यावर पदराच्या प्लेट्स तयार करा आणि मग पिनअप करा
  • या तऱ्हेने साडी नेसण्याची स्टाईल असेल तर तुम्ही त्यासह स्ट्रेप ब्लाऊज, टर्टल नेक ब्लाऊज आणि ब्रालेट ब्लाऊज वापरू शकता 

नववधूकरिता नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स

बेल्ट साडी लुक (Belt Saree Look)

बेल्ट साडी लुक (Belt Saree Look)

Instagram

साडीसह मॅच करणारा बेल्ट साडी लुक तुम्ही करू शकता. यासह तुम्ही हेव्ही हार्ट शेप ब्लाऊज अथवा हेव्ही डिझाईनर ब्लाऊज घालून साडीचा लुक अधिक चांगला करू शकता. तुम्हाला जर अशी साडी नेसायची असेल तर तुम्ही तुमच्या साडी नेसण्याची पद्धत बदलून वेगळा लुक देऊ शकता. 

ADVERTISEMENT
  • हेव्ही साडीचा पदर तुम्ही सैलसर सोडणं कठीण असतं. त्यामुळे तुम्ही या साडीवर बेल्टचा वापर करा. यामुळे साडी सांभाळायला चांगला सपोर्टही मिळतो. तसंच तुमचा पूर्ण लुक बदलतो 
  • तसंच साडीला लावण्यात येणारा बेल्ट हा अजिबात हेव्ही वापरू नका. त्यामुळे ब्लाऊजपेक्षा बेल्टकडे लक्ष जाईल. डिझाईनर ब्लाऊज आणि साडीकडे जास्त लक्ष द्या 

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

कोट अथवा कुर्ती ब्लाऊजसह साडी ड्रेपिंग (Saree Draping with coat or kurti blouse)

कोट अथवा कुर्ती ब्लाऊजसह साडी ड्रेपिंग (Saree Draping with coat or kurti blouse)

Instagram

साडीच्या वेगवेगळ्या स्टाईल आता दिसून येतात. तसंच त्याबरोबर वेगवेगळे ब्लाऊजही आता ट्राय केले जातात. तुम्हालाही जर वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही नक्की कोट अथवा कुर्ती ब्लाऊजची स्टाईल करून पाहा. हे कॅरी करणं अत्यंत सोपं आहे. तसंच ही साडी नेसणंही सोपं आहे. 

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिले साडीचा प्लेट्स काढून पदर काढून घ्या आणि या पदराच्या प्लेट्स या मध्यम स्वरूपाच्या काढा. अगदी जाड्या वा अगदी बारीक काढू नका 
  • या प्लेट्स जरा सैलसर ठेवा आणि खांद्यावर पिनअप करण्याआधी एक डीप अर्क बनवा. हा अर्क ब्लाऊजच्या अगदी टोकापर्यंत यायला हवा. जेणेकरून ब्लाऊज आणि साडी दोन्ही व्यवस्थित उठावदार दिसू शकतील
  • ही साडी नेसताना याचा पदर मागून लहान राहील याची काळजी घ्या 

अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल

मफलर स्टाईल पल्लू ड्रेपिंग (Maflar Style Pallu Draping)

साडी नेसण्याचा हा अंदाज एकदम स्टायलिश आहे. तुम्हीही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना हा लुक ट्राय करू शकता. ही स्टाईल बारीक मुलींना अधिक शोभून दिसते. 

  • तुम्ही साडी नेसताना नॉन पार्टी लुक साडीचा पर्याय निवडा
  • चुकूनही ही स्टाईल सिल्क अथवा कॉटन साडीवर करू नका. यासााठी तुम्ही शिफॉन अथवा जॉर्जेट साडीची निवड करा. हा लुक या साड्यांवर अधिक खुलून दिसतो 
  • यासाठी तुम्ही मीडियम डीप नेक अथवा डिझाईनर ब्लाऊजची निवड करा. जेणेकरून ते अधिक उठावदार दिसेल

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

 

ADVERTISEMENT

नॅरो पल्लू ड्रेपिंग स्टाईल (Narrow Pallu Draping Style)

नॅरो पल्लू ड्रेपिंग स्टाईल (Narrow Pallu Draping Style)

Instagram

कटवर्क डिझाईन ब्लाऊज तुम्हाला घालायचा असेल आणि ज्यावर हेव्ही एम्ब्रॉयडरी आणि ग्लास वर्क करण्यात आलेले असेल तर तुम्ही अजिबात डिझाईन लपवू नका. स्टायलिश अंदाजात तुम्ही याचा अगदी बारीक पदर करून ही साडी नेसा.

  • तुम्हाला ही साडी नेसायची असेल तर तुम्ही अगदी हलक्या साडीचा वापर करावा 
  • कमीत कमी वर्क करण्यात आलेली साडी आणि प्रिंट नसणारी साडी तुम्ही वापरावी 
  • तुम्ही बारीक असाल तरच ही स्टाईल तुम्ही कॅरी करा 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT

 

31 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT