ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Confirmed : करण पटेलने सोडली ‘ये है मोहब्बतें’ सीरियल

Confirmed : करण पटेलने सोडली ‘ये है मोहब्बतें’ सीरियल

हिंदी टेलीव्हिजन सीरियल्समधील पॉप्युलर सीरियल ‘ये है मोहब्बतें’ गेली 6 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सीरियलमधील मुख्य कलाकार रमण भल्ला आणि ईशिता भल्ला या दोघांनाही फॅन्सनी भरपूर प्रेम दिलं. त्यांच्यातील भांडण असो वा प्रेम, प्रेक्षकांना खूष ठेवण्यासाठी फक्त या दोघांचं एकत्र असणंच पुरेसं होतं. पण आता लवकरचही जोडी वेगळी होणार आहे. कारण रमण भल्लाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता करण पटेलने सीरियल सोडण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. 

करण पटेलने सोडली सीरियल

गेल्या काही दिवसांपासून या सीरियलमधून रमण भल्लाचं पात्र गायबच होतं. डॉन साहिल शाहचा ट्रॅक संपल्यानंतर अचानक रमण भल्लाला सीरियलमधून गायब करण्यात आलं होतं. दरम्यान मधेच कथेच्या प्लॉटनुसार काही वेळासाठी रमणला दाखवण्यात आलं होतं पण आता मात्र रमण भल्लाच्या भूमिकेला करण पटेलने अलविदा केलं आहे. 

सूत्रानुसार, करणने सीरियलने सोडल्याची बातमी खरी असल्याचं सांगितलं आहे. करणने सांगितलं की, “सगळ्या चांगल्या गोष्टी एक दिवस संपतात. ‘ये है मोहब्बतें’ शो नेहमीच्या माझ्या हृदयाच्या जवळ राहील आणि मला रमण भल्लाच्या भूमिकेसाठी निवडण्यासाठी मी एकता कपूरचा आभारी आहे. 

ADVERTISEMENT

‘खतरों के खिलाडी’ बनणार करण पटेल

तुमच्या माहितीसाठी आता अभिनेता करण पटेलने ही सीरीयल प्रसिद्ध रिएलिटी शो ‘खतरों के खिलाडी’साठी सोडला आहे. या सिझनमध्ये करण पटेल ‘खतरों के खिलाडी’ बनून खतरनाक स्टंट्स करताना दिसेल.

करणच्या पब्लिसिस्टने प्रेस स्टेटमेंट जारी करत सांगितलं की, “हो, करण पटेल ‘खतरों के खिलाडी’मध्ये भाग घेणार आहे. करणच्या डेट्सचं समीकरण हे ‘ये है मोहब्बतें’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या दोन्ही प्रोजेक्ट्समुळे जुळत नव्हतं. त्यामुळे त्याने ‘ये है मोहब्बतें’ सोडण्याचा निर्णय घेतला. सीरियल ‘ये है मोहब्बतें’ ने त्याला खूप प्रेम मिळालं. त्याबद्दल तो आभारी आहे. 

ADVERTISEMENT

आता हा अभिनेता दिसणार रमण भल्लाच्या भूमिकेत

करण पटेलने ही सीरियल सोडल्याची बातमी येताच आता या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. तर आम्ही सांगत आहोत की, आता या भूमिकेत दिसणार आहे अभिनेता चैतन्य चौधरी कास्ट करण्यात आल्याची बातमी आहे. सूत्रानुसार, चैतन्य चौधरी लवकरच करण पटेलला सीरियलमध्ये रिप्लेस करेल. चैतन्य चौधरीला तुम्ही ‘सीआयडी’ आणि ‘कहीं तो होगा’ सारख्या सीरियल्समध्ये तुम्ही पाहिलं असेलच.

आता पाहूया 6 वर्षांनंतर रमणच्या भूमिकेत प्रेक्षकांना हा दुसरा अभिनेत्रा कितपत रूचतो ते. 

हेही वाचा –

ADVERTISEMENT

टेलीव्हिजनवर पुन्हा सुरू होणार ‘हम पांच’ हिंदी मालिका

संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘ये है मोहबतें’ फेम विवेक दहिया झळकणार नागिन 4 च्या प्रमुख भूमिकेत

22 Jul 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT