ADVERTISEMENT
home / मनोरंजन
#POPxoMarathiBappa : अभिनेत्री स्मिता तांबे स्वहस्ते साकारते ‘ट्री-गणेशा’

#POPxoMarathiBappa : अभिनेत्री स्मिता तांबे स्वहस्ते साकारते ‘ट्री-गणेशा’

मराठी आणि हिंदीतील गुणी अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी सात दिवस गणेशोत्सव साजरा होतो. तिच्याकडे गणेशापाठोपाठच गौरींचेही आगमन होते. जेवढ्या मन लावून आपल्या प्रत्येक भूमिका स्मिता रंगवते, तेवढ्याच तन्मयतेने ती आपल्या लाडक्या बाप्पाचे आपल्या घरी आगत-स्वागत करते. पण महत्त्वाची गोष्ट अशी की, स्मिताच्या घरी बाहेरून गणेशमूर्ती विकत आणली जात नाही, तर ती स्वतः घरच्याघरी गणपतीची मुर्ती घडवून तिचा साजशृंगार करण्यापासून ते नैवेद्य आणि पूजा करण्यापर्यंत सर्व स्वत:च करण्यावर स्मिताचा भर असतो.

स्मिताच्या घरचा ट्री-गणेशा बाप्पा

स्मिता तांबे आपल्या घरातल्या बाप्पाबद्दल सांगताना म्हणाली की, “मी आणि माझे यजमान आम्ही गणेशोत्सवाच्या अगोदर आठ दिवसांपासून तयारीला सुरूवात करतो. ते गणेशाची मूर्ती घडवतात. त्याला रंगवतात आणि मूर्तीला आभूषणे-वस्त्र हे सर्व मी करते. आम्ही शाडू मातीची मूर्ती घडवताना मूर्तींमध्ये बियाणं टाकतो. आम्ही मूर्ती घरीच कुंडीत विसर्जित करतो. त्यामुळे विसर्जनानंतरही बाप्पाचा आशिर्वाद त्या नव्या उगवलेल्या रोपाच्या रूपात आमच्यासोबत कायम राहतो.”

इतरांसाठीही साकारते बाप्पा

ADVERTISEMENT

स्मिता तांबे फक्त स्वतःच्या घरापुरतंच नाहीतर इतरांसाठीही गणपतीची मूर्ती बनवतात. याबाबत सांगताना ती म्हणाली की, “आमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना जेव्हा आमची गणेशोत्सव साजरा करण्याची ही पध्दत समजली. तेव्हा त्यांनी आम्हांला त्यांच्या घरच्या गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आता आम्ही आमच्या घरच्या गणपतीशिवाय गणेशोत्सवाच्या अगोदर जवळ-जवळ सात ते आठ गणेश मूर्ती बनवतो.”

गणेशोत्सवादरम्यानचा ब्रेक

स्मिता गणेशोत्सवादरम्यान चक्क कामातून ब्रेकही घेते. या ब्रेकबाबत स्मिताने सांगितलं की, “गणेशोत्सवाच्या काळात मी नाटकाचे प्रयोग किंवा शूटींग करत नाही. वर्षातून एकदा बाप्पा घरी येतो. तर त्याच्यासाठी घर स्वच्छ करण्यापासून ते त्याचे कपडे बनवणे. त्याच्यासाठी नैवेद्याचे जेवण घरी बनवणे आणि गौराईचेही आगत-स्वागत करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मला स्वत:ला करायला आवडतात. हा सण आपल्याला खूप सकारात्मकता आणि उत्साह देऊन जातो, असं मला वाटतं. त्यामुळे भक्तिभावाने बाप्पाची आराधना करायला मला खूप आवडते.”

पाहा स्मिताने घरी साकारलेल्या बाप्पाचा हा व्हिडिओ आणि तिची छोटीशी मुलाखत. 

ADVERTISEMENT

मग तुमच्या घरच्या बाप्पाची तयारी झाली की नाही. गणेशोत्सवाबाबतचे आणि सेलिब्रिटींच्या बाप्पाबाबतचे अपडेट्स वाचण्यासाठी फॉलो करा #POPxoMarathi. तुम्हाला आमच्या वेबसाईटवर अजून काय वाचायला आवडेल हेही आम्हाला नक्की सांगा.

हेही वाचा –

गणपतीसाठी वेगळ्या आणि सोप्या Modak Recipes

#MemoriesOfYourBappa: मराठी सेलिब्रेटींच्या आठवणीतला बाप्पा

ADVERTISEMENT

#MemoriesOfYourBappa: कोकणातील गणेशोत्सवाच्या आठवणी

30 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT