ADVERTISEMENT
home / Festival
gudi-kashi-ubharavi-in-marathi

गुढी कशी उभारावी: महत्त्व,पूजा, गुढीची साडी, नेवैद्य संपूर्ण माहिती

गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य! झाल्यागेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्रपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा सणाची माहिती तर सर्वांनाच आहे. जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका नव्या दमाने, नव्या उमेदीने, अत्यंत चांगल्या वातावरणासह सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस. या दिवशी महाराष्ट्रीयन मराठी घरांमध्ये घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यासाठी खास पदार्थ तयार करण्यात येतात. तर घरोघरी महिला वेगवेगळ्या साड्या नेसून या सणासाठी तयार होतात. काही जणांना विशेषतः नव्या पिढीला गुढी कशी उभारावी माहिती (Gudhi Kashi Ubharavi) कमी असलेली दिसून येते. त्यामुळे गुढी कशी उभारावी अर्थात गुढी कशी उभारतात (Gudi Kashi Ubharavi) याबाबत महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून देत आहोत. यासह गुढीपाडवा 2022 (Gudi Padwa 2022) चा गुढी उभारण्याचा नक्की मुहूर्त कोणता आहे हेदेखील जाणून घ्या आणि द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

गुढी कशी उभारावी – Gudhi Kashi Ubharavi

गुढी कशी उभारावी - Gudi Kashi Ubharavi
गुढी कशी उभारावी

गुढी कशी उभारावी हे जाणून घेण्याआधी गुढी उभारण्यामागील नक्की कारण काय आहे, हे माहीत असायला हवे. यामागे पौराणिक कारण सांगण्यात येते की, चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षाला प्रारंभ होतो आणि ब्रम्ह पुराणामध्ये संकेत मिळाल्याप्रमाणे या तिथी रोजी ब्रम्हदेवाने सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राम्हण वेदामध्ये याचा उल्लेख आढळतो असं सांगण्यात येते. तर गुढी उभारण्याच्या अनेक कथा आहेत. या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्येला परतले होते आणि विजय पताका लाऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते. याशिवाय याचदिवशी विष्णू देवतेने मस्त्यावतार धारण केला होता असेही पुराणात सांगण्यात येते. तर सत् युगाचाही याच दिवशी प्रारंभ झाला म्हणून गुढी उभारण्यात येते असंही सांगण्यात येते. 

गुडीपाडव्याचे आरोग्यदृष्ट्या काय आहे महत्त्व? – Gudhipadva Che Mahatva

आरोग्यदृष्ट्या काय आहे महत्त्व? - गुढी कशी उभारावी
गुडीपाडव्याचे महत्त्व

गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी मीठ, हिंग, मिरी, ओवा आणि साखर ही कडुलिंबाच्या पानासह वाटून खाल्ली जाते. पित्ताचा त्रास नाहीसा करणे, पचनक्रियेत सुधारणा होणे आणि त्वचेचा रोग बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात असं सांगण्यात येते. तसंच शरीराला थंडावा देणारी अशी ही कडुलिंबाची पाने पाण्यात घालून आंघोळ केल्याने आणि खाल्ल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याने, वर्षाच्या सुरूवातीच्या दिवशी आरोग्य चांगले राहिल्यास कायम चांगले राहते असे समजून यादिवशी हे खाण्याची प्रथा आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे महत्त्व आहे. काही घरांमध्ये कडुलिंबाची चटणी करून खाल्ली जाते, जेणेकरून आजार दूर राहतील. 

गुढी कशी उभारावी पद्धत – Gudhi Kashi Ubharavi Step By Step

गुढी कशी उभारावी याची इत्यंभूत पद्धत इथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पूर्वपरंपरागत तुम्ही शिकत आलाच असणार. पण तरीही काही जणांकडे माहिती नसते. त्यांनी आपल्या घरी पहिल्यांदाच गुढी उभारत असल्यास, या लेखाचा नक्की आधार घ्यावा. 

ADVERTISEMENT
  • सर्वात प्रथम तुम्ही मध्यम उंचीची आणि आकाराची लाकडाची काठी घ्या 
  • या काठीच्या टोकाला तुम्ही एखादा लाल, पिवळा अथवा नारिंगी रंगाचा कपडा अथवा साडी बांधा. सोन्याचे अर्थात जरीचे काठ असतील तर उत्तमच. काळ्या रंगाचा कोणताही कपडा यासाठी वापरू नये
  • आंब्याची पाने आणि कडुलिंबाची पाने या साडी वा कपड्याभोवती गुंडाळा. त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार याभोवती व्यवस्थित बांधा आणि त्यात साखरेच्या बत्ताशांची माळही अडकवा 
  • त्यानंतर काठीच्या टोकावर पितळी अथवा चांदीचा तांब्या उपडा घाला. यानंतर आपल्याकडे असणाऱ्या उंच ठिकाणी ब्रम्हध्वजाचे प्रतीक समजण्यात येणारी ही गुढी चांगल्या भावनेने आणि अतिशय सन्मानाने आणि आनंदाने तुम्ही उभारा 

गुढी उभारण्याची तिथी आणि शुभमुहूर्त – Gudhi Pujan, Tithi Ani Muhurt

गुढी उभारण्याची तिथी आणि शुभमुहूर्त
गुढी उभारण्याची तिथी आणि शुभमुहूर्त

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे याला विशेष असा मुहूर्त नसतो. सूर्योदयापासून कधीही गुढीचे पूजन घरोघरी करता येते. 

चैत्र प्रतिपदा शुभारंभ – शनिवार, 2 एप्रिल, 2022 श्री शालिवाहन शकसंवत 1944 प्रारंभ 

प्रतिपदा तिथी सुरू – 1 एप्रिल, 2022 रोजी रात्री 11 वाजून 55 मिनिटे

प्रतिपदा तिथी समाप्ती – 2 एप्रिल, 2022 रोजी रात्री 12.00 वाजता 

ADVERTISEMENT

गुढीची पूजा कशी करावी – Gudhi Padwa Pooja Marathi

गुढी कशी उभारावी - Gudhi Kashi Ubharavi
गुढीची पूजा

गुढी कशी उभारावी हे आपण वर जाणून घेतले. पण गुढी उभारतना पूजा कशा पद्धतीने करायची याचीही माहिती असायला हवी. गुढीची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती – 

  • पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे आणि अंगाला उटणे आणि सुगंधित तेल लाऊन अभ्यंगस्नान करावे
  • दरवाजाला ताज्या फुलांचे तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावा आणि त्याला स्नान घाला. 
  • नंतर त्या काठीच्या टोकाला एक केशरी वस्त्र बांधावे. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे, त्यावर स्वस्तिक काढावे आणि गजरा बांधावा. 
  • नंतर कलश उपडा ठेवावा. काठीला आंब्याचे डाहाळी, कडिलिंबाचा पाला, फुलांची माळ, बत्ताशांची माळ घातली जाते
  • घरातून उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने गुढी उभारावी. हळद कुंकू वाहावे
  • धूप – दीप अगरबत्ती दाखवून पूजा करावी. त्यानंतर नेवैद्य दाखवून गुढीला नमस्कार करावा. गुढीपाडव्याच्या दिवशीच पंचांग वाचन आणि पूजनही केले जाते. सरस्वती देवीचे पूजन ककरून शालेय साहित्य, पाटी, वह्या सर्व पूजण्याचीही प्रथा आहे. आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करावी
  • काही ठिकाणी पाटीपूजनाची प्रथा आहे. हा ब्रम्हपूजनाचा दिवस आहे, त्यामुळे श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरूभ्य नमः असे लिहून त्यावर सरस्वती काढण्यात येते आणि पाटीचे पूजन करण्यात येते

गुढीची साडी – Gudhichi Sadi

गुढीची साडी
गुढीची साडी कशी असावी

अगदी पूर्वपरंपरागत गुढीची साडी ही जरीची अथवा काठापदराची नेसवण्यात येत होती. मात्र कालानुसार त्यात बदल झाला. मात्र आजही अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी गुढीला नेसविण्यात येते. त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे खणाच्या साडीची. गुढीसाठी खणाची साडी, काठापदराची आणि जरीच्या पिवळ्या, भगव्या, हिरव्या अशा गडद रंगांच्या साडीची निवड सहसा करण्यात येते. असा रंग निवडण्यात येतो जो आपल्या शरीरात शक्तीचा संचार करू शकतो. गुढीपाडव्यासाठी खास महाराष्ट्रीयन लुक करून घरातील महिलादेखील वेगवेगळ्या प्रकारच्या आणि नव्या साड्या परिधान करताना दिसून येतात. तर घरोघरी खास रांगोळीची आरास करण्यात येते. तुम्हाला आवडणारी साडीही तुम्ही गुढीला नक्कीच नेसवू शकता.

गुढीपाडव्याला गुढीसाठी नेवैद्य काय असावा – Gudhipadva Naivedya

गुढीपाडव्याला गुढीसाठी नेवैद्य
गुढीपाडव्याला गुढीसाठी नेवैद्य

सहसा पूर्वपरंपरागत पद्धतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी अथवा श्रीखंड करण्याची पद्धत होती. पण काळानुसार यामध्ये अनेक बदल घडत गेले. आजही अनेक घरांमध्ये गुढीसाठी नेवैद्य म्हणून श्रीखंड पुरीचा बेत करण्यात येतो. पण तरीही आपापल्या आवडीप्रमाणे या दिवशी घरात गोडाधोडाचा नेवैद्य करण्यात येतो. वरण भात, कोशिंबीर, चटणी, पापड लोणचे, बटाट्याची भाजी, पुरी, खीर, गोडाचा शिरा, श्रीखंड, पुरणपोळी, घाटलं, साखरभात, पुरण असे अनेक पदार्थ या दिवशी देवासाठी आणि गुढीसाठी नेवैद्य म्हणून दाखविण्यात येतात. आजही खास या दिवशी वेळ काढून घरातच सर्व महाराष्ट्रीयन असे हे खास पदार्थ बनविण्यात येतात आणि गुढीपाडव्याचा हा सण एकत्रितपणे साजरा करण्यात येतो. 

गुढीसाठी कसे वाढाल नेवैद्याचे ताट 

नेवैद्याचे ताट वाढण्याची एक पद्धत असते आणि त्यानुसारच सहसा नेवैद्य दाखविण्यासाठी ताट वाढले जाते. कसे ते घ्या जाणून – 

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिल्यांदा ताटामध्ये डाव्या बाजूला दही वाढावं
  • डाव्या बाजूने सुरूवात करावी. त्याखाली लिंबू, त्याखाली चटणी, लोणचं, कोशिंबीर, तळणीतील पदार्थ अर्थात पापड, मिरगुंड हे पदार्थ वाढावेत
  • त्यानंतर गोड पदार्थ अर्थात खीर, पुरण असे जे गोड पदार्थ असतील ते वाढावेत 
  • तर उजव्या बाजूला प्रथम कोरडी भाजी, त्याखालोखाल रसभाजी, उसळ, पातळ भाजी आणि त्यानंतर कढी अथवा आमटी जे काही असेल तो पदार्थ वाढावा
  • मध्यभागी सर्वप्रथम मसालेभात अथवा वरण भात, पोळी, मग गोडाचा शिरा असल्यास हा पदार्थ वाढावा

गुढीचे महत्त्व, पूजा आणि गुढी कशी उभारावी याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही दिली आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 

26 Mar 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT