कॉफी हा खूप जणांचा वीक पॉईंट आहे. अगदी कधीही, कोणत्याही वेळी कॉफी दिली की त्याला नाही म्हणणारे कॉफी लव्हर तुम्ही फारच कमी पाहिले असतील. हल्ली दुधाच्या कॉफीपेक्षाही अधिक काळी कॉफी ( Black Coffee) प्यायला अधिक जास्त आवडते. वर्कआऊट किंवा व्यायामाच्या आधी शरीराला जास्तीत जास्त उर्जा मिळावी आणि वजन झपाट्याने कमी व्हावे यासाठी खूप जण ब्लॅक कॉफी पितात. बिनासाखरेची काळी कॉफी ही किक देणारी असते. पण त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी करायचा असेल तर तुम्ही कॉफीमध्ये एक चमचा तूप घालायला हवे. जाणून घेऊया कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचे फायदे
डबल चिनमुळे चेहरा जाड दिसत असेल, तर फॉलो करो सोप्या टिप्स
त्वचेसाठी फायदेशीर
कॉफी आणि तूपामध्ये असलेले घटक त्वचेसाठी फारच फायद्याचे असतात. कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्टिडंट घटक त्वचा चांगली ठेवण्याचे काम करतात.त्यामुळे त्वचा चिरतरुण राहते. तर तूपामध्ये असलेले घटक तुमच्या त्वचेला मॉश्चरायईज करण्याचे काम करतात. त्यामुळे तुम्हाला दोन्ही घटक मिळतात. त्वचेचे टाईटनिंग होण्यासाठी या दोन्ही घटकांचा खूप फायदा होत असल्यामुळे तुम्ही कॉफीमध्ये एक चमचा तूप घालून प्यायला हवे.
चयापचय क्रिया वाढणे
वजन कमी करण्यासाठी पोटाचे कार्य सुरळीत असणे गरजेचे असते. कॉफीमध्ये तूप घालून प्यायल्यामुळे पचनाचे कार्य चांगले होते. शिवाय त्यामुळे भूकही लवकर लागत नाही.तूप हे थोडे जड असते. कॉफीमध्ये ते घातल्यामुळे पचनाचा वेग वाढतो. जर तुम्हाला पचनाचा त्रास असेल किंवा भूक खूप करुन तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तूपाचे फायदे यामध्ये याचा समावेश होतो
शरीराला मिळते उर्जा
कॉफी शरीराचे कार्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. त्यामध्ये तूप घातल्यामुळे आणखी फायदे मिळतात. शरीराला या दोन गोष्टींमुळे उर्जा मिळण्याचे काम होते. वर्कआऊट करण्याआधी शरीराला उर्जा मिळावी आणि शरीरातील फॅट लवकर विरघळावे यासाठी कॉफी आणि तूप हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला थोडासा थकवा आल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही कॉफी आणि तूप याचे सेवन करायला हवे.
या गोष्टीही असू द्या लक्षात
कॉफी आणि तूप पिण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्याचे सेवन करण्याचा विचार केला असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत हव्यात त्यामुळे नक्कीच त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.
- कॉफी आणि तूप हे कॉम्बिनेशन शरीरालाठी चांगले असले तरी देखील तुम्ही त्याचे जास्त सेवन करणे चांगले नाही. कारण त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.
- हल्ली सगळ्यांनाच सकाळी पुरेसा असा नाश्ता करता येत नाही.जर तुमचाही नाश्ता करणे राहून जात असेल तर शरीराला पुरेशी उर्जा मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच तूप घातलेली कॉफी प्यायला हवी. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
- कॉफी तुम्ही दिवसभऱातून फक्त एकदाच प्यायला हवी. कारण सतत कॉफीचे सेवन हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
- कॉफी आणि तूपमुळे वजन कमी होते. म्हणून तुम्ही त्यामध्ये जास्त प्रमाणात तूप घालत असाल तर ते देखील चांगले नाही. कारण तूप जास्त घातल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते.
आता कॉफीमध्ये तूप घालून प्या आणि वजन कमी करा.
अधिक वाचा
फळांचे रस पिताना या गोष्टी असू द्या लक्षात
चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)