Advertisement

मनोरंजन

‘परशा’ अर्थात आकाश ठोसरचा नवा लुक करतोय चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 15, 2021
akash-thosar

Advertisement

‘सैराट’ (Sairat) चित्रपटातून प्रत्येकाला वेड लावणारा अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून अत्यंत व्हायरल होत आहेत. सैराटमधील परशा तो हाच का? असा प्रश्न कोणालाही पडले असा अफलातून नवा लुक आकाशचा दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासच या फोटोमधून चाहत्यांना दिसून येत आहे. तर अनेक मुलींनी त्याच्या या फोटोंवर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ड्रॉप डेड डॅपर लुक (drop dead dapper look) मध्ये आकाश खूपच हँडसम दिसत आहे. एखाद्या बॉलीवूडच्या हिरोलाही मागे टाकेल अशादेखील कमेंट्स आकाशला मिळत आहेत. 

अधिक वाचा – मराठी अभिनेत्रींचा खास गणपती फेस्टिव्ह लुक, तुम्हीही करा अशी स्टाईल

मोनोक्रोम फोटोंच्या प्रेमात 

आकाशने आपले काही मोनोक्रोम फोटो (Monochrome Photos) शेअर केले आहेत. त्याचा हा लुक अक्षरशः तरूणींना घायाळ करणारा आणि तरूण मुलांना नक्कीच टशन देणारा आहे. कोणतीही मुलगी आकाशच्या प्रेमात हे फोटो पाहून पडले असेच हे फोटोशूट आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. डेनिम शर्ट आणि डेनिम शर्ट घातलेल्या आकाशने एका फोटोला कॅप्शन दिले आहे, ‘Just Me’ अर्थात स्वतःमध्येच मग्न असणारा आकाशचा हा फोटो लक्षवेधी आहे. विखुरलेले केस आणि चेहऱ्यावरील सुंदरता या फोटोमध्ये योग्यरिता कॅप्चर करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आकाशचे हे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकर (Tejas Nerurkar) याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘Fearless’ अर्थात कोणालाही न घाबरणारा अशी कॅप्शन आकाशने दिली आहे. आकाशचा हा नवा लुक फारच कमी वेळामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. तर हा आर्चीचा परश्या फारच बदललेला आणि अधिक आत्मविश्वासाने वावरणारा, तसंच आता इंडस्ट्रीत स्थिरावला आहे असंही या फोटोंमधून जाणवत आहे. 

अधिक वाचा – जेनेलिया देशमुखचा मराठमोळा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

करण जोहरला होणार पश्चात्ताप, मजेशीर कमेंट्स 

आकाशच्या या फोटोंवर आर्चीनेदेखील कमेंट केली आहे. रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘ऑन फायर’ची इमोजी टाकत आपल्या भावना व्यक्त केल्यात. तर अभिनेत्री हेमल इंगळेने हा कोण आहे असा प्रश्न आकाशला केला आहे. तर काही चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स करत आकाशच्या दिसण्याबद्दल त्याची स्तुती केली आहे. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे की, ‘करण जोहर ला आता पश्चाताप होणार की धडक मध्ये आकाश ला घेतलं असत तर हिट झाला असता picture’ तर एका मुलीने म्हटले आहे की, ‘अरे देवा काय हॉटनेस आहे’. त्यामुळे अनेक कमेंट्समध्ये आकाशच्या या फोटोंवर अनेक चाहते फिदा झाल्याचे दिसून येत आहे. सैराटनंतर आकाशने ओटीटीवर काम केले आहे. नुकताच त्याचा देशभक्तीपर चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. आकाशचे फॅन फॉलोईंग खूपच जास्त आहे. त्यामुळे त्याचे हो फोटो खूपच व्हायरल होत असून आकाशला बॉलीवूडमध्येदेखील जाण्याचे अनेक सल्ले कमेंट्समधून मिळत आहेत. इतकंच नाही तर बॉलीवूडचे हिरोही तुझ्यासमोर कमी ठरतील अशा स्वरूपाच्या कमेंट्सही आकाशला या फोटोंमुळे मिळत आहेत. दरम्यान आकाशचा नवा कोणता प्रोजेक्ट येत आहे यासाठी त्याचे चाहते आता जाणून घेण्यास उत्सुक आहेत. 

अधिक वाचा – अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे झळकले ‘तू गणराया’ या गाण्यात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक