Advertisement

मनोरंजन

अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे झळकले ‘तू गणराया’ या गाण्यात

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 14, 2021
tu ganaraya song

Advertisement

गणेशभक्तांच्या भेटीसाठी एकामागोमाग एक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक असलेली ही गाणी प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करून सोडत आहेत. ‘तू गणराया’ गाण्याचा प्रेक्षकांनी घेतला मनमुराद आनंद. अशाच एका ‘तू गणराया’ या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकविला आहे. या गाण्याची विशेष बाब म्हणजे ‘स्वप्न स्वरुप प्रॉडक्शन’ निर्मित आणि सचिन आंबात दिग्दर्शित श्री गणेशाच्या आगमनानिमित्त नवचैतन्य देणार्‍या ‘ तू गणराया’ (Tu Ganaraya) या गाण्याचे पोस्टर विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. विनोद तावडे यांनीदेखील गाण्याला भरभरून शुभेच्छा दिल्या असून दमदार कलाकारांना घेऊन चित्रित केलेल्या या गाण्याचे कौतुकच केले आहे. 

अधिक वाचा – मराठी अभिनेत्रींचा खास गणपती फेस्टिव्ह लुक, तुम्हीही करा अशी स्टाईल

नवविवाहित जोडप्याचा गणरायच्या आगमनाचा अनुभव चित्रीत

‘तू गणराया’ या गाण्यामधे एका नव विवाहित जोडप्याने गणरायाच्या आगमनाची तयारी कशी केली, शिवाय अतूट नाते जपत, बायकोला प्रोत्साहन देत आणि स्वतः पुढाकार घेऊन एका नवीन परंपरेचा श्री गणेशा (Shree Ganesha) या गाण्यातून सादर केला आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरिद (Siddharth Khirid) आणि अभिनेत्री पायल कबरे (Payal Kabare) यांनी या गाण्यात अभिनय आणि नृत्याच्या जोरावर गाण्याची शोभा वाढविली. ही जोडी नवी असली तरीही गाण्यामध्ये या जोडीने धमाल केलेली दिसून येत आहे. तर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांनाही आपली दखल घ्यायला या जोडीने भाग पाडले आहे. नवे चेहरे असले तरीही अगदी आपल्या घरातीलच एक वाटावे असा उत्सव या दोघांनी या गाण्यात साजरा केल्याचे दिसून येते आहे. तर दिग्दर्शक सचिन आंबात (Sachin Ambat) दिग्दर्शित असलेल्या या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. गायिका स्नेहा महाडीक आणि गायक रोहित ननवरे यांनी आपल्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवण्यास दिली. इतकेच नव्हे तर रोहित ननवरे यांनी या गाण्याला संगीतबद्धदेखील केले आहे. गणेशोत्सवाच्या या दिवसात या गाण्याने गणपती उत्सवाला अधिक उत्साह आणला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या गाण्याचा ठेका नक्कीच सर्वांना आवडणारा आहे. 

अधिक वाचा – रिया चक्रवर्तीने शेअर केली ग्लॅमरस पोस्ट, सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच पोस्ट

सोशल मीडियावर व्हायरल

‘स्वप्न स्वरूप प्रॉडक्शन’ निर्मित या गाण्याची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ‘स्वप्न स्वरूप’ युट्युब चॅनेलवर याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत असून तब्बल १ लाखाहून अधिक व्यूजचा टप्पा पार करत गणेशभक्तांनी गणेशाच्या स्वागतासाठी ‘तू गणराया’ या गाण्यात तल्लीन होऊन मनोभावे स्वागत केले आहे. नवसंदेश देणाऱ्या या गाण्याचे सादरीकरण पाहून सध्या या गाण्याचे सर्वच स्तरावर कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे. तसंच गणपतीच्या गाण्यांमध्ये अजून एका चांगल्या गाण्याची भर पडली असे म्हणावे लागेल. सध्या सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाले असून लवकरच याचे अधिक व्ह्यूज होतील अशी आशा आता सर्वच कलाकार आणि दिग्दर्शकांनाही आहे. तसंच हे गणराया असे म्हणून प्रेक्षकांच्या काळजालाही या गाण्याने हात घातला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

अधिक वाचा – परिणीती चोप्रा ने शेअर केलं तिचं शूज कलेक्शन, अशी होते पाच मिनीटात तयार

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक