Advertisement

DIY फॅशन

मराठी अभिनेत्रींचा खास गणपती फेस्टिव्ह लुक, तुम्हीही करा अशी स्टाईल

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 14, 2021
festive looks

Advertisement

कोणताही सण म्हटला की, सामान्य महिला असो वा अभिनेत्री खास ‘फेस्टिव्ह लुक’ (Festive Look) तर हवाच. सध्या सगळीकडे वातावरण खूपच आनंददायी आहे. गणपतीच्या आगमनाने सर्वांकडेच येणे जाणे होत आहे आणि सगळीकडे आनंद पसरला आहे. या सणासाठी आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीही मागे राहिलेल्या नाहीत. तर त्यांनीही यावर्षी आपला खास फेस्टिव्हल लुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तुम्हीही यावर्षी जर आपल्या बाप्पासाठी तयार होत असाल तर असा लुक कॅरी करू शकता. सुंदर, सोबर आणि तरीही अत्यंत आकर्षक असे लुक पाहूया. 

प्रिया बापट

Instagram

प्रिया अनेकदा साडी नेसून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. गणपतीसाठी प्रिया बापटने (Priya Bapat) केशरी आणि सोनेरी रंगाच्या साडीची शेड निवडली आहे. बनारसी साडी प्रियाने यावेळी नेसली आहे. उगीच भरमसाठ दागिने न घालता अगदी साधे आणि सोबर असा लुक तिने केला आहे. मेकअपही अति न करता अगदी साडीला नेमका साजेसा असा मेकअप करून आपल्या सौंदर्यात प्रियाने यावेळी भर घातली आहे. बाप्पाच्या आगमनाने आलेले चेहऱ्यावर आलेले हसूच सर्व काही सांगून जात आहे. 

अमृता खानविलकर

Instagram

#festivemood असा हॅशटॅग शेअर करत अमृताने (Amruta Khanvilkar) आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अमृतादेखील सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. कोणताही सण असो अमृताचे फोटो नाहीत असं कधीच होत नाही. यावेळी बाप्पाच्या सणाला अमृताने पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीची निवड केली आहे. यावर झुमके आणि केसात गजरा माळून तिने आपला हा लुक पूर्ण केला आहे. तर लाल रंगाच्या नॉट ब्लाऊजमुळे तिच्या या साडीची शोभा अधिक वाढली आहे. सुंदर दिसण्यासाठी भरमसाठ दागिने आणि मेकअप करण्याची गरज नाही हेच अमृताच्या लुकवरूनही दिसून येत आहे. मिनिमल मेकअप अधिक सौंदर्य वाढवतो.

श्रेया बुगडे

Instagram

वर्षभर आपण बाप्पाच्या आगमनाची किती आतुरतेने वाट पाहतोय अशी पोस्ट करत श्रेयानेदेखील (Shreya Bugde) बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. गडद पिवळ्या रंगाची काठापदराची साडी श्रेयाचे सौंदर्य यामध्ये अधिक खुलवत आहे. सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही देखाव्याची गरज भासत नाही हेच या अभिनेत्रीने आपल्या स्टाईलमध्ये दाखवून दिले आहे. अगदी साधा मेकअप, मंगळसूत्र आणि ठुशी, कानातले असा श्रेयाचा यावेळचा गणपतीबाप्पासाठीचा लुक आहे. तिच्या चाहत्यांनाही तिचा हा लुक खूपच आवडला आहे. 

सोनाली कुलकर्णी 

Instagram

सोनालीने (Sonalee Kulkarni) याच वर्षी लग्न करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तर आता तिचा लग्नानंतरचा हा पहिला गणपती आहे. घरच्या घरी तिचा भाऊ बाप्पाची मूर्ती तयार करतो. तिच्यासाठी गणपतीचा सण हा खासच आहे. यावेळी सोनालीने गणपतीसाठी खास बनारसी साडीची निवड केली. या साडीवर ऑक्सिडाईज्ड दागिने परिधान करून तिने आपल्या सौंदर्यात अधिक भर घातली असल्याचे दिसून आले आहे. तर तिने अगदी माफक मेकअप केला असून चेहऱ्यावरील हास्यानेच चाहत्यांना घायाळ केले आहे. 

मोनालिसा बागल

Instagram

ज्यांना साडी सावरणे कठीण जाते किंवा साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी पंजाबी सूट हा नेहमीच उत्तम पर्याय ठरला आहे. अशा व्यक्तींसाठी मोनालिसाचा (Monalisa Bagal) हा लुक नक्कीच प्रभावी आहे. सणासुदीला अगदी साधेपणा आणि तितकाच आकर्षक लुक करण्यासाठी पंजाबी ड्रेसचा वापरही तुम्ही करू शकता. मोनालिसाने तिच्या बाप्पासाठी खास फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये अगदी माफक मेकअप आणि चेहऱ्यावरील गोडवा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक