तुमच्या मुलांचा वाढदिवस जवळ आलाय पण कोरोनामुळे तो कसा साजरा करायचा याची चिंता तुम्हाला वाटतेय का? कारण आपला वाढदिवस झाला नाही तरी चालेल पण लहानग्यांना फक्त हॅपी बर्थडे विश करून चालत नाही ना. असं असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण याकाळातही तुम्ही तुमच्या छोटुकल्यांचा वाढदिवस अगदी मजेच सेलिब्रेट करू शकता. यासाठीच आम्ही यासाठी तुमच्यासोबत अशा काही सोप्या टिप्स शेअर करत आहोत. ज्या फॉलो करून तुम्ही यंदाही तुमच्या मुलांचा वाढदिवस नेहमीच्याच उत्साहात साजरा कराल. यासाठी ही माहिती अवश्य वाचा आणि आम्ही दिलेल्या टिप्स फॉलो करा.
पार्टीची थीम ठरवा –
कोरोनामुळे तुम्ही जरी जास्त लोकांच्या उपस्थितीत आणि मुलांच्या मित्रमंडळींच्या कल्लोळात त्यांचा वाढदिवस साजरा नाही करू शकलात तरी आनंद साजरा करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या मुलांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या सुरक्षेसाठी व्हर्च्युअल बर्थडे पार्टी आयोजित करू शकता. पार्टी कशीही द्या पण त्याची थीम बेस्ट असायला हवी. यासाठी तुमच्या घरातील सर्व मंडळींचं मत आणि मदत घ्या. तुम्ही यावर्षी तुमच्या मुलांसाठी स्पेस थीम, अंडरवॉटर थीम, प्रिंसेस थीम अथवा बीच थीम ठरवू शकता. फक्त घरातील काही मंडळी यासाठी आमंत्रित करा आणि बाकीच्यांना ऑनलाईन जॉईंट व्हायला सांगा.
थीमनुसार करा वाढदिवसाची सजावट –
एकदा तुमच्या मुलांच्या वाढदिवसाची थीम ठरली की पुढचं सगळं नियोजन सोपं होईल. त्या थीमनुसार सजावट करण्याच्या कामाला लागा. घरच्या घरी दिवाळीच्या सजावटीचं सामान वापरून तुम्ही तुमच्या मुलांची पार्टीसाठी सुंदर सजावट करू शकता. मुलांना सजावट, पार्टी या गोष्टी खूप आवडतात. जेव्हा आपले पालक स्वतः या गोष्टी आपल्यासाठी करत आहेत हे ते पाहतील तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल अधिक प्रेम वाटू लागेल.
पार्टीसाठी ड्रेस कोड ठरवा –
मग काय झालं की, तुमच्या मुलांच्या पार्टीसाठी तुम्हाला जास्त लोकांना आमंत्रित करता येणार नाही. याचा अर्थ तुम्ही वाढदिवस साजरा करू शकत नाही असं मुळीच नाही. कारण तुम्ही घरी असलेली आणि मोजकी आमंत्रित मंडळी यांच्यासाठी थीमनुसार ड्रेस कोड ठरवू शकता. लहान मुलांच्या वाढदिवसाचे ड्रेस कोड हे आकर्षक रंगाचे, गडद आणि चमकदार असावेत. ज्यामुळे त्यांना काहीतरी नवीन आणि जबरदस्त थीम आहे असं वाटतं.
वाढदिवसाचा केक –
वाढदिवस म्हणजे सर्वात महत्त्वाचा असतो बर्थ डे केक… यावर्षी मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्वतः बर्थडेचा केक तयार करा. असंही लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरच्या घरी केक कसा तयार करायचा हे शिकला असालच. नसेल तर युट्युबवर केक बनवण्याचे अनेक ट्युटोरिअल्स असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने मुलांना हवा तसा बार्बी, पोकीमोन, अॅंग्री बर्ड, मिकीमाऊस असे त्यांच्या आवडीचे केक तयार कराल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद नक्कीच बघण्यासारखा असेल.
पार्टीसाठी मस्त स्नॅक्स ठेवा –
मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवणे हा आई-बाबांसाठी एक मस्त टास्क असतो. कारण त्यांना हवे असलेले पदार्थ पोषक नसतात. मात्र जर असे पदार्थ घरी तयार केले तर तुम्हाला त्यात काहीतरी पोषक ट्विस्ट नक्कीच देता येतो. जसं की पोळी-भाजीची फ्रॅंकी, गव्हाची पाणीपुरी, मिक्स फ्रुट ज्युस, बटाटेवडे, चांगल्या भाज्या टाकुन केलेला पिझ्झा अशा गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांच्या बर्थडे साठी नक्कीच करू शकता. शिवाय एखाद्या दिवशी मुलांना पौष्टिक नसलेले पण त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालायला काहीच हरकत नाही.
मोजक्या लोकांना आमंत्रित करा –
मुलांची पार्टी बच्चेकंपनीशिवाय पुर्णच होणार नाही. म्हणून पार्टीला मजा आणण्यासाठी शेजारी राहणाऱ्या अथवा अगदी जवळच्या त्यांच्या मित्रमंडळींना नक्की आमंत्रित करा. मात्र हे छोट्या गेस्ट सुरक्षितपणे ही पार्टी एन्जॉय करू शकतील याची नीट खबरदारी घ्या. ज्यामुळे त्यांचे आईवडील त्यांना या पार्टीसाठी बिनधास्तपणे पाठवू शकतील.
भरपूर फोटो आणि मजेशीर अॅक्टिव्हिटीज –
मुलांना सतत व्यस्त ठेवायचं असेल तर पार्टीसाठी तुम्हाला काही चांगल्या अॅक्टिव्हिटीज ठरवाव्या लागतील. त्यामुळे तुमच्या मुलांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या आवडीनिवडी नुसार खेळ ठरवा. शिवाय तुमच्या मुलांचे खूप फोटो काढा ज्यामुळे त्यांना यावर्षी आपण वाढदिवस उत्साहात साजरा करत आहोत असं सतत वाटत राहील.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
बोअरींग पार्टीला आणा पार्टी गेम्सनी रंगत (Fun Party Game Ideas In Marathi)
स्पेशल पार्टीसाठी मेन्यू ठरवत आहात, मग हे वाचाच (Party Menu Ideas In Marathi)