बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच त्याच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. अनुष्का गरोदर असून ती जानेवारीत बाळंत होणार अशी बातमी ऑगस्ट महिन्यात विराटने सोशल मीडियावरून दिली होती. त्यामुळे चाहते विराट आणि अनुष्काच्या बाळाची आतूरतेने वाट पाहत आहेत. जानेवारीत अनुष्का शर्मा बाळंत होणार म्हणजे तिच्या गरोदरपणाचा काळ भरत आला आहे ती सध्या आठव्या – नवव्या महिन्यांची गरोदर आहे. या काळातही अनुष्काने एका मॅगझिनसाठी खास फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती गरोदरपणातही बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे. एवढंच नाही तर तिच्या या फोटोशूटवर विराटने एक छान कंमेटदेखील केली आहे.
अनुष्काचं नवं फोटोशूट
गरोदरपणाची बातमी जाहीर केल्यापासून अनुष्का तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत होती. तिचे गरोदरपणातील फोटो इतके स्टायलिश आणि क्युट होते की नव्याने आई होणाऱ्या सर्वच महिलांसाठी तिची फॅशन प्रेरणादायी ठरली होती. ज्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी गरोदर महिला तिची स्टाइल फॉलो करत होत्या. आता गरोदरपणाच्या आठव्या नवव्या महिन्यातही सुंदर दिसता येतं हे तिच्या या नव्या फोटोशूटमधून दिसून येत आहे. व्होग मासिकाच्या मुखपृष्ठासाठी केलेलं हे फोटोशूट अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ज्यामध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर प्रेगनन्सी ग्लो झळकत आहे. अनुष्काने या फोटोंसोबत एक कॅप्शन शेअर केली आहे ज्यात तिने लिहीलं आहे की, ” माझ्यासाठी आणि पूर्ण जीवनभरासाठी हे कॅप्चर केलं,हा अनुभव खूप मजेदार होता. ” अनुष्काचे हे सुंदर आणि बोल्ड लुकमधील फोटो पाहून तिचा पती आणि भारतीय क्रिकेट टिमचा कर्णधार विराट कोहलीने एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. विराटने अनुष्काचं कौतुक करत शेअर केलं आहे की “खुपच सुंदर”
अनुष्का आणि विराटच्या फोटोजचे चाहते –
अनुष्काचं हे फोटोशूट व्होग मासिकाच्या जानेवारी महिन्यातील एडिशनसाठी करण्यात आलं आहे. अनुष्का नव्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात बाळंत होणार असल्यामुळे या मासिकाने हे फोटोशूट अशा पद्धतीने प्लॅन केलं आहे. अनुष्का आणि विराटच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या बाळाची सर्वच चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे. जानेवारी महिना कधी येणार आणि या दोघांची गोड बातमी कधी ऐकायला मिळार अशी अवस्था सर्व चाहत्यांची आहे. विराटने ऑगस्ट महिन्यामध्ये ते दोघं आईबाबा होणार हे जाहीर केलं होतं. तेव्हा विराटने शेअर केलेला अनुष्का आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एवढंच नाही तर हा फोटो 2020 वर्षात सोशल मीडियावर सर्वाधिक लाईक्स मिळणारा फोटोदेखील ठरला आहे. त्यामुळे आता बाळाच्या आगमनानंतर टाकलेल्या फोटोला किती लाईक्स मिळतात हे पाहावं लागेल.
अनुष्का शर्मा ही एक फिटनेस प्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे ती गरोदरपणातही फिटनेस आणि सौंदर्याकडे व्यवस्थित लक्ष देते. काही दिवसांपूर्वीच व्यायामाची आवड असलेल्या अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर शीर्षासन करताना एक फोटो शेअर केला होता. हे शीर्षासन करण्यासाठी तिला विराटने खास मदतही केली होती.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
एकेकाळी बॉलीवूडमध्ये खूप चर्चा झाली होती या लव्ह ट्रॅंगल्सची
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री
बॉलीवूडचे सुपरहिट चित्रपट जे पाहिल्यावर वाटतं लग्न असावं तर असं