‘दी कपिल शर्मा शो’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात. कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रेक्षक आणि पाहुण्या कलाकारांचं नेहमीच मनोरंजन करत असते. त्यामुळे या शोमधील प्रत्येक कलाकार आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या पाहुण्या कलकारांची सोशल मीडियावर चर्चा असते. बऱ्याचदा या शोमधून कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास किस्से ऐकायला आणि पाहायला मिळतात. सध्या या शोमध्ये जजची भूमिका अर्चना पूरनसिंह साकारात आहे. नुकतंच या शोमध्ये मल्लिका शेरावत, तूषार कपूर आणि एकता कपूर सहभागी झाले होते. हे कलाकार त्यांच्या आगामी वेबसिरिजच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. मात्र या दरम्यान कपिलने अर्चना बाबत अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे प्रेक्षकांना हसू आवरता आलं नाही.
कपिलने शोमध्ये केला हा खुलासा
कपिल शर्माच्या शोमध्ये यावेळी मल्लिका शेरावत, तूषार कपूर आणि एकता कपूर सहभागी झाली होते. कपिल मल्लिकाचे स्वागत करता करता अचानक असं म्हणाला की, “मल्लिकाला आज या शोमध्ये पाहून नवजोत सिंह सिद्धूंना नक्कीच वाईट वाटत असेल.. राजकारणात गेल्याबद्दल आणि या शोमध्ये आज नसल्याबद्दल ते नक्कीच खंत करत असतील.” असं तो मजेत म्हणाला. यापुढे कपिलने अर्चना पूरन सिंहवर आपला रोख वळवला. पुढे कपिल मजेत असं म्हणू लागला की, “अर्चना पूरन सिंह भूतादेखील जितकी घाबरत नाही तितक्या एका व्यक्तीला घाबरतात. अर्चना देवाजवळ प्रार्थना करतात की ही व्यक्ती पुन्हा शोमध्ये येऊ नये.” कपिलने असंं म्हटल्यावर प्रेक्षकांना हसू आवरता आलं नाही. अर्थातच कपिलने हे वक्तव्य नवज्योत सिंह सिद्धू यांच्याबद्दल केलं होतं. कारण दी कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिंह सिद्धूच्या जागी आता अर्चना पूरनसिंह जज आहे. सहाजिकच अर्चनाला या शोमध्ये स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी असं वाटत असणार असं कपिलला यातून सांगायचं होतं. कपिलचा शो हा हिंदी टेलीव्हिजन माध्यमातील एक लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोला दिवसेंदिवस अधिकच प्रसिद्धी मिळत आहे. टीआरपीमध्ये अव्वल राहण्यासाठी आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी कपिल आणि त्याच्या टीमला सतत असे विनोद करून प्रेक्षकांना खिळवून ठेवावं लागतं. त्यामधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नसतो. यासाठी शोमध्ये बऱ्याचदा कपिलला या शोमधील कलाकार, प्रेक्षक अथवा पाहुण्या कलाकारांवर विनोद निर्माण करावे लागतात.
कपिल शर्माच्या शोमध्ये मल्लिका शेरावत
कपिल शर्माच्या शोमध्ये नेहमीच निरनिराळे कलाकार आपल्या चित्रपटाच प्रमोशन करण्यासाठी येत असतात. नुकतीच या शोमध्ये मल्लिका शेरावत आली होती. बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या तिच्या आगामी वेबसिरिज ‘बू’चं प्रमोशन करत आहे. यामध्ये मल्लिका आणि तूषार कपूर एकत्र काम करणार आहेत. या वेबसिरिजच्या प्रमोशनसाठी मल्लिका शेरावत तूषार कपूर आणि शोची निर्माती एकता कपूरसोबत कपिलच्या शोमध्ये सहभागी झाली होती. या शो दरम्यान मल्लिका च्या हॉटनेसबाबत भरपूर चर्चा करण्यात आली. तिच्या फोटोवर लोक पोळी गरम करतात ते एका निर्मात्याला तिच्या पोटावर अंडं फ्राय करायचं होतं इथपर्यंत किस्से सांगण्यात आले. ज्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झालं.
अधिक वाचा
Good news: कपिल शर्मा लवकरच बनणार ‘बाबा’
जेव्हा एकता कपूरने तुषारच्या ‘या’ गोष्टीवर रागावून केला होता पोलिसांना फोन
संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम