प्रत्येक मुलीकडे एकतरी हिल्सच्या चपलांचा प्रकार असतोच. एथनिक आणि वेस्टर्न वेअरवर हिल्सचे काही प्रकार फारच शोभून दिसतात. त्यामुळे तुमच्या लुकमध्ये एक वेगळाच ग्रेस येतो आणि तुमचे चालणे अधिक आकर्षक आणि चांगले दिसू लागते. हिल्सचा उपयोग हा तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवणे असा असला तरी देखील काहींना हिल्स घातल्यानंतर काहीही केल्या चालता येत नाही. अशा लोकांनी हिल्स घातल्यानंतर त्यांनी पायात काहीतरी वेगळे घातले आहे असा भास कायम होत राहतो. तुम्ही यापैकी एक असाल तर तुम्ही निवडत असलेला हिल्सचा प्रकार हा चुकीचा आहे. हिल्स निवडताना तुम्ही काय काळजी घ्यायला हवी ते आता आपण जाणून घेऊया.
वेदनादायी शू बाईटवर ’15’ घरगुती उपाय आणि इतर टीप्स (How To Prevent Shoe Bites In Marathi)
हिल्सचे वेगवेगळे प्रकार
हिल्समध्ये असंख्य प्रकार मिळतात. स्टिलेटोस, वेजेड, बॉक्स हिल्स, किटन हिल्स, पेन्सिल हिल्स, प्लॅटफॉर्म हिल्स हे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या कपड्यांवर घातले जातात. तुम्ही कोणते कपडे घालणार त्यानुसार तुम्ही चपलांची निवड करणे गरजेचे असते.
उदा. तुम्ही स्टिलेटोस चुडीदारवर घालू शकत नाही. कारण त्यामुळे तुम्ही उगीगच तुम्ही हिल्स घातल्यासारखे दिसून येईल. या अशा कपड्यांवर चुकीचे हिल्स घातल्यामुळे तुमची चालही बदलू शकते.
सुंदर टाचा हव्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी ‘हा’ उपाय जरूर करा
हिल्स निवडताना
- काही जणांना रोज फ्लॅट चपला घालण्याची सवय असते. अशी लोक ज्यावेळी हिल्स घेण्याचा विचार करतात त्यावेळी त्यांना हिल्सचा कोणताही प्रकार घातल्यानंतर काहीतरी वेगळेच वाटते. अशांनी लगेचच मोठे हिल्सचे प्रकार निवडू नयेत. किटन हिल्सच्या प्रकारापासून याची सुरुवात करावी म्हणजे तुम्हाला फारसा फरक जाणवणार नाही.
- सतत धडपडणे हा तुमचा स्थायीभाव असेल तर मग तुम्ही हिल्स निवडताना फारच काळजी घ्यायला हवी. कारण अशा लोकांना पायात थोडा वेगळा प्रकार घातला की, काहीतरी वेगळे घातल्यासारखे वाटते आणि त्यांच्या वागणुकीत ते सतत दिसत राहते. तुम्हाला हिल्स निवडायचे असतील तर तुम्ही ते बंद म्हणजे शूज किंवा मागे पट्टे असलेल्या सॅंडल प्रकारातले निवडा. कारण त्यामुळे तुमच्या पायांना चांगली ग्रीप मिळते. शिवाय तुमची पडण्याची भीती कमी होते.
- काही जणांच्या पायांचा आकार मोठा असतो. उंची कितीही असली पण पाय मोठे असतील आणि तुम्ही थोड्या वेगळ्याच हिल्सचा प्रकार पायात घातला की, मग पाय उगीचच जास्त मोठे वाटू लागतात. अशांना जर पाय नाजूक आणि चांगले वाटू द्यायचे असतील तर अशांनी नाजूक पट्ट्यांच्या वेजेस किंवा पॉईंटेट हिल्स वापरण्यास काहीच हरकत नाही.
- वेजेसमध्ये हल्ली कित्येक प्रकार मिळतात. हा प्रकार तुम्हाला ट्रेडिशनलवेअर अर्थात चुडीदार, अनारकली, स्ट्रेट फिट पँट्स अशा घोळदार कपड्यांमध्ये घालता येतो. घोळदार कपडे घातल्यानंतर अनेकदा पायांकडे पाहण्याचा किंवा खाली बघून चालण्याचा कंटाळा येतो. हिल्स बारीक असतील तर त्यामध्ये धडपडण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी तुम्ही वेजेस निवडा. तुमचे पायही दुखणार नाहीत आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ यामध्ये राहता येईल.
- हल्ली प्लॅटफॉर्म हिल्सच्या शूजची स्टाईल फारच फॅशन इन आहे. कॅज्युअल ड्रेस, कॅपरीज आणि काही ड्रेसेसवर अशा प्रकारचे शूज चांगले दिसतात. पण एखाद्या लांब स्कर्टवर हा ड्रेस घालताना असे शूज घालू नका.कारण यामुळे तुमचे पाय फारच मोठे दिसतील.
कोणत्याही प्रकारचे हिल्स घालताना तो प्रकार तुमच्या पायांपेक्षा थोडासा मोठा घ्या. तोकड्या चपला तुमचे पाय अधिक दुखवू शकतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टी काळजी घेत हिल्सचा प्रकार निवडा तुम्ही अजिबात धडपडणार नाही.
तुमच्या पायांची अशी घ्याल काळजी तर कधीच होणार नाही त्रास How To Take Care Of Your Feet