घरात मुली जन्माला आल्या की,जणू लक्ष्मी जन्माला आल्याचा आनंद प्रत्येक घरात होतो. अशा गोड परीचे नाव युनिक असावे असे प्रत्येकाला वाटते. लहान बाळाची पत्रिका काढल्यानंतर त्यात जर बाळाचे आद्याक्षर ‘ब’ आले असेल तर अशा व्यक्तीची रास कर्क असते. ‘ब’ आद्याक्षर आलेल्या व्यक्तीच्या राशीवर चंद्राचा प्रभाव असतो. या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे अशा व्यक्ती या दिसायला सुंदर आणि आकर्षित करणाऱ्या असतात. त्यामुळे तुमच्या मुली या नक्कीच सुंदर आणि आकर्षक असणार यात काही शंका नाही.आता तुमच्या मुलीचे नाव ‘ब’ आद्याक्षरावरुन ठेवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही नावे शोधून काढली आहेत. ब वरुन मुलींची नावे (B Varun Mulinchi Nave In Marathi) ठेवा. या शिवाय श वरुन मुलींची नावे, फ वरुन मुलांची नावे, च आणि छ वरुन मुलांची नावे, जुळ्या मुलींची नावे अशीही काही नावे ठेवू शकता.
ब वरुन मुलींची लेटेस्ट नावे (Latest B Varun Mulinchi Nave)
‘ब’ हे आद्याक्षर आल्यानंतर मुलींची लेटेस्ट नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी ब वरुन काही लेटेस्ट नावे शोधून काढली आहेत ती देखील जाणून घेऊया. यापैकी आवडलेलं नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी ठेवू शकता. थ वरुन मुलांची नावे ठेवायची असतील तर ती देखील ठेवा
मुलींची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
बेला | सुंदर फुल, बेलफळ, सुंदर | हिंदू |
बहुगंधा | चाफेकळी, सुंदर, सुंगधित | हिंदू |
बासरी | श्रीकृष्णाचे आवडते वाद्य, गोड , मधूर | हिंदू |
बिंदी | टिकली | हिंदू |
बानी | पृथ्वी, सरस्वती देवी | हिंदू |
बिपाशा | नदी, वाहते पाणी | हिंदू |
बिशाखा | एक तारा | हिंदू |
बिंबा | कुंकू, चंद्रकला | हिंदू |
बर्फी | एक गोडाचा प्रकार | हिंदू |
बागेश्री | संगीतातील रागाचा एक प्रकार | हिंदू |
बिजली | वीज, चमचमणारी | हिंदू |
बिंबी | चमकदार, चमचमणारी | हिंदू |
बरखा | पाऊस, विजांसह पडणारा पाऊस | हिंदू, मुस्लिम |
बिजल | वीज, लाईटनिंग | हिंदू |
बान्ही | आग, अग्नी | हिंदू |
ब वरुन मुलींची युनिक नावे (Unique B Varun Mulinchi Nave)
युनिक नाव ठेवायला अनेकांना आवडते. मुलींची अशी युनिक नावे देखील आम्ही शोधून काढली आहेत.ही नावे हिंदू-मुस्लिम अशी मिश्र आहेत. त्यामुळे तु्म्ही ब वरुन मुलींची युनिक नावे ठेवू शकता. याशिवाय ‘स’ वरुन मुलींची नावे शोधत असाल तर तुम्ही ही नावे देखील ठेवू शकता.
मुलींची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
बविष्या | भविष्यकाळ | हिंदू |
बहुला | गायीचे नाव | हिंदू |
बारुणी | माता दुर्गेचे नाव | हिंदू |
भद्रा | चांगले, चांगली | हिंदू |
बिन्नी | सफेद, रुप | हिंदू |
ब्रायन | मजबूत | ख्रिश्चन |
बरवा | संगीतातील एक राग | हिंदू |
बिल्बा | बेलाचे झाड | हिंदू |
बीनल | वीणा,एक वीणा | हिंदू |
बिजुला | वीज | हिंदू |
बिजुल | अशोक वृक्ष | हिंदू |
बन्सी | बासुरी | हिंदू |
बिनीता | एकदम चपखल | हिंदू |
ब्रिती | ताकद | हिंदू |
बेलीका | बेलाचे फळ | हिंदू |
ब वरुन मुलींची पौराणिक नावे (Tradiational B Varun Mulinchi Nave)
ब वरुन काही जुनी म्हणजे पौराणिक अशी नावे देखील आहेत. जी आताच्या काळात नक्कीच थोडी वेगळी आणि युनिक वाटू शकतील. पुराणातील ही नावे नेहमीच चांगली वाटतात. जाणून घेऊया ब वरुन मुलींची पौराणिक नावे
मुलींची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
बहुगंधा | विविध सुंगध असलेली | हिंदू |
ब्रिजबाला | निसर्गाची देवता | हिंदू |
ब्रिंदा | लहान मुलगी, चिमुकली | हिंदू |
बकुळ | एक सुगंधित फुल | हिंदू |
बुलबुल | एक पक्षी | हिंदू |
बसाबी | देव इंद्राची बायको | हिंदू |
बबिता | लहान मुलगी | हिंदू |
बिमला | शुद्ध | हिंदू |
बोधी | मनोरंजन | हिंदू |
ब्रिंदा | राधा, राधेचे एक नाव | हिंदू |
ब्राम्हणी | देव ब्रम्हाची बायको | हिंदू |
बिजाली | प्रकाशित, वीज, लाईटनिंग | हिंदू |
बनमाला | फुलांचा गुच्छा | हिंदू |
बंधुरा | सुंदर, आकर्षक | हिंदू |
बीना | वीणाचा अपभ्रंश,एक वाद्य | हिंदू |
आता तुम्हाला आवडलेली नावे तुम्ही अगदी नक्कीच तुमच्या मुलींसाठी ठेवू शकता.