ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
weight-loss

वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी आहे उत्तम, बाजरी की मका

वजन कमी करणे (Weight Loss) हा सर्वात मोठा सध्याचा एक नियम झाल्यासारखे वाटत असेल. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या (Corona) काळात जिममध्ये जाणे अथवा नियमित व्यायाम करणे यामध्ये खूपच तफावत निर्माण झाली आहे. सतत लॉकडाऊन (Lockdown) मध्ये घरात बसून खाणे आणि एकाच जागी बसून काम करणे यामुळे अनेकांच्या वजनात वाढ होताना दिसून येत आहे. पण घरी बसून काम करतानाही तुम्ही तुमच्या वजनाची काळजी नक्कीच घेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायामच नाही तर तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि योग्य खाणे असायला हवे. जेवणामध्ये नक्की कोणकोणत्या हेल्दी पदार्थांचा वापर केल्यास, तुमचे वजन कमी होऊ शकते याची तुम्हाला माहिती असायला हवी. भाकरी हा आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. पण तांदळाची भाकरी, बाजरी, नाचणीची भाकरी असे अनेक भाकरीचे प्रकार आपण खात असतो. पण बरेचदा प्रश्न पडतो की, बाजरीची भाकरी की मक्याची भाकरी यापैकी कोणती भाकरी वजन कमी करण्यासाठी योग्य आहे? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. 

बाजरीचे गुण

Instagram

प्रोटीन, फायबर आणि आपल्या शरीराला आवश्यक अशी अनेक खनिजे ही बाजरीमध्ये समाविष्ट आहेत. तसंच बाजरी ही ग्लुटनफ्री असल्यामुळे सर्वांनाच लाभदायी ठरते. उच्च फायबर बाजरीमध्ये असल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी  याचा उपयोग होतो. तसंच बाजरीमध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे गॅस्ट्रिक समस्या आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांवर याचा फायदा मिळतो. बाजरी खाण्याचे फायदे आहेत.

यामध्ये अधिक कार्बोहायड्रेट असल्यामुळे बाजरी पचायला वेळ लागते आणि पोट हे अधिक काळ भरलेले राहते. अर्थात त्यामुळे सतत पोटात भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहिल्यामुळे सतत खाऊन वजन वाढण्याची शक्यता धुसर होते. बाजरीमध्ये असलेल्या फायटोकेमिकल्स आणि पॉलिफेनोल्स स्वरूपातील अँटीकार्सोनोजेनिक आणि अँटीट्यूमर असतात. त्यामुळे कॅन्सरला रोख लावण्यासाठीही बाजरीची मदत होते. 

मक्याचे गुण

Instagram

मक्याची भाकरी ही सहसा उत्तरेला अधिक प्रमाणात मिळते. पोळीपेक्षा मक्याची रोटी खाण्याला इथे प्राधान्य देण्यात येते. मक्यामध्ये लोह, फॉस्फोरस, जिंक आणि विविध विटामिन्स आहेत. अँटिऑक्सिडंट यामध्ये अधिक प्रमाणात असून मक्याची भाकरी ही डोळ्यासाठी अत्यंत चांगली असते. तसंच कॅन्सर आणि एनिमिया रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स हे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच मक्यामध्ये अधिक प्रमाणात प्रतिरोधी स्टार्च असतो. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

दोन्हीपैकी काय खावे

बाजरी की मक्याची कोणती भाकरी खावी असा नेहमी प्रश्न पडतो. पण तुम्हाला याबाबत महत्त्वपूर्ण माहिती घ्यायला हवी. ज्यांना वजन लवकरात लवकर कमी करायचे आहे त्यांनी बाजरीचे पीठ नेहमी आपल्या घरी ठेवावे. बाजरीच्या भाकरीचा यासाठी अधिक उपयोग होतो. थंडीच्या दिवसात मक्याची भाकरी ठीक आहे. मात्र सर्वांनाच मक्याची भाकरी नियमित आवडते असं नाही. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीची निवड करावी. बाजरीच्या भाकरीमुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही बाजरीच्या भाकरीचा  अधिक उपयोग करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT