Advertisement

Recipes

नक्की ट्राय करा या सोप्या बेकिंग रेसिपीज (Oven Recipes In Marathi)

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jul 27, 2020
Oven Recipes In Marathi

Advertisement

घरी मायक्रोव्हव असावा असे प्रत्येकीला वाटते. खूप प्रयत्न करुन आणि अनेक चौकशी करुन आपण घरी योग्य असा मायक्रोव्हेव निवडतो. काही जण मायक्रोव्हेवचा वापर अगदी नियमित करतात. तर काहींसाठी मायक्रोव्हेव ही केवळ किचनमधील अडगळ असते. सुरुवातीचे काही दिवस मायक्रोव्हेव अगदी सगळ्या कामांसाठी वापरला जातो. मग हळुहळू उत्साह कमी झाला की, त्यामध्ये फक्त जेवण गरम करणे, पाणी गरम करणे इतकाच काय तो वापर उरतो. मग अगदीच ज्यावेळी मायक्रोव्हेव हा नकोसा होतो. अशावेळी तो फक्त एक स्टोरेज कपाट बनतो. तुम्ही नव्याने मायक्रोव्हेव आणला असेल किंवा तुम्हाला मायक्रोव्हेवचा पुन्हा वापर सुरु करायचा असेल तर तुम्ही मायक्रोव्हेवमध्ये काही झक्कास भारतीय पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या बेकिंग रेसिपीज सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला कोणता क्लास करायची आवश्यकता भासणार नाही. चला मग करुया सुरुवात

व्हेज रेसिपी (Veg Oven Recipes In Marathi)

सगळ्यात आधी आपण झटपट आणि छान बनवता येतील अशा काही व्हेज रेसिपी पाहुयात.

पौष्टिक आणि चविष्ट लाडूच्या मस्त रेसिपीज (Recipe Of Different Kind Of Ladoos)

पनीर टिक्का (Paneer Tikka)

पनीर टिक्का - Veg Oven Recipes In Marathi

Instagram

अगदी सोपी आणि पटकन होणारी मायक्रोव्हेवमधील ही रेसिपी अनेकांच्या आवडीची आहे. जे चिकन खात नाही. त्यांच्यासाठी प्रोटीनचा सोर्स म्हणजे पनीर असते. जर तुम्ही शेगडीवर पनीर टिक्का बनवत असाल तर तुम्ही एकदा ही रेसिपी मायक्रोव्हेवमध्ये करुन पाहा. 

साहित्य: (Ingredients): 200 ग्रॅम पनीर, एक मोठी ढोबळी मिरची, 1 मोठा कांदा, 3 मोठे चमचे दही (पाणी काढून टाकलेले हंग कर्ड), 2 चमचे लिंबाचा रस, 3 मोठे चमचे बेसन, लाल तिखट, जीरा पावडर, धणे पावडर, गरम मसाला पावडर, मीठ चवीनुसार, कसुरी मेथी, चाट मसाला, आलं- लसूण पेस्ट, तेल, वुडन स्कुअर 

कृती: (Procedure) : 

  • पनीर, कांदा, ढोबळी मिरची यांना चौकोनी आकारात कापून घ्या. 
  • एका भांड्यात बेसन, दही, लिंबाचा रस, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, कसुरी मेथी, चाट मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि दोन चमचे तेल घेऊन ते थोडेसे गरम करुन यामध्ये ओता. 
  • बेसनाची पेस्ट अगदी छान एकत्र करुन घ्या. बेसनच्या गुढळ्या मोडून घ्या. 
  • आता या मिश्रणात पनीर, कांदा आणि ढोबळी मिरची घालून एकत्र करा आणि मॅरिनेट करायला साधारण 30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून द्या. 
  • आता लाकडाचे स्क्युअर घेऊन ते पाण्यात काही पाण्यात भिजत ठेवा. 
  • एक बेकिंग ट्रे घेऊन त्यावर तेल किंवा बटर ब्रशने लावा. 
  • स्क्युअर पाण्यातून काढून घ्या. त्यामध्ये कांदा, पनीर, ढोबळी मिरची असा क्रम लावत जा. एका स्क्युअरमध्ये दोनच पनीरचे तुकडे घ्या.
  • सगळ्यात आधी मायक्रोव्हेव कन्व्हेक्शन मोडवर सेट करुन 180 डिग्रीवर 5 मिनिटांसाठी प्रीहिट करा. 
  • आता ओव्हन गरम आहे याची काळजी घेऊन तुम्ही पनीर टिक्काची प्लेट ठेवा. 
  • आता पुन्हा पनीर आत ठेवल्यानंतर मोड कन्व्हेक्शनवर ठेऊन साधारण 15  मिनिटांसाठी ठेवा. 
  • 8 मिनिटांनी काढून पनीरची बाजू उलट करुन उरलेल्या वेळी शिजवून घ्या 
  • आता तुम्हाला थोडा ग्रील लुक हवा असेल तर तुम्ही ग्रीलमोडवर ३ मिनिटांसाठी ठेवा. 

टिप : प्रत्येक मायक्रोव्हेहची सेटींग थोडी वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा थोडा वेळ लागेल. पण सवयीने तुम्हाला ही पद्धत सोपी वाटेल.

लादी पाव (Ladi Pav)

लादी पाव - Veg Baking Recipes In Marathi

Instagram

बाजारात मिळणारा नरम नरम लादी पाव खाल्ला की, आपण ही तो घरात बनवून पाहायला हवा असे आपल्याला वाटते. पण थोडीशी काळजी घेतली की, आपल्याला लादी पाव सहज बनवता येऊ शकतो. 

साहित्य: (Ingredients): 250 ग्रॅम मैदा, 3 चमचे तेल, दूध आणि बटर आवश्यकतेनुसार, 3 मोठे चमचे साखर, ½ कप गरम पाणी, ½ चमचा मीठ, 3 मोठे चमचे तेल, 1 ½ ड्राय यीस्ट 

कृती: (Procedure) :

  • एका भांड्यात साखर घेऊन त्यात गरम पाणी घालावे. साखर विरघळू द्यावी. 
  • पाण्यात बोट घालून पाणी खूप गरम असेल तर थोडे थांबावे कारण अशावेळी यीस्ट फुलत नाही. 
  • पाणी हाताला सहन होण्याइतके झाले की, त्यामध्ये यीस्ट घालावे. यीस्ट मिसळून साधारण 10 ते 15 मिनिटं फुलण्यासाठी ठेवावे.
  •  एका दुसऱ्या भांड्यात दोन कप मैदा, मीठ आणि अॅक्टीव्हेट यीस्ट घालावे. हलक्या हातान पीठ मळून घ्यावे. जास्त पाणी लागल्यास त्यामध्ये कोमट पाणी घालावे. 
  • पीठाचा गोळा झाल्यावर त्यामध्ये तेल घालावे आणि पीठ छान मऊ आणि हातातून सुटेपर्यंत मळून घ्यावे. 
  • मळलेल्या पीठाला आतल्या बाजूने टक करुन त्याचा गोळा करावा. भांड्याला पुन्हा एकदा थोडे तेल किंवा बटर लावून पीठ साधारण 1 ते1/5 तासासाठी ठेवून द्यावे. 
  • पीठ छान दुप्पट होईल. पीठ बाहेर काढून हलक्या हाताने एकजीव करावे. त्याचे दहा सारखे गोळे काढून पुन्हा टक मेथडचा उपयोग करुन एका ट्रेमध्ये मांडावे. ट्रे ला आधी तेल ब्रश करायला विसरु नका. 
  • पुन्हा एकदा गोळे फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्या. लादी पाव कसा एकमेकांना चिकटतो अगदी तसाच हा फुलल्यानंतर चिकटणार आहे. 
  • पाव फुगल्यानंतर ओव्हन कन्व्हेक्शन मोडवर 200 डिग्रीला प्रीहिट करुन घ्या. 
  • पावाला ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी दूधाने ब्रश करुन घ्या.
  • ओव्हनमध्ये ट्रे ठेऊन 20 ते 30 मिनिटांसाठी बेक करा. 
  • पाव गरम असतानाच त्यावर बटर लावा. बटर छान मुरु द्या. गरमा गरम पाव तयार आहेत. 

टिप : पाव लुसलुशीत होणे सर्वस्वी यीस्टवर अवलंबून आहे. जर यीस्ट चांगली फुलली नसेल तर तुम्ही त्याचा वापर करु नका. पुन्हा एकदा नव्याने यीस्ट भिजत घाला.

हर्ब लेमन राइस (Herb Lemon Rice Recipe In Marathi)

ओरिओचा 5 मिनिटात बनणारा केक (Oreo 5 Min Cake)

ओरिओचा केक - Veg  Oven Recipes In Marathi

Instagram

हल्ली लॉकडाऊनमध्ये तुम्ही अगदी हमखास ऐकलेली रेसिपी असेल ती म्हणजे ओरिओ केक, बनवण्यास अगदी सोपी अशी ही रेसिपी तुम्ही जेव्हा केक खाण्याची इच्छा होईल तेव्हा अगदी पटकन करु शकता. कारण यासाठी तुम्हाला फार साहित्याचीही आवश्यकता नाही.

साहित्य: (Ingredients): ओरिओ बिस्किटांचा एक मोठा पुडा (तुमच्या आवडीच्या फ्लेवरचा), दूध, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर,बेकिंग टिन, बटर

कृती: (Procedure) :  

  • मिक्सरमध्ये ओरिओ बिस्किट घेऊन त्याचा छान चुरा करुन घ्या.
  • तयार चुरा एका एका भांड्यात काढून त्यामध्ये हळुहळू दूध घालून केक बॅटर करुन घ्या. 
  • केसच्या बॅटरची कन्सिस्टंन्सी ही नेहमी ड्रॉपिंग असते. म्हणजे चमच्यातून ते सरसरीत पडायला हवे. पण ते फार पातळ नको. 
  • केक टिन घेऊन त्याला बटर किंवा मैद्याचे कोटिंग करा.
  • मिश्रणात ½ चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घाला. मिश्रण कट अॅण्ड फोल्ड मेथडने एकत्र करुन टिन थेट मायक्रोव्हेवमध्ये 5 मिनिटांसाठी ठेवा. 
  • 5 मिनिटांनी गरम गरम केक तयार 

टिप: कोणत्याही बिस्किटांचा केक बनवताना विशेषत: क्रिम बिस्किटांमध्ये साखर जास्त असते. त्यामुळे साखरेचा वापर थोडा जपून करा. कारण केक खूप गोड होण्याची शक्यता असते.

मग पिझ्झा (Mug Pizza)

मग पिझ्झा - Veg Baking Recipes In Marathi

Instagram

पिझ्झा खाण्याची इच्छा खूप वेळा होते. घरी पिझ्झा अगदी बेसपासून तयार करायचा म्हटले की, अनेकांना खूपच टेन्शन येते. पण तुम्हाला अगदी काहीच मिनिटात घरीच पिझ्झा करता आला तर आणि तोही कोणत्याही मोठमोठ्या भांड्यामध्ये नाही तर तोही कोणत्याही कपमध्ये चला पाहुया याची रेसिपी. 

साहित्य: (Ingredients): 4 चमचे मैदा, ½ चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, 3 मोठे चमचे दूध, एक मोठा चमचा तेल (ऑलिव्ह ऑईल असल्यास उत्तम), पिझ्झा सॉस, आवडीच्या भाज्या, मोझरेला चीझ, ओरिगॅनो

कृती: (Procedure) :

  • एक मायक्रोव्हेवमध्ये चालणारा मग घेऊन त्यामध्ये मैदा, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घेऊन काट्याच्या चमच्याच्या मदतीने त्यातील हवा काढून घ्या. त्यात दूध घालून मैदा छान भिजवून घ्या. 
  • त्यात एक चमचा ते घाला. मैदा छान एकजीव झाल्यानंतर त्यावर पिझ्झा सॉस, तुमच्या आवडीच्या भाज्या (कांदा, कार्न, ढोबळी मिरची) पेरा. मीठ आणि ओरिगॅनो घाला. 
  • वर मोझरेल्ला चीझ घालून हा मग मायक्रोव्हेवमध्ये साधारण 1.30 मिनिटांसाठी ठेवून द्या. 

टिप : अशाच पद्धतीने तुम्ही चिकन पिझ्झा बनवू शकता. पण चिकन जर तुम्ही आधीच शिजवून घेतले आणि मग टाकले तर पिझ्झा झटपट होईल

व्हेजिटेबल इडली (Vegetable Idli)

व्हेजिटेबल इडली - Veg Oven Recipes In Marathi

Instagram

नाश्त्यासाठी अनेकांचा आवडीचा पदार्थ म्हणजे व्हेजिटेबल इडली. तुम्हाला मायक्रोव्हेवमध्ये हा पदार्थ करता येऊ शकतो. तो कसा ते जाणून घेऊया. 

साहित्य: (Ingredients) : 1 कप रवा, 1 कप दही, 1 वाटी तुमच्या आवडीच्या भाज्या, इनो, काळीमिरी पूड, मोहरी, मिरची, तेल, मीठ

कृती: (Procedure) :

  • एका भांड्यात रवा आणि सगळ्या भाज्या एकत्र करुन घ्या. 
  • त्यात काळिमिरी पूड, मोहरी, मिरची हे साहित्य एकत्र करुन घ्या. 
  • दही घालून मिश्रण छान एकजीव करा.
  • दही घातल्यानंतर रवा त्यामध्ये छान फुलायला सुरुवात होते. 
  • तुम्ही जर भाज्यांमध्ये कांदा घ्याल तर त्यालाही छान पाणी सुटेल. 
  • आता छान घट्ट बॅटर झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये एक पॅकेट इनो (कोणताही फ्लेवर नसलेले) एक पाकिट घेऊन मिश्रण छान एकजीव करा. 
  • मायक्रोव्हेवचे इडली पात्र तयार करुन त्यामध्ये इडलीचे बॅटर एका एका इडलीच्या भांड्यात भरुन मायक्रोव्हेवमध्ये इडली पात्र 3 मिनिटांसाठी मायक्रोव्हेव करा. 
  • गरमागरम आणि लुसलुशीत इडली तयार 

टिप: बॅटर खूप पातळ होता कामा नये. ही इटपट इडली असल्यामुळे रव्यापासून बनवण्यात येते. यामध्ये मोहरीचा वापर करताना तुम्ही साधारण 30 सेकंदासाठी मोहरी गरम करुन घ्या.

चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक

नॉनव्हेज रेसिपी करा ट्राय (Non Veg Oven Recipes In Marathi)

आता आपण काही चटपटीत, हेल्दी आणि मस्त नॉन व्हेज रेसिपी पाहुयात.

बेक्ड चिकन लॉलीपॉप (Baked Chicken Lollipop)

बेक्ड चिकन लॉलीपॉप - Non Veg Baking Recipes In Marathi

Instagram

हल्ली अनेक जण डाएटमुळे तेलकट पदार्थ खायला पाहात नाही. अनेकदा डाएटमध्ये बेक्ड रेसिपी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण कधीकधी लॉलीपॉपसारखी रेसिपी टाळता येत नाही. अशावेळी तुम्ही हे लॉलीपॉप करु शकता. 

साहित्य: (Ingredients): चिकन लॉलीपॉपसाठी चिकन विंग्ज किंवा कच्चे लॉलीपॉप, व्हिनेगर, लाल तिखट, काळी मिरीपूड, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, दही, कॉर्नफ्लोअर, गव्हाचे पीठ, तांदूळाचे पीठ, तेल

कृती: (Procedure) :

  • एका भांड्यात तुम्ही निवडलेले लॉलीपॉप घ्या. तुम्ही घेतलेल्या प्रमाणानुसारच त्यामध्ये तुम्ही मसाले आणि इतर साहित्य घाला. 
  • लॉलीपॉपमध्ये मीठ, व्हिनेगर, लाल तिखट, काळी मिरी पूड, गरम मसाला, आलं-लसूण दही घाला. हे सगळे मिश्रण एकत्र करा. 
  • लॉलीपॉप छान मॅरिनेट होऊ द्या. किमान 30 मिनिटे तरी ठेवा. 
  • मायक्रोवेव्ह 350 डिग्रीवर साधारण दोन मिनिटे प्री हिट होऊ द्या. साधारण 15 मिनिटे 350 वर लॉलीपॉप बेक होऊ द्या. 
  • जर तुम्हाला थोडा ग्रील्ड लुक हवा असेल तर तुम्ही अजून 5 मिनिटांसाठी ठेवा. 

टिप:  जर तुम्हाला चिकन खूप टेंडर हवे असेल तर पुन्हा ग्रील्ड करायला जाऊ नका. 

चिकन टिक्का (Chicken Tikka)

चिकन टिक्का - Non Veg Recipes In Marathi

Instagram

स्टाटर्स म्हणून खाल्ली जाणरी चिकनची ही डिश फारच प्रसिद्ध आहे. पण ती घरी करायला कंटाळा येतो. पण मायक्रोव्हेवमध्ये ही रेसिपी फारच कमी भांड्याचा वापर करुन करता येते. 

साहित्य: (Ingredients): ½ किलो बोनलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट. लिंबाचा रस, दही, कसुरी मेथी

कृती: (Procedure) : 

  • एका भांड्यात चिकन घेऊन त्यात आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट घालून छान एकजीव करुन घ्या. आणि साधारण 15 मिनिटे तरी ठेवून द्या. 
  • दुसऱ्या मॅरिनेशनसाठी तुम्हाला दही, आलं-लसूण पेस्ट आणि लाल तिखट हळद, गरम मसाला एकत्र करायचा आहे. थोडीशी कसुरी मेथीही यामध्ये घालायची आहे. दह्याचे मिश्रण एकत्र करुन त्यामध्ये थोडे तेल घालायचे आहे. 
  • दही तेलाचे हे मिश्रण तुम्ही छान फेटून घ्यायचे आहे. मायक्रोव्हेवमध्ये एका भांड्यात तेल घेऊन त्यात जीरे आणि बेसन घेऊन ते 1 मिनिटांसाठी किंवा बेसनचा छान वास येईपर्यंत ठेवायचे आहे. 
  • तयार दह्याच्या मिश्रणात तुम्हाला हे घालायचे आहे. त्यामुळे तुमच्या चिकन टिक्काला एक छान कोट मिळतो. 
    आता या मिश्रणात चिकन घालून छान एकत्र करायचे आहे. 
  • आता मायक्रोव्हमध्ये मिळणारी जाळी घेऊन त्यावर चिकनचे एक एक पीस तुम्हाला ठेवायचे आहे. 
  • मायक्रोव्हेव 200 डिग्रीवर प्रीहिट करुन तुम्ही छान 20 मिनिटे बेक करा. 

टिप : तुम्ही बेकिंग नंतर ग्रील्ड सुद्धा करु शकता. त्यामुळे तुम्हाला छान क्रिस्प येईल. 

या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी (Mouth Watering Sprout Recipes)

चिकन ग्रील्ड (Chicken Steak)

चिकन ग्रील्ड - Non Veg Baking Recipes In Marathi

Instagram

ग्रील्ड चिकन किंवा फॅन्सी नावाने त्याला चिकन ग्रील्ड नावानेही ओळखले जाते. पण ते मायक्रोव्हेवमध्ये कसे बनवायचे ते पाहुया 

साहित्य: (Ingredients): साधारण 1 किलो चिकन, आलं – लसूण पेस्ट, लाल तिखट, लिंबाचा रस, हळद, गरम मसाला, धणे पूड 

कृती: (Procedure) :

  • चिकनचे पीस मोठे ठेवा. त्याला लांब लाबं चिरा पाडून घ्या. 
  • चिकनमध्ये सगळे मसाले घालून छान मॅरिनेट करुन ठेवा. तुम्हाला जर लाल रंग हवा असेल तर तुम्ही लाल रंगही घालू शकता. 
  • बेकिंग ट्रेला थोडेसे तेल घालून तुम्ही त्यावर थोडे लांब लांब चिकन ठेवा. 
  • 180 डिग्रीवर 20 मिनिटे तुम्हाला चिकन ग्रील्ड करायचे आहे. दहा मिनिटांनी तुम्हाला चिकन उलटून दुसऱ्या बाजूने शिजवायचे आहे. 
  • तुमचे ग्रील्ड चिकन तयार.

टिप: ग्रील्डमोडचा वापर करताना तुम्हाला टॉल जाळीचा उपयोग करायचा आहे त्यामुळे चिकनची वरील बाजू छान ग्रील्ड दिसेल. 

चिकन तेरियाकी (Chicken Teriyaki)

चिकन तेरियाकी - Non Veg Oven Recipes In Marathi

Instagram

डाएटमध्ये असणाऱ्यांसाठी किंवा चिकन सॅलेड आवडते अशांसाठी हा एक छान पर्याय आहे. हा करणेही फार सोपे आहे. 

साहित्य: (Ingredients): ½ किलो चिकन ब्रेस्ट, काळीमिरी पूड, 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर

कृती: (Procedure) : 

  • चिकन ब्रेस्टचे उभे तुकडे करुन घ्या. त्यात मीठ, काळीमिरी पूड, कॉर्नफ्लोर घालून छान मिक्स करुन घ्या. 
  • तेरीयाकी चिकनवर एक छान ग्लेझ असतो. त्यासाठी आधी चिकन शिजवून घ्यावे लागेल. एका ट्रेमध्ये मॅरिनेट केलेले चिकन घ्या. त्यावर तेलाचा किंवा बटरचा ब्रश फिरवा. 
  • ओव्हन 200 डिग्रीवर 5 मिनिटांसाठी प्रीहिट करुन घ्या. चिकन साधारण 15 मिनिटे तरी शिजवा. 
  • तेरीयाकी चिकनमध्ये सोया सॉसची ग्रेव्ही असते. 
  • एका पॅनमध्ये बॉटममध्ये लसूण, सोया सॉस, पाणी, 1 चमचा मध आणि कॉर्नफ्लोअर घालून एकत्र करुन घ्या. 
  • एका मायक्रोव्हेव पॅनमध्ये चिकनचे शिजवलेले तुकडे घेऊन त्यावर ही सोयासॉसचे पाणी घाला. 
  • मायक्रोव्हेवमध्ये हे मिश्रण तुम्हाला किमान 20 मिनिटांसाठी ठेवायचे आहे. तुम्हाला याची ग्लेझी आणि थीक ग्रेव्ही येईपर्यंत ठेवायचे आहे. 

टिप: पॅनमध्येही हे चिकन करता येते. पण तुम्हाला मायक्कोव्हेवमध्ये छान टेंडर चिकन मिळते. 

चिकन पॉपकार्न (Chicken Popcorn)

चिकन पॉपकॉर्न - Non Veg Oven Recipes In Marathi

Instagram

चिकन पॉपकॉर्न ही सगळ्यांचीच आवडती रेसिपी आहे. खूप जणांना फ्राईड चिकन पॉपकॉर्न आवडतात. पण तुम्ही कधी मायक्रोव्हेवमधील चिकन पॉपकॉर्न खाल्ले आहेत का? मग ही रेसिपी नक्की करा. 

साहित्य: (Ingredients): 500 ग्रॅम बोनलेस चिकन, हळद, लाल तिखट, काळीमिरी पूड, बडिशेपेची पूड, मीठ, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस 

कृती: (Procedure): 

  • सगळे साहित्य एकत्र करुन घ्या. चिकन छान मॅरिनेट होऊन द्या. 
  • एक तासानंतर चिकन छान मसाल्यामध्ये घोळलेले दिसेल. 
  • मायक्रोव्हेव सात मिनिटांसाठी प्रीहिट होऊ द्या. चिकन एका प्लेटमध्ये घेऊन मायक्रोव्हेव कन्व्हेशन मोडवर 180 डिग्रीवर 20 मिनिटांसाठी बेक्ड करा. 
  • दहा मिनिटांनी त्याची बाजू बदला. आता मायक्रोव्हेवचा मोड बदलून ग्रील्ड करा आणि 10 मिनिटांसाठी छान फ्राय करा.
    मस्त क्रिस्पी फ्राईड चिकन तयार 

टिप: तुम्ही चिकन आणि क्रिस्पी करण्यासाठी कॉर्नफ्लेक्सचाही उपयोग करु शकता. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQs)

1. घरी वापरासाठी मायक्रोव्हेवची निवड कशी करावी?

हल्ली मायक्रोव्हेव असणे एक स्टेटस सिबाँल झाले आहे. खूप जण किचनची शोभा वाढवण्यासाठी मायक्रोव्हेव घेतात. पण त्याचा उपयोग फारसा करत नाही. जर तुम्हाला फक्त कुटुंबासाठी मर्यादित असा मायक्रोव्हेव घ्यायचा असेल तर तुम्हाला बाजारात खूप व्हरायटी मिळतील. आपण घरी मायक्रोव्हेव घेतो त्यावेळी खूप गोंधळून जातो. पण घरी घेतल्या जाणाऱ्या मायक्रोव्हेवमध्ये पाणी गरम करण्यापासून ते केक बनवण्यापर्यंत सगळ्या सोयी असायला हव्यात असे आपल्याला वाटते. म्हणूनच तुम्ही मायक्रो + कन्व्हेक्शन अशा मायक्रोव्हेवची निवड करा. जर तुम्ही बेकर नाही किंवा तुमचा व्यवसाय त्याशी निगडीत नाही तर तुम्हाला 20 लिटरचा मायक्रोव्हेव पुरेसा आहे.

2. मायक्रोव्हेवमध्ये बेक करणे सोपे असते का? 

होय, मायक्रोव्हेवमध्ये बेक करणे फारच सोपे असते. फक्त तुम्हाला मायक्रोव्हेवला कन्व्हेक्शन मोडमध्ये बदलून टेंपरेचर सेट करुन काहीही गोष्टी बेक करायच्या असतात. तुम्ही जो पदार्थ करत आहात. त्याचे प्री हिट आणि टेंपरेचर जाणून घेतले की, बेकिंग करणे फारच सोपे जाते. काही केक तर मायक्रोव्हेवमध्ये कोणताही मोड न बदलता होऊन जातात. 

3. ओव्हनमध्ये कोणत्या गोष्टी बेक केल्या जातात?

ओव्हनमध्ये बऱ्याच गोष्टी बेक होतात अगदी केक, खारी, बिस्कीट, पाव, टोस्ट, पिझ्झा असे असंख्य पदार्थ हे ओव्हनमध्ये केले जातात. 

आता या काही बेकिंग रेसिपी आणि टीप्सचा वापर करुन मस्त रेसिपी बनवा.