कडाक्याच्या ठंडीत बहुतांश जणांना सकाळी उठल्यानंतर गरम-गरम चहा पिण्याची सवय असते. विशेषतः हिवाळ्यामध्ये चहा प्यायल्याशिवाय लोकांचा दिवस पूर्ण होत नाही. काही जण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. जास्वंदीच्या फुलाची माहिती सर्वाना असते, पण तुम्ही कधी जास्वंदीच्या फुलाचा (Hibiscus) चहा प्यायला आहात का? जास्वंदीच्या फुलाचा चहाची चव सुंदर असतेच पण हा चहा आरोग्यासाठीही लाभदायक असतो. जास्वंदीच्या फुलाचा चहा खूप कमी वेळेत तयार होतो. कारण यामध्ये दूध-सारखेचा वापर करावा लागत आहे. या चहामुळे वजन घटवण्यासोबत कोलेस्ट्रॉल, हृदयरोगाचा त्रासही कमी होतो. या चहामुळे रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते, पचनक्रियाही सुधारते. याव्यतिरिक्त जास्वंदीच्या चहाच्या सेवनामुळे चेहऱ्यावरही वेगळची चमक येते. जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यायल्यानं चेहऱ्यावरील पुरळ, काळे डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा नितळ-निरोगी राहण्यास मदत होते. जास्वंदामध्ये व्हिटॅमिन, खनिजे, फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्म असतात. विशेष म्हणजे या चहामध्ये असे कित्येक औषधीतत्त्वे आहेत, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदू देखील शांत होतो. जास्वंदीचा चहा प्यायल्यानं नैराश्य देखील कमी होते. नियमित एक कप जास्वंदीच्या फुलाचा चहा प्यायल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येते. याव्यतिरिक्त जास्वंदीचा चहा प्यायल्यानं यकृतासंबंधीचे आजारही कमी होतात. जास्वंदीच्या पाकळ्यांमुळे चहाला लालसर रंग येतो. हा चहा हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातही पिणं लाभदायक आहे.
(वाचा : आरोग्यासाठी स्वादानुसारच करा वेलचीचा वापर, अन्यथा होतील गंभीर परिणाम)
असा तयार करा जास्वंदीच्या फुलांचा चहा ?
जास्वंदीच्या फुलांचा चहा पिण्याचे काही दुष्परिणाम नसतात.
(वाचा : हिवाळ्यात करा तिळाचं सेवन, गंभीर आजारातून होईल सुटका)
साहित्य:
एक जास्वंदाचं फुल
एक कप पाणी
एक लवंग
किंचितशी दालचिनी
(वाचा : ‘हे’ आजार असणाऱ्यांनी संत्री खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम)
कृती:
एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवा. त्यात लवंग आणि दालचिनीची टाकून पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळ्यावर त्यात जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या घालाव्यात आणि चहा उकळू द्यावा. हा चहा तुम्ही गरम पिऊ शकता किंवा बर्फ तसंच मध मिक्स करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. पण चहा गरम असताना त्यात मध मिक्स करू नका.
(वाचा : पपईच्या पानांचा रस प्या, नितळ त्वचेसह मिळतील असंख्य आरोग्यवर्धक फायदे)
जास्वंदीच्या फुलांचा फेसपॅक
जास्वंदीची फुलांची पाने उकळवून मिक्सरमधून वाटून घ्यावी. यामध्ये मध मिक्स करावे आणि आपल्या हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावावा. यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, चेहरा नितळ होतो.
(वाचा : हृदयरोग ते त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय, रोज खा हिरवे मटार)
देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.