ADVERTISEMENT
home / आरोग्य
the benefits of eating food on banana leaves

यासाठी जेवावे केळीच्या पानावर, मिळतात अनेक फायदे

एखाद्या खास सणाला, उपवासाच्या दिवशी केळीच्या पानात जेवण वाढलं जातं. कोकणात आणि केरळ सारख्या भागात केळीच्या पानात नेहमीच जेवण सर्व्ह केलं जातं. केळीच्या पानात खाल्लेल्या पदार्थांची चव खूपच खास वाटते. नैवेद्यासाठी हिरव्या गार केळीच्या पानावर पांढऱ्या शुभ्र भाताची मुद आणि पिवळं धम्मक वरण त्यावर मोतिया रंगाच्या तूपाची धार पडते तेव्हा असा प्रसाद जेवणं म्हणजे अगदी स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं. मात्र हा आनंद आजकाल फक्त सणासुदीलाच घेता  येतो. एखाद्या केरळी अथवा  कोकणी हॉटेलमध्येही केळीच्या पानात अन्नपदार्थ सर्व्ह केले जातात तेव्हा त्याला पारंपरिक खाद्यपदार्थांचा टच मिळतो. मात्र केळीच्या पानात जेवण्याची परंपरा फक्त डोळ्यांनाच सुखावणारीच आहे असं नाही तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानात जेवणे लाभदायक ठरते. यासाठी जाणून घ्या याचे फायदे

जन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर

‘केळीच्या पानावरील पंगत’ – भारतीय खाद्यसंस्कृती

घरी एखादा कार्यक्रम असला तर आजही पारंपरिक पद्धतीने पंगतीचे जेवण वाढले जाते. अशा पंगतीमध्ये केळीच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो. याचे  मुख्य कारण  म्हणजे भारतात केळीचे पान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. शिवाय हिंदू संस्कृतीमध्ये  केळीच्या पानात नैवेद्य अथवा प्रसाद वाढण्याला एक विशेष महत्त्व आहे. घरी आलेले पाहुणे हे देवासमान असतात आणि त्यांचे पाहुणचार अशा खास पद्धतीने करण्याची पद्धत भारतात आहे. शिवाय केळीची पाने पर्यावरणाला पूरक आणि पोषक असल्यामुळे यामुळे प्रदूषण होत नाही. केळीच्या पानात वाढल्यामुळे भांडी धुण्यासाठी पाण्याचा वापर कमी होतो. केळीची पाने ओल्या फडक्याने पुसली तरी स्वच्छ होतात. केळीच्या पानांना एक छान सुंगध असतो जो त्या पानामुळे अन्नपदार्थांमध्ये उतरतो. अशा अनेक कारणांमुळे पूर्वीपासून केळीच्या पानात जेवण्याची परंपरा भारतात आहे.

भजी, पुरी तळल्यावर पुन्हा वापरू नका उरलेलं खाद्यतेल

ADVERTISEMENT

निरोगी राहण्यासाठी जेवा केळीच्या पानात

केळीच्या पानात भरपूर प्रमाणात पॉलीफेनॉल नावाचे अॅंटि ऑक्सिडंट असते. जेव्हा तुम्ही केळीच्या पानात जेवता  तेव्हा त्या पानामधून सर्व पोषक घटक तुमच्या अन्नपदार्थांमध्ये आणि तुमच्या पोटात जातात. केळीच्या पानात जेवल्यामुळे पार्किसंस, कर्करोगासारखे आजार दूर राहतात. शिवाय केळीचे  पान हे मुळीच अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे या पानात जेवणामुळे तुमच्या पानातील अन्नपदार्थ दूषित होत नाहीत. पूर्वीच्या  काळी काही आजारामध्ये उपचार करण्यासाठी केळीच्या पानांचा खास वापर केला जात असे. यासाठीच केळीच्या पानात जेवणे नेहमीच लाभदायक ठरते.

आयुर्वेदानुसार जेवताना नेहमी पाळावेत हे नियम, नाही पडणार आजारी

23 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT