बाजारात अनेकदा गाडींवर किंवा ठेल्यावर तुम्ही काळ्या रंगाचा हा पदार्थ नक्की पाहिला असेल. बाहेरुन काळा कुळकुळीत आणि आतून पांढरा शुभ्र असलेला हा पदार्थ खूप जण खातात. अनेक जण यापासून भाजी बनवतात. तर काही जण हा पदार्थ असाच खातात. जर तुम्ही बाजारात खूप वेळा हा पदार्थ पाहिला असेल आणि ते खाण्याची किंवा त्याच्याबद्दल जाणून घेण्याची तुम्हालाही इच्छा झाली असेल तर तुम्ही त्याचे फायदे जाणून घ्यायल्या हवेत. भिजवलेल्या शेंगदाण्यासारखी या शिंगाड्याची चव लागते. तुमच्या आरोग्यासाठी ते नेमके कशाप्रकारे फायद्याचे ठरतात ते जाणून घेऊया.
काळा आणि पिवळा गुळ काय आहे दोघांमधील फरक, फायदे-तोटे
शिंगाडा म्हणजे काय?
शिंगाडा या वनस्पतीला water chestnut असे म्हटले जाते. गवताप्रमाणे दिसणाऱ्या या झाडांच्या मुळांना काळ्या रंगाचा शिंगाडा लागतो. त्यामुळे ही एक कंद वनस्पती आहे. आशिया खंडाच्या काही ठराविक भागात उगवणारी ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. याचे फायदे लक्षात घेत आशिया खंडात याची शेती अधिक केली जाते. काही भागात याचे सेवन मोठ्याप्रणात केले जाते. विशेषत: पूर्व विदर्भ आणि मध्यप्रदेशाता याची शेती केली जाते. शिंगाड्याला खूप जण कमळाची मूळ किंवा कमळाचा एक भाग समजतात .पण शिंगाडा हा कमळाचा भाग नाही याची शेती तलावात केली जात असली तरी देखील कमळाशी याचा काही संंबंध नाही.
वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करा ‘कमळकाकडी’चा
शिंगाडा कसा खाल्ला जातो?
शिंगाड्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते. हे फार महाग नसते अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात बाजारात शिंगाडा मिळतो. त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या रेसिपीमध्ये त्याचा समावेश करतात. पण सर्वसाधारणपणे शिंगाडा हा उपवासासाठी अनेक जण खातात. खूप जण त्याचे सेवन उकडून करतात. भारतातच नाही तर परदेशातही यापासून तयार केलेल्या पीठाचा समावेश केला जातो. विशेषत: सूप्समध्ये याचा समावेश होतो.
शिंगाड्याचे फायदे
शिंगाड्याची माहिती घेतल्यानंतर त्याचा आहारात आपण समावेश का करायला हवा यासाठी त्याचे फायदे जाणून घेणे गरजेचे आहे.
- शिंगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. अशांसाठी शिंगाडा चांगला आहे.
- शिंगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते जे हाडांच्या बळकटीसाठी खूपच फायद्याचे असते.
- ज्यांना दम्याचा त्रास आहे अशांनी शिंगाड्याचे सेवन करावे. शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे नक्कीच दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो.
- पोट खराब झाले असेल जुलाब झाले असतील तर शिंगाड्याचे सेवन करावे त्रास कमी होतो.
- गर्भवती महिलांनी शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे बाळाची वाढ उत्तम होते. शिवाय डिलिव्हरीस येणार अडथळेही कमी होतात
आता थंडीत शिंगाडा बाजारात दिसल्यानंतर तो आवर्जून खा आणि निरोगी राहा.
स्वयंपाक करताना अशा शिजवा भाज्या, राहाल नेहमी निरोगी