ADVERTISEMENT
home / आरोग्य
भिजवलेले ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुटमधील हे प्रकार भिजवून खाल्ले तर मिळतात अधिक फायदे

 आरोग्यासाठी सुकामेवा हा फारच फायद्याचा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी बदाम, काजू, अक्रोड, मनुका, अंजीर असे वेगवेगळे प्रकार अगदी नक्कीच असतात. सुक्यामेव्यामध्ये अनेक पोषकत्वे असतात. त्यामुळेच त्याचा समावेश अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने डाएटमध्ये केला जातो. सुकामेवा हा जास्ती खाल्ला तरी देखील काही दुष्परिणाम होऊ शकतात. पण ड्रायफ्रुटमधील काही प्रकार तुम्ही भिजवून खाल्ले तर त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यास मदत मिळते. असा कोणता सुकामेवा आहे जो तुम्हाला भिजवून खाल्ला तर त्याचे फायदे अधिक मिळतात ते जाणून घेऊया.

बदाम

भिजवलेले बदाम

स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठी खूप जण लहान मुलांना बदाम देतात. बदाम कच्चे खाल्ले तरी चालू शकतात. पण तुम्ही बदाम भिजवून (Soaked Almond) खाल्ले तर त्याचे अधिक फायदे शरीराला मिळू शकतात. बदाम भिजवून खाल्ले तर त्यामधील पोषक घटक अधिक फायद्याचे ठरतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, चांगल्या त्वचेसाठी आणि चांगली झोप देण्यासाठी हे बदाम फायद्याचे ठरतात. त्यामुळे दररोज सकाळी तुम्ही बदाम भिजवून खा. तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यास मदत मिळेल. भिजवलेले बदाम रोज खाणे हे आरोग्यासाठी चांगले

अक्रोड

भिजवलेले अक्रोड

मेंदूसारखा दिसणारा हा सुकामेवा खूप जणांच्या आवडीचा आहे. अक्रोडचा समावेश खूप जण वेगवेगळ्या प्रकारे करतात. त्वचेसाठी अक्रोडचे स्क्रब देखील फायद्याचे असते. अक्रोडचे लाडू, अक्रोडचा हलवा करुन खाल्ला जातो. पण अशा पद्धतीने अक्रोड खाताना शरीरातील फॅट वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जर तुम्ही एक अक्रोड फोडून ते रात्रभर भिजत( Soaked Walnuts) ठेवले तर त्याचे फायदे मिळण्यास मदत मिळते. अक्रोड भिजवून खाल्ल्यामुळे पोटॅशिअम, आर्यन, कॉपर आणि झिंक मिळते. ज्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. याशिवाय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

भिजवलेले मनुके

भिजवलेले मनुके

शिरा आणि अन्य गोडाच्या पदार्थामध्ये मनुके घातले जातात. द्राक्ष सुकवून मनुके तयार होतात. काळे आणि चॉकलेटी असे दोन प्रकार यामध्ये मिळतात. मनुके तुम्ही रोज खायला हवेत. पण मुठभर मनुके जर तुम्ही भिजवून खाल्ले तर त्याचा अधिक फायदा मिळतो. भिजवलेल्या मनुक्यांमुळे दात आणि हाडांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारशक्ती चांगली करणे, चेहऱ्याला ग्लो देण्यासाठी आणि रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी भिजवलेले मनुके (Soaked Raisins) फायद्याचे ठरतात. त्यामुळे भिजवलेले मनुके पाण्यासकट प्या. त्यामुळे त्याचे अधिक फायदे मिळण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

अंजीर

भिजवलेले अंजीर

अंजीर हा सुकामेवा देखील खूप जणांच्या आवडीचा आहे. गोड आणि रवाळ असा हा सुकामेवा दिवाळीच्या दिवसात प्रत्येकाकडे आणला जातो. अंजीर जर तुम्ही भिजवून खाल्ले तर त्याचे फायदे अधिक मिळण्यास फायदे मिळतात. अंजीर भिजवून खाल्ले तर त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. टाईप 2 च्या डाएबिटीझसाठीही हा खूप फायद्याचा आहे. त्यामुळे अंजीर तुम्ही रोज भिजवून खा. तुम्हाला ते नक्की आवडतील.

आता हे सुकामेवा तुम्ही भिजवून खा आणि तुमच्यासाठी फायदेच फायदे मिळवा.

25 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT