जेवणानंतर किंवा भूक भागवण्यासाठी बारमाही मिळणारे फायदेशीर फळ म्हणजे केळी. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची केळी मिळतात. त्यातल्या त्यात चवीला गोड आणि आकाराने लहान असलेले वेलची केळं खूप जणांना खायला आवडते. वेलची केळीचा आकार हा तुलनेने लहान असतो. याच्या साली या फारच पातळ असतात. छोट्या केळींमध्येही अनेक वेगळे प्रकार मिळतात.यात मखमली, गोबराळ अशी काही नावे दिली जातात. पण जी केळी गोड असतात त्यांना वेलची केळी असे म्हटले जाते. बाजारात यांचा भावही चांगला चढाच असतो. खूप जण याची किंमत ऐकून ते खायला पाहात नाहीत. पण ही केळी तुम्ही अगदी हमखास खायला हवीत अशी आहेत. बाजारात लाल केळी मिळतात. लाल केळ्याचे फायदे अनेक आहेत. पण आज आपण जाणून घेऊया वेलची केळीचे (Velchi Banana) फायदे. इतर केळींप्रमाणेच वेलची केळ्यांमध्ये अनेक पोषकत्वे ( Velchi Nutritional value )असतात. वेलची केळ्यांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशीअम, डाएटरी फायबर,आर्यन, साखर आणि फारच कमी प्रमाणात कॅलरीज असतात (रोजच्या केळींचा विचार करता) कारण याचा आकार हा लहान असतो. गोड असल्यामुळे एक ते दोन केळी खाल्ली तरी पुरेसे असते. अशा या वेलची केळींचे अनेक फायदे देखील आहेत ते आज आपण जाणून घेऊया.
Table of Contents
- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वेलची केळी (Help To Maintain Diabetes)
- अँटीऑक्सिडंटनी युक्त असतात वेलची केळी (Rich In Antioxidants)
- कफ आणि सर्दीसाठी वेलची केळी फायदेशीर आहे (Good For Cough And Cold)
- लहान बाळांचे वजन वाढण्यासाठी वेलची केळी फायदेशीर आहे (Good For Babies To Gain Weight)
- व्हिटॅमिन सीचा साठा (Source Of Vitamin C)
- भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलची केळी उपयुक्त (Control Hunger)
- पोटॅशिअमने युक्त असते वेलची केळी (Rich Source Of Potassium)
- उर्जेचा साठा (Rich Source Of Energy)
- पचनासाठी फायदेशीर आहे वेलची केळी (Good For Digestion)
- FAQ’S – वेलची केळी खाण्याचे फायदे
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वेलची केळी (Help To Maintain Diabetes)
ज्यांना मधुमेह आहे. अशांना साखर असलेले पदार्थ खाण्यास मनाई असते. मधुमेहींना ज्या गोष्टीची बंदी असते तेच खाण्याची सतत इच्छा होत राहते. मधुमेह नियंत्रणात ठेवून जर काही खाण्याची इच्छा असेल तर अशांनी वेलची केळीचे सेवन केले तर त्यांना फारच फायद्याचे ठरते. वेलची केळीमध्ये असलेली साखर ही पुरेशी असते. त्यामुळे ज्यांना गोड खाण्याची इच्छा असते. त्यांची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते. बाकी काहीही खाण्याची इच्छा फारशी होत नाही. मधुमेहींना खूप गोड खाण्याची इच्छा झाली की, त्यांनी एखादं वेलची केळं खाल्लं तरी चालून जातं. मधुमेहाची कारणं अनेक असू शकतात. त्यांना खाण्याचे बंधन असते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते वेलची केळी खााऊ शकतात
अँटीऑक्सिडंटनी युक्त असतात वेलची केळी (Rich In Antioxidants)
शरीरासाठी वेगवेगळे अँटीऑक्सिडंट हे फायद्याचे असतात. फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. केळ्यामध्ये असलेले डाएटरी अँटीऑक्सिडंट असते. जे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. कॅन्सरचे रेडिकल्स दूर ठेवण्यास केळे मदत करते. याशिवाय ज्यांना पचनाचा त्रास असतो अशांसाठी देखील यामधील अँटीऑक्सिडंट फायद्याचे ठरतात. या शिवाय यामध्ये असलेले फ्लावनॉईड्स आणि अमिनीज देखील फायद्याचे ठरते.
कफ आणि सर्दीसाठी वेलची केळी फायदेशीर आहे (Good For Cough And Cold)
कफ आणि सर्दी ही आपल्याला कधीही होऊ शकते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही वेलची केळ्याचे सेवन करायला हवे. वेलची केळ्यामध्ये असलेले न्युट्रिएटंस तुमच्या कफ आणि सर्दीला नियंत्रित करण्याचे काम करते. तुम्हाला साधारण तीन ते चार दिवसांसाठी सर्दी झाली असेल तर तुम्ही छान पिकलेल्या केळीचे सेवन करा त्यामुळे शरीरात असलेला हिस्टामाईन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पण सर्दी खूप काळासाठी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
लहान बाळांचे वजन वाढण्यासाठी वेलची केळी फायदेशीर आहे (Good For Babies To Gain Weight)
अनेक लहान बाळ ही कृश असतात. इतर मुलांच्या तुलनेत ती खूपच जास्त बारीक दिसतात. अशावेळी आपल्या बाळांचे वजन वाढावे असे अनेक पालकांना वाटते. लहान बाळांचे वजन वाढवण्यासाठी कोणतीही औषधं न घेता मुलांच्या आहारात केळ्याचा समावेश केला तर वजन वाढण्यास मदत मिळते. केळं हे खाण्यास सोपे असते. लहान बाळांना चिरडून केळ खायला दिलं की, ते अगदी सहज खाऊ शकतात. केळ्यामध्ये फायबर, कार्ब्स आणि कॅलरीज असतात त्यामुळे वजन योग्य वाढण्यास मदत मिळते.
व्हिटॅमिन सीचा साठा (Source Of Vitamin C)
व्हिटॅमिन सी शरीरासाठी आवश्यक असते. अनेक फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. वेलची केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हाला उत्तम त्वचा हवी असेल तर तुम्ही याचे सेवन करायला हवे. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळेल. या शिवाय तुमच्या शरीराला इतरही फायदे होण्यास मदत मिळेल. जर तुम्हाला संत्री किंवा लिंबू वर्गातील फळं मिळत नसतील तर तुम्ही हमखास या वेलची केळीचे सेवन करायला हवे.
भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलची केळी उपयुक्त (Control Hunger)
काही जणांचे भुकेवर अजिबात नियंत्रण नसते. अरबट चरबट असे सतत खाण्याची इच्छा होत असते. तुम्हाला तुमच्या अशा चुकीच्या भुकेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही अशा भुकेच्या वेळी केळं खायला हवे. केळं खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. पोट भरलेले असेल तर इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. तुम्हाला भूक नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही केळ्याचे सेवन करा. वजन कमी करु इच्छिणाऱ्या व्यक्ती, जीमला जाणाऱ्या व्यक्तींना वर्कआऊट केल्यानंतर खूप भूक लागते. अशावेळी तुम्ही केळी खाल्ली की तुमचे पोट भरेल. तुमच्या शरीराला चांगली उर्जा मिळेल.
पोटॅशिअमने युक्त असते वेलची केळी (Rich Source Of Potassium)
उत्तम आरोग्यासाठी पोटॅशिअम हे देखील तितकेच गरजेचे असते. पोटॅशिअममुळे किडणी आणि ह्रदयासंदर्भातील तक्रारी दूर राहण्यास मदत मिळते. शरीरात योग्य प्रमाणात पोटॅशिअम असेल तर त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर शरीरातील पाण्याचे प्रमाणही योग्य राहण्यास मदत मिळते. केळ्यामध्ये योग्य प्रमाणात पोटॅशिअम असल्यामुळे त्याचे सेवन तुम्ही नक्की करायला हवे.
उर्जेचा साठा (Rich Source Of Energy)
शरीराला जेव्हा उर्जेची कमतरता भासत असेल. सतत थकल्यासारखे वाटत असेल तर अशांसाठी केळं हे फारच फायदेशीर आहे. केळ्याचे सेवन केले तर शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळण्यास मदत मिळते. केळ्यामध्ये असलेली साखर आणि फायबर उर्जा देण्यास मदत करते. या शिवाय यामध्ये असलेले न्युट्रिएंटस उर्जा देण्यास मदत करते. यामधील घटक इलेक्ट्रोलाईट म्हणजे एनर्जी पावडरचे काम करते. त्यामुळेच शरीराला उर्जा मिळते. तुम्हाला ज्यावेळी थोडे थकल्यासारखे किंवा काहीही करण्याची इच्छा नसल्यासारखे होत असेल त्यावेळी शरीराला उर्जा मिळण्यासाठी केळ्याचे सेवन करायला हवे.
पचनासाठी फायदेशीर आहे वेलची केळी (Good For Digestion)
केळ हे पचनासाठी खूप जास्त चांगला असा पर्याय आहे. तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर अशांनी वेलची केळ्याचे सेवन करायला हवे. वेलची केळ्यामध्ये असलेले घटक तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. केळ्याचे सेवन केले तर तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. जेवणानंतर साधारण काही मिनिटांनी तुम्ही केळं खाल्लं तर तुमचा विष्ठेचा त्रासही कमी होतो. तुमचे पोटाचे आरोग्य चांगले राहते.
FAQ’S – वेलची केळी खाण्याचे फायदे
वेलची केळी कशी ओळखावी ? (How To Know The Elaichi Banana)
खूप जणांना बाजारात मिळणारी लहान केळी ही वेलची केळी वाटतात. पण असे अजिबात नाही. बरेचदा दुकानदारदेखील वेलची केळी सांगून फसवणून करतात. तुमचीही अशी फसवणूक केली जात असेल तर सावध राहा. वेलची केळी ही खूप जाड किंवा गुबगुबीत नसतात. ती बारीक देखील असतात. त्यांची साल ही पातळ असते. त्यांचा आकार हा लहान असला तरी देखील तो ओळखता येतो.
केळ खाण्याची योग्य वेळ कोणती? (What Is The Good Time To Eat Banana)
जेवणानंतर शक्यतो केळी खाऊ नये कारण ती पचण्यास खूप जड जातात. नाश्त्यानंतर साधारण 30 मिनिटांनी केळ्याचे सेवन केले तर चालू शकते. व्यायामानंतर लागणारी भूक भागवण्यासाठी तुम्ही केळं खाल्लं तर इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्ही केळं खाल्लं तरी चालू शकते. शक्यतो रात्री झोपताना केळी खाऊ नका. कारण ती पचत नाही.
केळ्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते का? (Do Bananas Help To Gain Weight?)
ज्या व्यक्ती कृश प्रवृत्तीच्या असतात अशांना केळं खाण्यास सांगितले जाते. केळ्यामधील असलेले घटक वजन वाढण्यास मदत करतात. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, कॅलरीज असतात ज्या वजन वाढवण्यास मदत करतात. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आणि योग्य वजन वाढवायचे असेल तर तुम्ही केळ्याचे सेवन करायला हवे.